शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळी (tomato fruit borer) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही अळी नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि या अळीच्या नियंत्रण साठी कोणती रासायनिक (tomato fruit borer insecticides) औषधे आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
अळीचे शास्त्रीय नाव –
हेलिकोवर्पा आर्मिजेरा
साधारणतः चार अवस्था असतात | tomato fruit borer life cycle –
1. अंडी, अळी, कोष आणि प्रौढ.
2. अंडी पिवळसर रंगाची असतात.
3. अळी सुरवातीला हिरव्या रंगाची असते. नंतर ती तपकिरी रंगाची होते. अंगावर राखाडी किंवा पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात.
4. कोष हा तपकिरी रंगाचा फळांच्या अवशेषात किंवा जमिनीत आढळतो.
5. पतंग फिकट पिवळसर किंवा फिकट हिरव्या रंगाचा असतो.
6. जीवनक्रम 25-30 दिवसात पूर्ण होतो.
यजमान पीके | Host Plants –
जवळजवळ 158 पिकावर उपजीविका करते. उदा – टोमॅटो, मिरची, भेंडी, कोबी वर्गीय पीके, वाल आणि घेवडा इत्यादि.
आर्थिक नुकसान पातळी | Economic threshold level –
एक अळीचा पतंग प्रति मीटर रांगेत किंवा 2 टक्के नुकसान.
नुकसानीचा प्रकार | Damage type –
1. एक अळी ही 2 ते 8 फळांचे नुकसान करू शकते. जवळपास ही कीड 70-80 टक्के नुकसान करते.
2. टोमॅटो पिकात अळी अवस्थेतील किड शेंड्यांची किंवा रोपांची पाने खाते.
3. नंतर टोमॅटो अपरिपक्व अथवा पक्व किंवा लहान फळांना बीळपाडते.
4. टोमॅटो फळात विष्ठा टाकतात त्यामुळे टोमॅटो फळे खराब होतात, सडतात व त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ होऊन पिकात रोगाची लागण होते.
टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक नियंत्रण | tomato fruit borer IPM –
1. पुनर्लागवड वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. तसेच झेंडू लावावा.
2. लागवडीनंतर 40-45 दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक 1 लाख प्रतिहेक्टर या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा सोडावे. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात. परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होते.
3. फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणाऱ्या विषाणू चां वापर करता येतो. हेलीकोव्हर्पा न्यूक्लिअर पाॅलिहायड्रॉसीस व्हायरस (एचएएनपीव्ही) 1 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे उन्हे कमी झाल्यानंतर संध्याकाळी फवारणी करावी.
4. 5 टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन (3000 पीपीएम) 2 मि.लि प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
5. बी. टी. जीवाणूजन्य कीटकनाशक 2 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात करावी.
6. शेतात एकरी 5 या प्रमाणात कामगंध सापळे लावावे.
वेळोवेळी किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाडून टाकावीत.
रासायनिक नियंत्रण | tomato fruit borer insecticides –
1. क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 18.5 SC – 0.3 मिली ( कोराजन, एफएमसी )
2. सायान्ट्रानिलीप्रोल 10.26% OD – 1.8 मिलि ( बेनेव्हीया, एफएमसी )
3. फ्लुबेन्डामाइड 20% WDG – 0.5 ग्राम ( टाकुमी, टाटा )
4. इंडोक्झाकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि ( किंगडोक्सा, घरडा केमिकल्स )
5. क्विनालफॉस 25 ई सी – 2 मिलि ( धानुलक्स, धानुका )
(टीप – या पैकी कोणतेही कीडनाशक आलटून पालटून किडीचा प्रादुर्भाव अनुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)
टोमॅटो वरील कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी | precautions for tomato fruit borer insecticides –
रसशोषक किडींचा उद्रेक टाळणे, किडींमध्ये कीटकनाशकांप्रती प्रतिकारक क्षमता वाढीस लागू नये, तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तीस विषबाधा होऊ नये, इ. साठी खालील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
1. पीक वाढीच्या सुरुवातीच्या 60 दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
2. एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
3. त्वचेला हानी, इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हाताने हाताळू नयेत. हात मोज्यांचा वापर करावा.
4. श्वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाधा होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा.
5. फवारणीचे तुषार/शिंतोडे डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे.
6. विषबाधेची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करून घ्यावेत.
Conclusion | सारांश –
शेतीकरी मित्रांनो, आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा tomato fruit borer insecticides: टोमॅटो पिकातील फळ पोखरनारी अळी नियंत्रण हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. वरील माहितीनुसार आपण जर टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या टोमॅटो पिकाचे नियोजन केले तर टोमॅटो पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह अतिशय चांगले उत्पादन घेऊ शकतो.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. टोमॅटो अळी नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – टोमॅटो पिकावर येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करू शकता. या साठी सुरुवातीपासून कामगंध सापळे, खत व्यवस्थापन, तन व्यवस्थापन आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यावर शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करू शकता.
2. टोमॅटोमध्ये फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणते कीटकनाशक चांगले आहे?
उत्तर – टोमॅटोमध्ये फळ पोखरणाऱ्या आळीसाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 SC – 0.3 मिली ( कोराजन, एफएमसी ), सायन्ट्रॅनिलीप्रोल 10.26% OD – 1.8 मिलि ( बेनेव्हीया, एफएमसी ), फ्लुबेन्डामाइड 20% WDG – 0.5 ग्राम ( टाकुमी, टाटा ), इंडोक्झाकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि ( किंगडोक्सा, घरडा केमिकल्स ) किंवा क्विनालफॉस 25 ई सी – 2 मिलि ( धानुलक्स, धानुका ). दिलेले प्रमाण ही एक लीटर पाण्यासाठी आहे.
3. टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर – टोमॅटो फळ पोखरणाऱ्या अळीचे शास्त्रीय नाव हे – निओल्युसी नोड्स एलिगंटालिस लेपिडॉप्टेरा आहे.
4. टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीसाठी सापळा पीक कोणते आहे?
उत्तर – टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीसाठी तुम्ही झेंडू किंवा मका पिकाची लागवड करू शकता.
लेखक –
K Suryakant