शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण organic carbon म्हणजेच सेंद्रिय कर्ब याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, सेंद्रिय कर्बाचे जमिनीला होणारे फायदे आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय याविषयी या लेखामध्ये आपण माहिती पाहणार आहोत.
सेंद्रिय कर्ब (organic carbon) म्हणजे काय?
1. पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन). कर्बाचे जरी विविध प्रकार असले तरी कृषीक्षेत्रात सर्वात जास्त सहभाग असतो तो सेंद्रिय कर्बाचा.
2. चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास 60 टक्के असते.
3. म्हणून यास सेंद्रिय कर्ब (sendriya karb) असे म्हणतात. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरवली जाते.
4. ज्या जमिनीमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते ती जमीन शेतीसाठी अयोग्य किंवा कमी उत्पादित ठरते.
5. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्ब (organic carbon in soil) जेव्हा चार टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा तिला सेंद्रिय जमीन अथवा सुपीक जमीन असे म्हणतात.
6. मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
7. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते.
8 जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर प्रमाण राखले गेल्यास चांगला फायदा होतो.
9. मातीच्या 12 टक्के ते 18 टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती असे संबोधतात.
10. 5 ते 20 टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (Rhizosphere) सूक्ष्म जीवांच्या कृतीद्वारे पुरवला जातो.
11. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजीवांचे खूप मोलाचे योगदान असते.
जमिनीच्या कोणत्या भागात सेंद्रिय कर्ब (organic carbon) असतो?
1. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जिवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो.
2. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण (organic carbon content of soil) – सुपीकता निकष –
0.2 टक्क्यापेक्षा कमी ————–> अत्यंत कमी
0.21 ते 0.40 टक्के या दरम्यान —> कमी
0.41 ते 0.60 टक्के —————–> मध्यम
0.60 ते 0.80 टक्क्यांपर्यंत ———-> जास्त
0.80 पेक्षा अधिक ——————–> खूप जास्त
सेंद्रिय कर्बाचे (organic carbon) मुख्य फायदे –
अ) पोषकद्रव्ये उपलब्धता वाढते –
1. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या वापरामुळे 90 ते 95% नायट्रोजन, 15 ते 80% फॉस्फरस, आणि 20 ते 50% सल्फरचे स्थिरीकरण करते.
2. जमिनीच्या अनेक भागात खनिज द्रव्याची स्थिरता आणि मातीतील संपूर्ण धनभारित विद्युतीकरणाची वाहन क्षमता वाढते.
3. जमिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर सर्व मूलद्रव्याचे स्थिरीकरण करते.
4. पोषकद्रव्ये धारण क्षमता वाढवते व त्यांना एकत्रित धरून ठेवते.
ब) माती संरचना सुधारते –
1. मातीमध्ये हवा आणि पाणी पोकळी निर्माण करून चांगल्या माती संरचनेला सहाय्य करते.
2. जमिनीच्या सुपीक स्थरांची बांधणी करण्यास सहाय्य करते.
3. जमिनीमध्ये जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देते. (उदा : गांडूळ व बीटल )
क) वनस्पती वाढीस थेट मदत –
1. जमिनीतील सूक्ष्मजीव यांमार्फत नत्राचे स्थिरीकरण करून नायट्रेट आणि अमोनिया आम्ल हवेत सोडला जातो.
2. जमिनीतील पोकळीमधील हवेत कार्बन डायऑक्साईडची वाढ होते त्यामुळे वनस्पतींची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते.
3. मूळ वाढीस मदत, सेंद्रिय कर्बामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी निर्माण होते त्यामुळे मूळ वाढीस वाव मिळतो.
शेती निगडीत आमचे विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल
ड) जमिनीत पाणी संबंध सुधारते –
1. खुल्या संरचनेमुळे पाऊसाचे पाणी शोषण क्षमता वाढते.
2. पाण्याचा अपव्यय कमी होतो.
3. ह्युमस परमाणु कणांचे पाण्यामध्ये विघटन होऊन जमीन बांधणीसाठी प्रोत्साहित करते.
4. सेंद्रिय कार्ब जमिनीमध्ये संग्रहित होऊन हळूहळू पिकांना वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होतात.
इ) इतर फायदे –
1. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
2. जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
3. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.
4. मातीची धूप कमी होते. मातीची जडण घडण सुधारते.
5. नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
6. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
7. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
8. जमिनीचा सामू उदासीन (6.5 ते 7.5) ठेवण्यास मदत होते.
9. चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
सेंद्रिय कर्ब (organic carbon) वाढवण्याचे उपाय –
1. पीक फेरपालट कडधान्य पिकांची लागवड करावी.
2. शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनी मिसळावे.
3. क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा किंवा उसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.
4. उभ्या पिकांत निंबोळी पेंडीचा वापर करावा.
5. पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसाचे पाचटाचे नियोजन करावे.
6. आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
7. शेतीची पशुसंगोपन सांगड घालावी.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा organic carbon: सेंद्रिय कर्ब A to Z माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
People also ask | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. द्रिय कर्ब (organic carbon) म्हणजे काय?
उत्तर- सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे.
2. सर्वसाधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर काय असावे?
उत्तर – जमिनीतील कार्बन व नायट्रोजन गुणोत्तर 15:25 असते.
3. सेंद्रिय पदार्थ कसे वाढतात?
उत्तर – सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न म्हणजे कृत्रिम खते किंवा कीटकनाशके वापरून सेंद्रिय पदार्थ वाढवले जातात.
4. नायट्रोजन किती टक्के सेंद्रिय पदार्थ आहे?
उत्तर – मातीतील सेंद्रिय पदार्थांची रचना सरासरी 5 टक्के नायट्रोजन आणि 52 टक्के कार्बन असते.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412