शेयर करा

sugarcane rust control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकातील तांबेरा या रोगाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये तांबेरा रोग (sugarcane rust) नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि तांबेरा रोगाच्या नियंत्रण (sugarcane rust control) साठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. ऊस पिकापासून उत्पादन घेण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
2. ऊस पिकावर विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
3. यापैकी एक रोग आहे – तांबेरा रोग (sugarcane rust). या रोगामुळे ऊसाच्या पानावर लाल ठिपके
दिसतात.
4. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर 30 ते 80 टक्के परिणाम होतो. त्यामुळे हा तांबेरा रोग (sugarcane rust) आपण वेळीच रोखला पाहिजे.
5. आज या लेखाद्वारे आपण शेतकऱ्यांना ऊस पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य उपाययोजना सांगणार आहोत.
6. ज्याचा अवलंब करून शेतकरी पिकापासून योग्य उत्पादन घेऊ शकतात.



तांबेरा रोगाची लक्षणे | sugarcane rust symptoms –

1. ऊसाच्या पानावर दिसुन येणारा हा बुरशीजन्य रोग आहे.
2. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूला होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात.
3. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्याचा रंग लालसर तपकिरी होतो.
4. ठिपक्याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्याच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात.
5. असे ठिपके फुटुन नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. तांबेरा ग्रस्त पाने हातावर चोळल्यास बिजाणूची पावडर पडते.
6. हवेद्वारे या बिजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो.
7. पानावरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरुन जाऊन पाने करपलेली दिसुन येतात.
8. प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने ऊसाचे उत्पादन घटते.

तांबेरा रोगाचा प्रसार | sugarcane rust spread –

1. ऊसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरूपात असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्वाचे व अनुकुल घटक आहे.
2. पानावर ओलसरपणा असताना बीजाणू रुजुन बुरशी तयार होते.
3. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यापासुन 3 ते 4 दिवसात पानावर रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो.
4. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो.
5. तसेच या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो.
6. काही ठिकाणी मान्सुनचा पाऊस संपल्यानंतर पानावर आढळणार्‍या रोगांचा प्रार्दुभाव कमी होत गेलेला आढळून येतो.

तांबेरा रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण | favorable climate for sugarcane rust –

1. जुलै ते सप्टेंबर पर्यंत असण्यार्‍या मान्सुन पावसामुळे वाढणारी हवेतील सापेक्ष आर्द्रता साधारण 80-90%,
ढगाळ उष्ण व दमट वातावरण,वाहणारे वारे आणि सकाळचे धुके व पडणारे दव
2. बळी पडणार्‍या रुंद पानाच्या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड
3. नत्रयुक्त खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर
4. ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ (3-7 महिन्याचा ऊस)
5. ऊशीरा एप्रिल ते मे महिन्यात व योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत झालेली ऊस लागवड
6. खोडवा पिकात रोगाची तीव्रता लागणीच्या पिकापेक्षा जास्त दिसून येते.
7. सखल भागात पाणी साचणे.

तांबेरा रोगाचे नियंत्रण | sugarcane rust control –

1. मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भाव याबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करुन प्रतिबंधक शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
2 .जमिनीत पुनर्लागवड करावयाची असल्यास पूर्वी तुटून गेलेल्या उसाचे अवशेष गोळा करुन त्यांचा नायनाट करावा.
3. ऊसातील रोगग्रस्त पाने काढुन नष्ट करावी.
4. निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
5. रोग प्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी. (को 86032)
6. योग्य निचरा होणार्‍या जमिनीत ऊस लागवड करावी.
7. लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास ऊसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
8. नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
9. पावसाळ्यात जास्त काळ पाणी साचलेल्या ऊस भागातील पाण्याचा निचरा करावा.
10. सामूहिक पद्धतीने रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना अवलंबन करावे.



रासायनिक उपाय | sugarcane rust chemical control

1. पिकावरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी अबिक, सिजेंटा, मॅन्कोझेब अथवा धानुकोप, धानुका, कॉपर ऑक्सीक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के (3 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात घेऊन 15 दिवसाच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात.

2. ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 3 ग्रॅम/लि.पाणी अबिक, सिजेंटा, मॅन्कोझेब किंवा फोलिकुर, बायर, टेबुकोन्याझोल 1 मिली प्रति लिटर किंवा अंट्रॅकॉल, बायर, प्रोपिनेब 2.5 ग्रॅम/लि.पाण्यामध्ये मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा ऊस या पिकातील तांबेरा रोगाचे (sugarcane rust) नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. तांबेरा रोगास उसाच्या कोणत्या जाती बळी पडतात?
उत्तर – को 419, कोसी 671, कोव्हीएसआय 9805, को 92005, एम एस 10001, व्हीएसआय 434 आणि कोएम 0265 या जाती जास्त बळी पडतात. अलीकडेच को 86032 या जातीवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

2. तांबेरा रोगाचा प्रसार कशा मार्फत होतो?
उत्तर – तांबेरा रोगाचा प्रसार हवा, पाणी, पाऊस व कीटकांद्वारे होतो.

3. तांबेरा रोग कोणत्या हवामानात आढळतो?
उत्तर – जुलै ते डिसेंबर दरम्यान असलेल्या आर्द्रतायुक्त, उष्ण व दमट हवामानात हा रोग आढळून येतो.

लेखक,

K Suryakant


शेयर करा