शेयर करा

sugarcane frp

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण केन्द्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाढवलेल्या उसाच्या FRP (Fair and remunerative price | sugarcane FRP) म्हणजेच किमती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.



प्रस्तावना –

शेतकरी बांधवांनो नमस्कार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने कमिशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राईस यांच्या शिफारशीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाचा एफआरपी (sugarcane FRP) वाढवण्याच्या निर्णयावर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्र सरकारच्या या उसाची एफ आर पी (sugarcane frp) वाढवण्याच्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. खास करुन उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत उसाचा एफआरपी वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. उसाच्या एफआरपीमध्ये 10 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना किती एफआरपी (sugarcane frp) मिळेल ?

केन्द्र सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या एफआरपीमध्ये 305 वरून वाढ होऊन 315 रुपयांची वाढ प्रतिक्विंटलमागे होणार आहे. विशेष करुन या वर्षीच्या ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गळीत हंगामापासून हा निर्णय लागू होणार आहे.



sugarcane FRP चा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला फायदा –

1. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. उत्तर प्रदेशातील लाखो शेतकरी ऊस उत्पादक आहेत.
2. मागील वर्षी म्हणजेच 2022-23 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये 28.53 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती.
3. तर त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या असून या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.
4. महाराष्ट्रातही मागील वर्षी 14.9 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती.
5. त्यामुळे भारतात 62 लाख हेक्टर त्यावर ऊस लागवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऊस एफआरपी प्रमाणेच ऊसाला तुरा का येतो याचे कारण जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

sugarcane FRP मध्ये 10 वर्षात हजारावर दरवाढ –

केंद्रशासन उसाच्या एफआरपी (sugarcane frp) मध्ये सातत्याने वाढ करत आहे. सन 2013-14 या हंगामात प्रति टन 2100 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. 2017-18 या हंगामात 2500 रुपये मिळू लागले. तर आता आगामी हंगामात 3150 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा ऊस एफआरपी (sugarcane frp) बद्दल संपूर्ण माहिती हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि ऊस पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1) उसासाठी एफआरपीची शिफारस कोण करते?
उत्तर – याची शिफारस कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (CACP) केली आहे आणि आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समिती ने (CCEA) मान्यता दिली आहे.

2) केंद्रीय मंत्रिमंडळाने उसासाठी 2023 – 24 साठी किती एफ आर पी निश्चित केला आहे ?
उत्तर – केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 315 रुपये प्रति क्विंटल या आतापर्यंतच्या सर्वोच्च रास्त आणि फायदेशीर भावाला मान्यता दिली आहे.

3) कोणती संस्था उसाच्या रास्त आणि मोबदल्याला मान्यता देते?
उत्तर – केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 315 रुपये प्रति क्विंटल या आतापर्यंतच्या सर्वोच्च रास्त आणि फायदेशीर भावाला मान्यता दिली आहे.



लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा