शेयर करा

tomato fruit borer

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर ( Krushi Doctor ) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “टोमॅटो अळी नियंत्रण ( tomato fruit borer ) साठी मार्केटमधील बेस्ट 5 कीटकनाशके” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –

आळीचे शास्त्रीय नाव –  हेलिकोवर्पा आर्मिजेरा

यजमान पीके – जवळ-जवळ 158 पिकावर उपजीविका करते. उदा – टोमॅटो, मिरची, भेंडी, कोबिवर्गीय पीके, वाल आणि घेवडा इत्यादि



एकात्मिक नियंत्रण ( tomato fruit borer ) –

  1. खोल नांगरट करून पिकाची लागवड करावी.
  2. प्रादुर्भाव ग्रस्त फळे वेचून नष्ट करावीत.
  3. प्लॉट शक्य तितका तनमुक्त ठेवावा.
  4. प्लॉट मध्ये एकरी 5 कामगंध सापळे लावावेत.
  5. त्यामध्ये हेलील्युर चा वापर करावा.

जैविक नियंत्रण ( tomato fruit borer biological control ) –

  1. ट्रायकोग्राम चिलोनिस या मित्र किटकाचे संवर्धन करावे.
  2. एच.ए. एन. पी. व्ही. या विषानूची फवारणी करावी. ( 200 मिलि / 200 लीटर पानी / एकर )
  3. सुरुवाती अवस्थेमध्ये निंबोळी अर्क 5 % किंवा अझाडीरेक्टिन 3000 पीपीएम – 3 मिलि / लीटर पानी
  4. ब्युवेरिया बसियाना 5 ग्राम / लीटर पानी फवारणी घ्यावी.

रासायनिक नियंत्रण ( tomato fruit borer chemical control ) –

  1. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 sc – 0.3 मिलि ( कोराजन, एफएमसी )
  2. सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD – 1.8 मिलि ( बेनेव्हीया, एफएमसी )
  3. फ्लुबेन्डामाइड 20% WDG – 0.5 ग्राम ( टाकुमी, टाटा )
  4. इंडोक्साकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि ( किंगडोक्सा, घरडा केमिकल्स )
  5. क्विनलफॉस 25 ईसी – 2 मिलि ( धानुलक्स, धानुका )

( टोमॅटो प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )



सोबतच काही स्मार्ट टिप्स –

1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
3. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
5. फवारणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.

Conclusion | सारांश –

शेतीकरी मित्रांनो, आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा “टोमॅटो अळी नियंत्रण ( tomato fruit borer ) साठी मार्केटमधील बेस्ट 5 कीटकनाशके” हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. वरील माहितीनुसार आपण जर टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या टोमॅटो पिकाचे नियोजन केले तर टोमॅटो पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह अतिशय चांगले उत्पादन घेऊ शकतो.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. टोमॅटो अळी नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – टोमॅटो पिकावर येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करु शकता. या साठी सुरुवातीपासून कामगंध सापळे, खत व्यवस्थापन, तन व्यवस्थापन आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यावर शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करू शकता.

2. टोमॅटोमध्ये फळ पोखरणाऱ्या आळीसाठी कोणते कीटकनाशक चांगले आहे?
उत्तर – टोमॅटोमध्ये फळ पोखरणाऱ्या आळीसाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 sc – 0.3 मिलि ( कोराजन, एफएमसी ), सायन्ट्रानिलिप्रोल 10.26% OD – 1.8 मिलि ( बेनेव्हीया, एफएमसी ), फ्लुबेन्डामाइड 20% WDG – 0.5 ग्राम ( टाकुमी, टाटा ), इंडोक्साकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि ( किंगडोक्सा, घरडा केमिकल्स ) किंवा क्विनलफॉस 25 ईसी – 2 मिलि ( धानुलक्स, धानुका ). दिलेले प्रमाण ही एक लीटर पाण्यासाठी आहे.

3. टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर – टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीचे शास्त्रीय नाव हे – निओल्युसिनोड्स एलिगंटालिस लेपिडोप्टेरा आहे.

4. टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीसाठी सापळा पीक कोणते आहे?
उत्तर – टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीसाठी तुम्ही झेंडू किंवा मका पिकाची लागवड करू शकता.

5. टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीचे जीवन चक्र काय आहे?
उत्तर – टोमॅटो फळ पोखरणाऱ्या आळीचा जीवन चक्र हा पुढील प्रमाणे – अंडी – आळी – कोश आणि पतंग.



लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
मो. 9168911489


शेयर करा