शेयर करा

seed treatment

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये बीज प्रक्रिया (seed treatment) म्हणजे काय , बीज प्रक्रिया कोणत्या पिकात करतात, बीज प्रक्रिया करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत या विषयी अधिक माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

बीज प्रक्रिया म्हणजे काय? | What is seed treatment –

बियाणे जमिनीत पेरणीपुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवीण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीजप्रक्रिया असे म्हणतात.



बीज प्रक्रियेचे फायदे | Benefits of seed treatment –

1. जमिनीतुन व बियाणे द्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
2. बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
3. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
4. पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
5. कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते.

कोणत्या पिकामध्ये बीज प्रक्रिया करावी?

भुईमूग
सोयाबीन
गहू
बाजरी
ज्वारी
हरभरा
बटाटा
सूर्यफूल
कापूस इ.

बीज प्रक्रियेचे प्रकार | Types of seed treatment

👉जैविक बीज प्रक्रिया
👉भौतिक बीज प्रक्रिया
👉रासायनिक बीजप्रक्रिया

अ) जैविक बीजप्रक्रिया –

1. 125 ग्रॅम गुळाचे द्रावण एक लिटर गरम पाण्यात तयार करावे.
2. हे द्रावण थंडे झाल्यावर यामध्ये 200 ते 250 ग्रॅम जिवाणू मिसळावे.
3. 10 ते 12 किलो बियाण्यावर तयार केलेले द्रावण शिंपडावे.
4. शिंपडल्यावर ते हलक्या हाताने बियाण्याला चोळावे.
5. पहिले बुरशी नाशकाची प्रक्रिया करावी व त्यानंतर त्यावर रायझोबियम चे मिश्रण लावावे.
6. ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीचा देखील बीज प्रक्रिया साठी वापर करू शकतो.
7. एक किलो बियाणास जवळपास 30 ते 40 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर चोळावी.
8. हे बियाणे आपण 24 तासाच्या आत वापरावे.

ब) भौतिक बीजप्रक्रिया –

1. प्रथम 30 ग्रॅम मीठ प्रती 1 लिटर पाण्यात मिसळावे.
2. या पाण्यामध्ये बियाणे 5-10 मिनिटे बुडवावे.
3. दुषित बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झाल्यास ते काडून टाकावे.
4. रोगमुक्त बिया तळाशी जमा झालेले बियाणे, पेरणीसाठी वापरावे.



क) रासायनिक बीजप्रक्रिया –

👉बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे –
1. प्रथम 100 किलो बियाण्यांमध्ये साधारण 1 लिटर पाणी टाकून बियाणे एक मिनिट घोळून ओलसर करावे.
2. नंतर शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक टाकून पुन्हा हे बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळत राहावे.
3. अधिक प्रमाणात बियाणांवर प्रक्रिया करावयाची असल्याचे पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे.
4. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

👉बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी/पावडर चोळणे –
1. बियाणे किंचित ओलसर केल्यानंतर शिफारशींनुसार प्रतिकिलो बियाण्यासाठी योग्य प्रमाणात बुरशीनाशक टाकून बियाण्यास चोळावे.
2. प्रक्रिया करताना हातामध्ये रबर किंवा प्लॅस्टिक हातमोजे वापरावे. तोंडावर मास्क लावावा.
3. अधिक प्रमाणात बियाण्यांवर प्रक्रिया करावयाची असल्यास त्यासाठी यंत्र उपलब्ध आहेत. त्यात 100 किलो बियाण्यांमध्ये सुमारे 1 लिटर पाणी टाकून ते ओलसर बियाणे बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावेत.
4. त्यात शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक मिसळून 30 ते 40 वेळा फिरवावे.
5. बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी.
6. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
7. बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांड्यांच्या वापर करावा. त्याचे तोंड लगेच उघडू नये.
8. बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नयेत.
9. बीज प्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

👉कीटकनाशकांची प्रक्रिया –
1. विकत आणलेल्या बियाण्यांवर शक्यतो कंपनीद्वारे प्रक्रिया केलेली असते.
2. त्यासाठी बियाण्यांचे लेबल व्यवस्थित वाचून कोणत्या बीजप्रक्रिया केल्या आहेत, ते जाणून घ्यावे.
3. प्रक्रिया केलेली नसल्यास बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकांची प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची प्रक्रिया वर नमूद केलेल्या पद्धतीने करावी.
4. जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाचे पाकीट 10 ते 15 किलो बियाण्यास वापरावे.
5. 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन टाकून बियाण्यास लेप समप्रमाणात बसेल असे हळुवारपणे लावावे.
6. बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
7. बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धके बियाण्यास चोळावीत.
8. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे.
9. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी.

बीजप्रक्रियेचा हा क्रम लक्षात ठेवा | Sequence of seed treatment –

1. सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
2. कीटकनाशकाची प्रक्रिया.
3. त्यानंतर 3 – 4 तासांनी जैविक घटक (रायझोबिअम /अझेटोबॅक्टर) बीजप्रक्रिया करावी.
4. सर्वांत शेवटी पी.एस.बी.ची बीजप्रक्रिया करावी.

बीज प्रक्रियेसाठी बाजारात उपलब्ध असलेली औषधे | Product for Seed treatment –

1. फॉर्टेंझा ड्युओ (fortenza duo) – कॉर्न, सोया, कॅनोला/तेल-बियाणे रेप, सूर्यफूल, तांदूळ आणि कापूस.
2. एव्हरगोल (evergol) – भुईमूग, सोयाबीन
3. विटावॅक्स पॉवर (vitavax power) – गहू
4. क्रूझर सिंजेंटा (cruiser syngenta) – कॉर्न, सोयाबीन आणि कापूस
5. झेलेरो बुरशीनाशक (xelero fungicide) – शेंगदाणे, सोयाबीन
6. गौचो कीटकनाशक (gaucho insecticide) – कापूस, भेंडी, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, सोयाबीन

बीज प्रक्रिया करताना घ्यायची काळजी | Precautions for seed treatment –

1. बीज प्रक्रियेचा वेळेस वापरण्यात येणारे भांडे इतर गोष्टींकरता वापरण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
2. हातात बीज प्रक्रियेचा वेळेस हातमोजे घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
3. बीज प्रक्रिया केलेले बियाचा जनावर व माणसाच्या खाण्याकरीता वापर करू नये.
4. बीज प्रक्रियेसाठी लागणारी औषधे हे दिले त्या प्रमाणातच वापरावे. ते कमी पडल्यास रोगापासून हवे तेवढे संरक्षण मिळणार नाही.
5. ज्या बियाण्यावर प्रक्रिया केली आहे अशे बियाणे थंड व कोरड्या जागेत ठेवावे व बाब वाळवून पेरावे.
6. हे बियाणे हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिक पिशवीत ठेऊ नये.
7. सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषधी लागेल याची, काळजी घ्यावी घ्यावी.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा seed treatment: रब्बी हंगामात पेरणी करण्यापूर्वी अशी करा बीज प्रक्रिया आणि मिळवा भरघोस उत्पादन हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’S | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. बीज प्रक्रिया म्हणजे काय?
उत्तर – बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास रोग किडीचा प्रधुरभाव होऊ नये म्हणून त्यावर बुररशीनाशक व कीडनाशक हलक्या हाताने चोळून लावले जाते त्यास बीजप्रक्रिया असे म्हणतात.

2. बीज प्रक्रिया का करावी?
उत्तर – जमिनीतून व बियाण्या द्वारे पसरणाऱ्या रोगांचा उदा. मर रोग आणि मूळ कूज इ. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करावी.

3. जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करता येते का?
उत्तर – हो, जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करायची असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक 5 ते 10 मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे.

4. बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमता सुधारते का?
उत्तर – हो, जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यास उगवण क्षमता सुधारते तसेच खतामध्ये 25 – 30 % पर्यंत बचत होते.

5. रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करू शकतो का?
उत्तर – हो, रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे 1 ते 2 तास सावली मध्ये सुकवून जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करू शकतो.

लेखक

कृषि डॉक्टर सूर्यकांत


शेयर करा