शेयर करा

pantpradhan pik vima yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. आपण आजच्या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजना (Pantpradhan pik vima yojana) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान पीक विमा योजना (pradhanmantri fasal Bima Yojana) काय आहे, ही योजना कोणासाठी आहे, योजनेचे स्वरूप काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशी करावी याविषयी आपण या लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये | Pradhanmantri Pik Vima Yojana Features –

1. प्रधानमंत्री पीक विमा योजना (pradhanmantri pik vima yojana) केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
2. देशातील शेतकऱ्यांना पिकांचे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
3. प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pantpradhan pik vima yojana) देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे.
4. देशातील कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतात.
5. शेतकऱ्यांच्या पिकांचे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
6. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे शेतकरी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ज्यामुळे अर्जदार शेतकऱ्यांना कोणत्या सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.



प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश | Pradhanmantri Pik Vima Yojana Purpose –

1. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान साठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
3. आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
4. शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
5. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
6. शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
7. राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे.
8. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
9. शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट पिके | Pradhanmantri Pik Vima Yojana 2023 –

1. अन्न पीक
2. तेल बिया
3. वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके
4. बारमाही फलोत्पादन/व्यावसायिक पिके

जोखमीच्या बाबी | या योजने अंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे विमा संरक्षण दिले जाईल –

1. पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यामुळे येणारी घट. (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)
2. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
3. काढणी पश्चात नुकसान – चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
4. सदरचे नुकसान काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त १४ दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील.
5. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
6. स्थानिक नैसर्गिक आपत्ती – या योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे.
7. PMFBY योजना व्यापारी व बागायती पिकांना देखील विमा संरक्षण देते. मात्र यासाठी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रीमियम (रक्कम) भरावी लागणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) या योजनेचे संचालन करते.



PMFBY योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे –

1. शेतकऱ्याचा एक फोटो
2. शेतकऱ्याचे आयडी कार्ड (पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान आयडी कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड)
3. शेतकऱ्याच्या एड्रेस प्रूफ (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड)
4. जर शेत तुमच्या मालकीचे असेल तर सात-बारा उतारा/ खाता नंबर आदि पेपर सोबत ठेवा.
5. शेतात पिकांची पेरणी झालेली आहे, याचा पुरावा सादर करावा लागेल.
6. पिक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्र सादर करू शकतो.
7. जर शेत कसायला घेतले असेल तर व पीक पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी सोबत आणावी लागेल.
8. त्यामध्ये शेतीचा सात-बारा उतारा / खसरा नंबर स्पष्ट लिहिलेला असावा.
9. पीक नुकसानग्रस्त झाल्यास आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्जासोबत बँकेचा रद्द केलेला चेक जोडावा लागेल.

शेतकरी स्वतः सादर करू शकतात त्यांचा पिक विमा अर्ज –

शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पिकांच्या विम्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी खालील दिलेली पद्धतीचा अवलंब करावा लागेल.

1. तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राउजर च्या सर्च बारमध्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY ) हा कीवर्ड टाईप करा.
2. वरील कीवर्ड टाईप करताच तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) हि वेबसाईट दिसेल.
3. PMFBY वेबसाईटवरील दिसत असलेल्या farmer corner या बटनावर क्लिक करा.
4. Login for farmer या बटनावर क्लिक करा.
5. मोबाईल नंबर व कॅपचा कोड टाकून Request for OTP या बटनावर क्लिक करा.
6. OTP टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
7. Submit या बटनावर क्लिक करता तुम्ही लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यावर पिक विमा अर्ज भरण्यास सुरुवात करा.

PMFBY साठी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी –

1. पिक पेरणीनंतर १० दिवसांच्या आत तुम्हाला PMFBY साठी अर्ज करावा लागेल.
2. पीक कापणीनंतर १४ दिवसानंतर जर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतमालाचे नुकसान झाले तर तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.
3. विमा योजनेचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान होईल.
4. पेमेंटमध्ये होणारा विलंब कमी करण्यासाठी पीक कापणीचे आकडे मिळवणे व ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी स्मार्ट फोन, रिमोट सेंसिंग ड्रोन आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो.



Pantpradhan pik vima yojana साठी विशेष वेब पोर्टल आणि मोबाइल ॲप –

1. प्रशासन व विविध एजन्सीमध्ये ताळमेळ घालण्यासाठी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार-प्रसार आणि प्रक्रियामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारने एक विमा पोर्टल सुरू केले आहे.
2. अँड्रॉयड आधारित पीक विमा ॲप ही सरकारकडून सुरु करण्यात आले आहे. हे ॲप पीक विमा, कृषी सहयोग आणि शेतकरी कल्याण विभाग (डीएसी आणि कुटूंब कल्याण) च्या अधिकृत वेबसाईटवरून तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते.

Conclusion| सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pantpradhan pik vima yojana) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे काय?
उत्तर – पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास प्रभावित शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल.

2. प्रधानमंत्री पिक विमा (Pantpradhan pik vima yojana) योजनेची सुरुवात कधी झाली ?
उत्तर – 13 जानेवारी 2016 रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

3. पंतप्रधान पिक विमा (pradhanmantri pik vima yojana) योजनेचा प्रीमियम किती आहे?
उत्तर – या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ टक्के प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी १.५% प्रीमियम भरावे लागते.

4. पंतप्रधान पिक विमा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे ?
उत्तर – फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल. – http://pmfby.gov.in/

5. पीक कापणी नंतर किती दिवसात नुकसान झाल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो ?
उत्तर – पीक कापणीनंतर १४ दिवसानंतर जर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतमालाचे नुकसान झाले तर तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.



लेखक

कृषि डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा