शेयर करा

sugarcane flower

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वरील एका नवीन लेखामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऊस पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. आणि यामध्ये आपण पाहणार आहोत “उसाला तुरा का येतो (sugarcane flower)? जाणून घ्या अचूक उत्तर आणि ठोस उपाय“.  उसाला तुरा आल्यानंतर कोणते नुकसान होते व हा तुरा येऊ नये म्हणून आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला देखील हा प्रश्न भेडसावत असेल तर हा लेख नक्की वाचा आणि तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकरी मित्रांबरोबर शेयर देखील करा.



उसाला तुरा (sugarcane flower) येणे योग्य की अयोग्य –

1. शेतकरी मित्रांनो उसाला तुरा येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
2. ऊस पूर्ण परिपक्व झाला की उसाला पुढील पिढी निर्माण करण्यासाठी आणि बीज धारणेसाठी फुलोरा अवस्था येते.
3. ऊसाचे एक नवीन वान तयार करण्याच्या दृष्टिकोनातून उसाला तुरा येणे ही बाब खूप महत्वाची आहे.
4. परंतु तुम्ही जर फक्त शेतकरी असाल आणि तुमच्या उसावर तुरा हा 2 ते 3 महिन्यापासून जास्त काळ असेल तर तुमचे नक्कीच नुकसान होऊ शकते.
5. कारण उसाला तुरा आल्यानंतर कालांतराने ऊसा मधील साखरेचे ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थामध्ये रूपांतन होते.
6. परिणामी आपल्या ऊसाचे वजन कमी भरणे, रिकवरी कमी लग्ने अश्या समस्या येऊ शकतात.
7. त्यामुळे तुम्ही जर फक्त एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या उसावर तुरा न आलेलाच बरा.

उसावर तुरा (sugarcane flower) येण्यामागची कारणे –

क) ऊसाच्या जाती –

1. उसाला तुरा येण्याची प्रक्रिया बऱ्याच अंशी ही अनुवंशीक असू शकते.
2. आपण जातीमध्ये पाहिल तर CO 7219, COC 671 , CO9412 या जातीमध्ये उसाला तुरा लवकर येतो.
3. व CO 740, CO 7125, CO 8014, CO 265 या जातीमध्ये तुरा थोडा उशिरा येतो.

ख) पोषक हवामान –

1. दिवसाचे तापमान 26 ते 28 अंश से, रात्रीचे तापमान 22 ते 23 अंश से., हवेतील आर्द्रता 65 ते 90 %, दिवसाचा प्रकाश काळ 12.30 तास आणि प्रकाश्याची तीव्रता 10 ते 12 हजार फूट कॅंडल अशी अवस्था जर सलग 10 ते 15 दिवस राहिली तर उसाला पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये तुरा येण्याची दाट शक्यता असते.
2. सोबतच मातीमधील ओलाव्याचे प्रमाण, पोषणद्रव्यांची उपलब्धता, पानामधील ऑक्सिजन या गोष्टी देखील तुरा येण्यासाठी तितक्याच कारणीभूत असू शकतात.
3. त्यामुळे आपल्याला ऊस पिकामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये जास्त तुरा आलेला दिसून येतो.

ग) पाण्याचा अतिरेक –

1. पाण्याचा अवाजवी वापर करणे.
2. शेतामध्ये सतत पानी साचून राहणे.
3. जमिनीतून पाण्याचा पुरेसा निचरा न होणे.
4. या गोष्टी मुळे देखील उसाला तुरा येऊ शकतो.

घ) पाण्याचा तान पडणे –

1. खास करून डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात जर उसाला पाण्याचा तान पडला तर उसाला तुरा येण्याची शक्यता जास्त असते.

ड) नत्रयुक्त खतांचा कमतरता –

1. जर आपण ऊस पिकाला नत्र युक्त खते जसे की ( युरिया, अमोनिम सल्फेट ) यांच्या मात्रा वेळेवर नाही दिल्या किंवा आपुऱ्य दिल्या तर नक्कीच उसाला तुरा येण्याची शक्यता वाढते.
2. तसे पहिले तर आपल्याला ऊस पिकामध्ये माती परीक्षण करून त्या प्रमाणे खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

च) ऊस लागवडीचा प्रकार –

1. लागणी पेक्षा खोडवा उसाला आपल्याला तुरा जास्त आलेला दिसून येतो.
2. तसेच आपण जर एप्रिल किंवा जून मध्ये लागण केळी असेल तर त्यांना तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते.
3. पन आपण आडसाली लागवड केळी असेल तर तेथे तुम्हाला तुरा थोडा कमी आलेला दिसेल.

( ऊसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )



उसावर तुरा (sugarcane flower) येणे टाळायचे असेल तर काय करावे ?

1. ऊसाचे खत व्यवस्थापन हे नेहमी माती परीक्षण करूनच करावे.
2. उसाला गरजेनुसार मातीच्या मगदुराप्रमाणे पानी द्यावे. त्यासाठी शक्यतो ड्रीप चा वापर करावा.
3. नत्रयुक्त खतांचा पुरेसा पुरवठा करावा.
4. वेळेवर लागवड करावी.
5. लागवडीसाठी तुरा प्रतिकारक जातींची निवड करावी.
6. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा.
7. पानी निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना कराव्यात.
8. शेतामध्ये पानी साचुन राहू देऊ नये.

Conclusion | सारांश –

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण Krushi Doctor Website वरील “उसाला तुरा का येतो (sugarcane flower)? जाणून घ्या अचूक उत्तर आणि ठोस उपाय” या माहितीनुसार आपण जर आपल्या ऊस पिकाचे नियोजन केले तर आपण देखील सहजपणे कमी खर्चासह ऊस पिकातील तुरा येणे या समस्येवरती मात करू शकतो. तसेच तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या इतर ऊस उत्पादक मित्रांसोबत ही माहिती शेयर करा.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. ऊस कोणत्या महिन्यात काढला जातो?
उत्तर – ऊस काढणी ही प्रामुख्याने लागवड लागवडीच्या तारखेवर अवलंबून असते. आपण लागवड तारखा जर पाहिल्या तर – सुरु लागवड ही – 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी, पुर्वहंगामी लागवड ही – 15 ऑक्टोंबर ते 15 नोंव्हेबर आणि आडसाली लागवड ही – 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केली जाते. म्हणजेच यांची काढणी ही ऊस पूर्णपणे परिपक्व झाल्यावर करणे आवश्यक आहे. हा पक्वता कालावधी देखील वेग-वेगळा असू शकतो. उदा – 11 ते 16 महीने.

2. ऊसाची काढणी कशी होते?
उत्तर – ऊसाची काढणी ही तुम्ही मंजुरच्या सहाय्याने किंवा मशीनच्या सहाय्याने देखील करू शकता. याच्या मध्ये ऊस जमिनीलगत कापला जातो. आणि वरील पानाचा भाग देखील काढून टाकला जातो. व मधला परिपक्व ऊस गाळपासाठी वेगळा केला जातो.

3. ऊस तोडणी कधी करावी?
उत्तर – ऊस तोंडणी ही प्रामुख्याने लागवड लागवडीच्या तारखेवर अवलंबून असते. आपण लागवड तारखा जर पाहिल्या तर – सुरु लागवड ही – 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी, पुर्वहंगामी लागवड ही – 15 ऑक्टोंबर ते 15 नोंव्हेबर आणि आडसाली लागवड ही – 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान केली जाते. म्हणजेच यांची काढणी ही ऊस पूर्णपणे परिपक्व झाल्यावर करणे आवश्यक आहे. हा पक्वता कालावधी देखील वेग-वेगळा असू शकतो. उदा – 11 ते 16 महीने.

4. ऊस कुठे पिकतो?
उत्तर – जगात पाहिल तर ब्राजील या देशाचा ऊस उत्पादनामध्ये पहिलं नंबर लागतो. आणि त्यानंतर भारताचा. आणि विशेषता भारतामध्ये पाहिल तर महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, गुजरात आणि हरियाणा या प्रमुख राज्यामध्ये ऊस पिकाची शेती केली जाते.

5. उसाचा रस रिकाम्या पोटी पिणे चांगले का?
उत्तर – नक्कीच, आपण जर उपाश्या पोटी जर ऊसाच्या रसाचे सेवन केले तर आपले पचन सुधारते व आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.



लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत (इर्लेकर)
मो. 9168911489


शेयर करा