शेयर करा

 

pik vima online 2023

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पिक विमा योजना (1 rupayat pik vima/pik vima online) याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना (pantpradhan pik vima yojana) काय आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता केवळ 1 रुपयांत पिक विमा (pik vima online) मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती. यासाठी अंदाजे 3312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.
महाराष्ट्र राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा सारखी होणारी अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.

1 रुपयात पिक विमा (1 rupayat pik vima) योजना कशी राबविण्यात येईल?

सर्वसमावेशक पिक विमा योजना ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन
वर्षांच्या कालावधीत Profit & Loss Model किवा Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्याकरिता मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या दि.04.05.2023 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार परिच्छेद 3 मध्ये नमूद बाबींचा समावेश करुन, निविदा प्रक्रीया राबविण्यात येईल.

प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने Profit & Loss Sharing Model व Cup & Cap Model (80:110) या पर्यायांपैकी उचित पर्यायांसह (Model) योजना राबवण्यासाठी मान्यता देण्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आला आहे.



पिकाला विम्याचे संरक्षण देण्याकडे कल | pm pik vima yojana objectives in marathi –

1. राज्यात मागील रब्बी हंगामात पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 18 कोटी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती.
2. यंदा पावसाने ओढ दिली असल्याने खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
3. अनेक ठिकाणी पिकांचे उत्पादन घटले असून, त्या बदल्यात विमा कंपन्यांकडून 25 टक्के आगाऊ भरपाई दिली जात आहे.
4. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशी आहे अंतिम मुदत | pik vima online last date | vima last date –

हंगाम आणि पिके अंतिम मुदत
रब्बी ज्वारी 31 नोव्हेंबर 2023
बागायत गहू, हरभरा आणि रब्बी कांदा 15 डिसेंबर 2023
उन्हाळी भात व भुईमूग 31 मार्च 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे | pik vima online documents in marathi –

1. सातबारा उतारा, खाते उतारा
2. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
3. आधार कार्ड
4. घोषणा पत्र

पिक विमा कंपन्याची यादी पहा |pik vima online company list in maharashtra 2023 –

क्रमांक जिल्हे विमा कंपनीचे नाव
1 अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
2 परभणी, वर्धा, नागपूर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
3 जालना, गोंदिया, कोल्हापूर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
4 नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
5 औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
6 वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार भारतीय कृषी विमा कंपनी
7 हिंगोली, अकोला, धुळे, पुणे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
8 यवतमाळ, अमरावती, गडचिरोली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
9 उस्मानाबाद एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
10 लातूर एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
11 बीड भारतीय कृषी विमा कंपनी

खालील बाबतीत पीक विमा लागू –

1. जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान
3. पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ व चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूसंख्यलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात होणारी घट.
4. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
5. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

पीक विमा ऑनलाइन अर्ज कसा करावा? pik vima online arj kasa karava –

स्टेप क्रमांक कृती
Step 1 सर्वप्रथम तुम्हाला PMFBY योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Step 2 वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Dashboard मध्ये Farmer Corner या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
Step 3 त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, त्यावर तुम्हाला खाली असलेल्या हिरव्या बटणावर म्हणजेच Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Step 4 मग तुमच्या समोर अजून एक पेज येईल, तेथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करायची आहे.
Step 5 नोंदणी साठी तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर Address आणि बँकेचे Details अशी सर्व माहिती भरायची आहे.
Step 6 शेवटी Capthcha टाकून, Create User या बटनावर क्लिक करायचे आहे.
Step 7 मग तुमच्या समोर पिक विम्याचा फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यात बँकेची माहिती न चुकता टाकायची आहे.
Step 8 मग सांगितलेल्या सूचनांचे पालन करून, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे. शेतीत पीक कोणते लावले आहे, ते टाकायचे आहे क्षेत्र निवडायचे आहे.
Step 9 मग संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पाहून, एखादी चूक झाली असेल तर दुरुस्त करायची आहे. मग 1 रुपये चे (pik vima 2023) Payment करायचे आहेत.
Step 10 त्यानंतर पिक विमा फॉर्म Submit करायचा आहे, अशा रीतीने तुम्ही तुमचा पिक विमा फॉर्म भरू शकणार आहात.

अतिरिक्त रक्कम आकारल्यास करा संपर्क | pik vima online complaint –

1. पीक विमा योजनेत सहभागाच्या नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र धारकांना विमा कंपनीमार्फत चाळीस रुपये प्रति अर्ज देण्यात येतात.
2. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी व्हावे.
3. कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेमार्फत विहीत नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
4. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसल्यास त्याने बँकेला लेखी कळविणे गरजेचे आहे.
5. या योजनेत सहभाग घेताना अडचणी आल्यास किंवा सामूहिक सेवा केंद्राकडून अतिरिक्त रक्कम मागितल्यास पीक विमा कंपनीचे कार्यालय, जवळची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील 1 रुपयात मिळणार पिक विमा (1 rs pik vima) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. पीक विम्याचा हप्ता किती आहे?
उत्तर – शेतकऱ्यांना आता फक्त नवीन पिक विमा योजनेनुसार फक्त 1 रुपया पीक विमा (1 rupayat pik vima) भरावा लागेल.

2. पीक विम्याची गरज काय?
उत्तर – पीक विमा हे पीक अपयश/निष्‍ठित किंवा त्यांच्या नियंत्रणाबाहेरील सर्व अनपेक्षित संकटांमुळे उद्भवणार्‍या अनिश्चिततेमुळे शेतक-यांना आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे एक साधन आहे.

3. पीक विम्याचा हप्ता कसा मोजला जातो?
उत्तर – प्रीमियम दर = प्रीमियम / दायित्व (किंवा दायित्वाच्या प्रति डॉलर प्रीमियम).

लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा