शेयर करा

pm kisan samman nidhi

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण या लेखामध्ये आपण पीएम किसान योजना (pm kisan samman nidhi) याविषयी सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने pm kisan samman nidhi योजना नक्की काय आहे? त्या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे? या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे? पंतप्रधान किसान सन्मान निधी (kisan samman nidhi) साठी नोंदणी कशी करावी? या योजनेसाठी रजिस्टर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तसेच या योजने पासून किती लाभ मिळतो? वेबसाईटवर हप्ता जमा झाला आहे की नाही ते कसे चेक करायचे? याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

पीएम किसान योजनेचे (pm kisan samman nidhi) स्वरूप –

1. PM- Kisan म्हणजेच पीएम किसान योजना (pm kisan samman nidhi) जाणून घ्या संपूर्ण माहिती.
2. pm kisan samman nidhi yojana ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली.
3. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.
4. सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समावेश केला होता.
5. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.
6. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्याच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.



पीएम किसान योजना (pm kisan samman nidhi) आवश्यक पात्रता निकष –

1. आता सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.
2. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल आणि आपल्या आश्वासनानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देईल. 3. यापूर्वी या योजनेचा लाभ 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जायचा, मात्र आता सरकारने ही मर्यादा हटवली आहे.
4. फक्त भारतातील रहिवाशांना या योजनेचा लाभ मिळेल.
5. भारतात राहणाऱ्या कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
6. या योजनेचा (पीएम किसान निधी) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते असणे बंधनकारक आहे.
7. ज्याच्याकडे ते नाही, त्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी बँकेत खाते उघडावे लागेल.
8. अल्पभूधारक शेतकरी कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारने सांगितले आहे.
9. या एका कुटुंबाकडे एकूण 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तरच त्यांना योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळेल.

पीएम किसान योजनेचा (pm kisan yojana) लाभ कोणाला मिळत नाही ?

1. संविधानिक पदावर असणारे किंवा मंत्री असणारे शेतकरी
2. नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधान परिषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
3. केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
4. प्राप्तिकर भरणारे शेतकरी
5. 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
6. डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकील.



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( pm kisan yojana ) योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये सरकारने पहिल्या टप्प्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
2. मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड यासारखे इतर ओळखपत्रे लाभार्थ्याला त्याची ओळख द्यावी लागेल.
3. लाभार्थ्याने त्याचा बँक तपशील, खाते क्रमांक, IFSC कोड, तसेच बँक पासबुकची प्रत सादर करावी लागेल.
4. पहिल्या टप्प्यात मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक नसून, त्यानंतरच्या टप्प्यात ते देणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक मिळताच त्याला अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल, जेणेकरून ते डेटा अपडेट करू शकतील, जेणेकरून योजनेशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर वेळेवर मिळू शकेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) साठी नोंदणी कशी करावी ? | Pm kisan registration

1. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित देशातील इच्छुक लाभार्थींनी खाली दिलेल्या पद्धतीचे पालन करून या योजनेचा लाभ घ्यावा.
2. सर्व प्रथम, अर्जदारास योजनेच्या http://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
3. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर उघडेल.
4. या मुख्य पृष्ठावर आपल्याला शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.
5. यापैकी तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
6. या फॉर्ममध्ये आपल्याला आपला आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि विचारलेल्या सर्व माहिती पूर्ण कराव्या लागतील.
7. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
8. पुढे, नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी जतन करा.
9. अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.
10. सर्व माहिती मोबाईलवर वेळेवर मिळू शकेल.



pm kisan nidhi योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही कसे पहाल ? | Pm kisan status check

1. तुमच्या खात्यात PM-Kisan चा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा http://pmkisan.gov.in या वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.
2. ते कसं तर यासाठी Farmer Corner मधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
3. त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.
4. या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.
5. आतापर्यंत PM-Kisan चे 13 (pm kisan samman nidhi 13 kist) हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

पीएम किसान योजनेची ऑनलाइन ekyc कशी करावी ?

1. जे शेतकरी इंटरनेट माध्यमांचा वापर करतात किंवा त्यांना ऑनलाइन पोर्टलचे थोडेसे ज्ञान आहे, ते स्वतःही ऑनलाइन माध्यमातून केवायसी करु शकतात.
2. ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जावे लागेल.
3. या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
4. E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
5. यानंतर PM किसान सन्मान निधी शी (pm kisan nidhi)लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
6. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.



पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्या बाबत महत्त्वाचे अपडेट | pm kisan status

1. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
2. शेतकरी आता १४ व्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत आहेत.
3. शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही.
4. माध्यमातील रिपोर्टनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.
5. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
6. त्याशिवाय त्या शेतकऱ्यांकडे जमीन असणे आवश्यक आहे.
7. पीएम किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची रक्कम २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
8. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती.
9. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.

पीएम किसान बद्दल शेतकरी आपली तक्रार कुठे करू शकतात ?

1. प्रधानमंत्री किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी www.pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
2. तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील पीएम किसान योजना (pm kisan samman nidhi) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. पीएम सन्मान निधी योजना म्हणजे काय?
उत्तर – ही एक सरकारी योजना आहे ज्याद्वारे, सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून प्रति वर्ष 6,000 रुपयांपर्यंत मिळेल.

2. मी माझी लाभार्थी स्थिती कशी तपासू ?
उत्तर – जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही www.pmkisan.gov.in वर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्डद्वारे पीएम किसान स्टेटस 2023 तपासा.

3. पीएम किसान 14 वा हप्ता जमा झाला आहे का?
उत्तर – या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा हप्ता जमा झाला होता . या गणनेनुसार, पीएम मोदी 30 जूनपूर्वी 14 वा हप्ता जारी करू शकतात.

4. किसान सन्मान निधीसाठी मी ऑनलाइन अर्ज कसा करू शकतो?
उत्तर – www.pmkisan.gov.in वर भेट देऊन तुम्ही PM किसान योजनेत स्वतः ची नोंदणी करू शकता.

5. पीएम किसान साठी कोण पात्र नाहीत?
उत्तर – PM-KISAN मधून वगळण्यात आलेल्यांमध्ये संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदे असलेले शेतकरी कुटुंबे, राज्य किंवा केंद्र सरकारचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्था यांचा समावेश आहे.



लेखक –

कृषी डॉक्टर
9168911489


शेयर करा