शेयर करा

papaya variety

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पपई च्या काही प्रमुख जातींची (papaya variety) माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला पपई लागवड करायची असेल तर हा लेख खास करून तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…

पपईचे पिक हे जवळपास 10 ते 13 महिन्यात तयार होते. पपईची लागवड जुलै ते सप्टेंबर किंवा फेब्रुवारी ते मार्च मध्ये केली जाते. अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांचा पपई लागवडीकडे कल वाढत जात आहे. अशातच सुधारित पपई चे बियाणे निवडून लागवड केल्यास उत्पादन वाढू शकते अशी आशा व्यक्त केली जात आहे. पपई फळपीकाच्या उभयलिंगी व द्विभक्तलिंगी अशा जाती आहेत. उभयलिंगी जातीच्या लागवडीपासून अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे लागवडीसाठी उभयलिंगी जातीच्या रोपांची खात्रीशीर रोपवाटिकेतून निवड करावी.



पपई सुधारित जाती | best papaya variety list –

क्रमांक जातीचे नाव वैशिष्ट्ये
1 कुर्ग हनीड्यू (मधूबिंदू) -चांगली उत्पादन क्षमता(प्रतिझाड – प्रतिवर्ष 30 ते 40 फळे मिळतात)
-फळे लांब आकाराची असतात.
-गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने चवीला अतिशय गोड असतात.
2 पुसा डेलिशिअस -चांगली उत्पादन क्षमता व झाडाचे खोड मजबूत असते.
-फळे जमिनीपासून 160 सें.मी. उंचीपासून वर लागतात.
-प्रतिझाड प्रतिवर्ष 30 ते 40 फळे मिळतात.
-फळांचे सरासरी वजन 1 ते 1.2 किलो असते.
-साखरेचे प्रमाण 10 टक्के असते.
3 पुसा डॉर्फ -झाडे ठेंगणी आणि जास्त उत्पादन देणारी आहेत.
-लागवडीनंतर झाडांना 235 दिवसांपासून फळे लागतात.
-जमिनीपासून 40 सें.मी. उंचीपासून फळे लागतात.
-फळे मध्यम आकाराची व सरासरी वजन 1 ते 1.5 किलो असते.
-सोसाट्याचा वारा जेथे वाहतो तेथे ही लागवडीसाठी फायदेशीर ठरते.
4 रेड लेडी 786 -संकरित वाण पैकी एक
-या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नर आणि मादी फुले एकाच -वनस्पतीमध्ये तयार होतात.
-यामुळे प्रत्येक झाडाला फळे येतात.
-लागवडीनंतर 9 महिन्यांनीच झाडांना फळे येऊ लागतात.
-या जातीच्या फळांची साठवण क्षमता इतर जातींच्या तुलनेत जास्त आहे.
5 सी.ओ.3 -झाडे उंच वाढतात.
-गराचा रंग लालसर असून, ब्रिक्‍स 14.6 टक्के असते.
-फळांचे सरासरी वजन 0.5 ते 0.8 किलो असते.
-प्रतिझाड प्रतिवर्ष 90 ते 120 फळे मिळतात.
6 वॉशिंग्टन -झाडे बुटकी असतात.
-फळे लांब, वर्तुळाकार असतात.
-फळांचे सरासरी वजन 1.5 ते 2 किलो असते.
-गर केशरी, चवदार व उत्पादनास चांगली जात आहे.
7 तैवान-785 आणि तैवान-786 -भरपूर उत्पादन क्षमता (प्रतिवर्ष प्रतिझाड 100 ते 125 फळे).
-लागवड व तोडणी वर्षभर चालू असते.
-एकूण फळांपैकी 60 ते 70 फळे मोठ्या आकाराची व दुसऱ्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य असतात.
-फळांचे सरासरी वजन 1 ते 1.5 किलो पर्यंत असते. -प्रतिहेक्‍टरी फळांचे उत्पादन 100-124 टन मिळते.
-शुद्ध बियाणे वापरल्यास या जाती व्हायरस रोगाला बळी पडत नाहीत.
8 सी.ओ.2, सी.ओ.4, सी.ओ.5, सी.ओ.7 आणि सी.ओ.9 -या जाती पेपेन उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या आहेत.
-त्यापैकी सी.ओ. 7 ही जात उभयलिंगी असून, बाकीच्या द्विभक्तलिंगी आहेत.
9 पुसा ड्वार्फ (पुसा 1-45 डी) -या जातीची झाडे 6 ते 6.5 फुट उंच असून नर व मादी फुलांची झाडे वेगवेगळी असतात.

पपई बियाणे किंमत | papaya variety price –

1 ग्राम – 448 रुपये
2 ग्राम – 998 रुपये
10 ग्राम – 4500 रुपये

पपई बियाणे खरेदी कोठे करावी? How to buy papaya seeds online –

तुम्हाला जर एक नंबर पपई बियाणे ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर तुम्ही BharatAgri Krushi Dukan वेबसाईट ला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला अगदी ओरिजनल बियाणे मिळेल ते देखील भरघोस डिसकाऊंट सह. खरेदी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करू शकता.

लिंक – पपई बियाणे खरेदी

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा papaya variety: मार्केट मधील टॉप पपई सुधारित जाती आणि संपूर्ण माहिती हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि ईतर पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या “शेती माहिती” पेजला भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. पपईला फळ येण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर – चांगली काळजी घेतलेली झाडे लागवडीनंतर 4 महिन्यांनी फुले आणि लागवडीनंतर 7 ते 11 महिन्यांनी फळ देऊ शकतात.

2. पुरुष आणि मादी पपईच्या बियांमध्ये फरक कसा सांगू शकता?
उत्तर – सर्व पपईमध्ये तपकिरी आणि गडद काळा असे दोन प्रकारचे बिया असतात. त्या तपकिरी बिया नर पपई आणि काळ्या मादी आहेत.

3. पपई लागवड कोणत्या महिन्यात करतात?
उत्तर – पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.

4. पपई कोणत्या हंगामात उपलब्ध असते?
उत्तर – भारतात पपईचा हंगाम ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान असतो.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा