शेयर करा

turmeric harvesting

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये आपले स्वागत आहे. हळद हे आपल्या रोजच्या आहारातील एक प्रमुख घटक आहे. आणि शेतकरी मित्रांना हे एक नगदी पीक म्हणून पुढ येत आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून हिंगोली, परभणी, नांदेड तेसच सातारा आणि सांगली भागात हळदीचे उत्पादन जास्त घेतले जाते. याच्या मध्ये खास करून सेलम हे वान घेतले जाते. इतर जाती पहिल्या तर प्रभा, प्रतिभा आणि कृष्णा या आहेत. आजच्या लेखामध्ये आपण याच “जाणून घ्या हळद काढणी पद्धत (turmeric harvesting): A to Z माहिती” सविस्तर मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर हळद उत्पादक शेतकरी असाल तर खास करून ही माहिती तुमच्या खूप महत्वाची आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही माहिती संपूर्ण वाचा आणि तुमच्या इतर हळद उत्पादक शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करा. चला तर मग सुरू करुयात …



हळद काढणीची (turmeric harvesting) शास्त्रशुद्ध पद्धत –

1. तुम्हाला तर माहिती आहे की हळद लागवडी पासून 8 ते 9 महिन्यात हळद काढणीस येते.
2. हळद पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिची पाने पूर्णपणे पिवळी पडून खाली पडतात.
3. मग तुम्ही समझू शकता की हळद काढणीस तयार आहे. अंदाजे काढणी ही फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यन्त चालते.
4. काढणीची तारीख ठरल्यानंतर जमिनीला 15 दिवस अगोदर पानी देणे बंद करावे.
5. पानी एकदम बंद न करता हळू – हळू बंद करावे.
6. पण जमीन जास्तच वाळली असल्यास काढणी करताना जमिनीस हलकेसे पानी द्यावे. कारण हलकासा ओलावा असेल तर काढणी करणे हे सोप्पे राहते.
7. सुरुवातीला वरील सर्व पाने जमिनीलागत कापून घ्यावीत.
8. नंतर कुदळीच्या किंवा ट्रॅक्टर अवजाराच्या मदतीने हळद काढणे सुरू करावे.
9. काढणी झाल्यानंतर जमीन तशीच 2 ते 3 दिवस उन्हात तापू द्यावी जेणे करून कंदावरील माती वाळून जाईल व कंद खाली आपटल्यानंतर लगेच वेगळी होईल.
10. कंद खाली आपटून जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे अशा प्रकारे हळदीची प्रतवारी करावी.
11. फक्त हे करताना कंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
12. याच्यामधून आपल्याला प्रती एकरी 130 ते 150 क्विंटल ओल्या हळदीचे तर 25 ते 30 किलो वाळळ्या हळदीचे उत्पादन मिळते.
13. हळद काढणी नंतर 15 दिवसाच्या आत प्रक्रिया करावी. यामुळे रिकवरी आणि हळदीची क्वालिटी चांगली भेटते.



Conclusion | सारांश –

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, Krushi Doctor वेबसाइट वर सांगितल्या प्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने हळद पिकाची काढणी करून पुढील प्रक्रिया जशा की हळद शिजवणे, पॉलिश करणे व हळद किंवा हळद पावडरची निर्मिती इत्यादि कराव्यात. “जाणून घ्या हळद काढणी पद्धत (turmeric harvesting): A to Z माहिती” ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडल्यास शेयर नक्की करा. धन्यवाद !!!

( हळद पिकाप्रमाणेच आमची इतर महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. हळद काढणी कधी करावी?
– हळद पिकाची काढणी ही लागवडीपासून 8 ते 9 महिन्यानंतर करावी.
– हळद पिकाचे वरील सर्व पाने पिवळी पडून खाली पडणे हे हळद काढणीला आल्याचे उत्तम लक्षण आहे.

2. हळद कशी गोळा केली जाते?
– हळद काढणीला आल्यानंतर वरील पाने कापून घेऊन कुदळ किंवा ट्रॅक्टर चलित अवजाराच्या मदतीने हळद काढणी करावी.
– व नंतर मजूराच्या मदतीने कंद एकत्र करून क्वालिटी नुसार प्रतवारी करावी.
– कंद काढणी करताना कंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

3. माझी हळद पिवळी का होत आहे?
– हळद पिकाची पाने पिवळी पडणे हे अन्नद्रव्य कमतरतेचे लक्षण आहे.
– माती परीक्षण अहवालाच्या मदतीने हळदीचे खत व्यवस्थापन करावे.
– सोबतच जमिनीला अति पानी देणे किंवा पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव हे देखील हळद पिकाची पाने पिवळी पडण्याचे एक लक्षण असू शकते.

4. हळदीची पाने खाऊ शकतात का?
– तस पाहिल तर हळदीची पाने खाल्याने काही परिणाम होणार नाही पण सध्या हळद पिकावर होत असलेला कीटकनाशक व बुरशीनाशकांचा बेसुमार वापर पाहता पाने खाणे टाळावे.

5. हळदीची कोणती जात सर्वोत्तम आहे?
– तश्या हळदीच्या बऱ्याच जाती उत्तम आहेत पण प्रमुख पाहिल्या तर सेलम, प्रभा, प्रतिभा आणि कृष्णा या आहेत.

6. भारतात हळदी कधी पिकवायची?
– हळदीचे पीक हे मार्च पासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यन्त लागवड केले जाते.



लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत (इर्लेकर)
मो – 9168911489


शेयर करा