शेयर करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! Krushi Doctor परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “onion thrips control ची संपूर्ण माहिती” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत.तुम्हाला तर माहितीच आहे की दर वर्षी कांदा उत्पादक शेतकरी हे थ्रिप्स सारख्या घटक रसशोषक किडीने किती त्रस्त असतात. त्यासाठी ते खूप साऱ्या फवारण्या ( कीटकनाशकांच्या ) करत असतात परंतु त्यांना इतका खर्च करून देखील म्हणावे तसे रिजल्ट मिळत नाहीत. म्हणूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण कांदा पिकावर थ्रिप्स येण्यामागची कारणे, त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे तसेच त्यावरील ठोस उपाय योजना पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर kanda उत्पादक शेतकरी असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतरकांदा उत्पादक शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करा . चला तर सुरू करूया –



onion thrips मागील प्रमुख कारणे –

1. दमट व ढगाळ वातावरण.
2. नत्र युक्त खतांचा अतिरिक्त वापर.
3. अपुरे खत व्यवस्थापन.
4. पांढऱ्या मुळीची वाढ थांबणे.
5. माती मध्ये पानी साचून राहणे.

onion thrips ची लक्षणे कशी दिसतात –

1. पानावर पांढऱ्या कलरचे ओरखडे दिसून येतात.
2. परिणामी पानांची प्रकाश संश्लेषनाद्वारे अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते.
3. व रोपाचा व कंदाचा विकास होऊ शकत नाही.
4. पानावर झालेल्या जखमामधून वेग-वेगळ्या बुरशी पानामध्ये प्रवेश करतात व रोप आणखीन इतर कीटक व रोगांना देखील बळी पडते.
5. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने वेडी-वाकडी होऊन वाळू लागतात.

कांदा थ्रिप्स नियंत्रण कसे करावे ?

1. एकरी 10 निळे चिकट सापळे लावावेत
2. उरिया ची संतुलित मात्रा द्यावी
3. खालील कीटक नाशके आलटून – पालटून वापरावीत
➡️फीप्रोनील 5 % एस सी – 1 मिलि / लीटर पानी
➡️कार्बोसल्फान 25% EC – 2 मिलि / लीटर पानी
➡️प्रोफेनोफॉस 50% EC – 1 मिलि / लीटर पानी
➡️फवारणी घेताना स्टीकर चा वापर नक्की करावा

4. वरील फवारन्या ह्या सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
5. यासाठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
6. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
7. फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
8. फवारणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.

( कांदा थ्रिप्स नियंत्रण प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )



Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की Krushi Doctor वरील आमचा “onion thrips control ची संपूर्ण माहिती” हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि याचा फायदा देखील येणाऱ्या हंगामात होईल. वरील माहितीनुसार आपण जर कांदा पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या कांदा पिकाचे नियोजन केले तर कांदा पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह थ्रिप्स किडीचे नियंत्रण करू शकतो.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. कांद्यामध्ये थ्रिप्सचे नियंत्रण करण्यासाठी कोणते किटकनाशक बेस्ट आहे?
उत्तर – कांद्यामध्ये थ्रिप्स किडीचे प्रभावी पणे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – फीप्रोनील 5 % एस सी – 1 मिलि / लीटर पानी किंवा कार्बोसल्फान 25% EC – 2 मिलि / लीटर पानी किंवा प्रोफेनोफॉस 50% EC – 1 मिलि / लीटर पानी.

2. कांद्यामध्ये थ्रिप्सचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – एकरी 10 निळे चिकट सापळे लावावेत. उरिया ची संतुलित मात्रा द्यावी. प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यावर शिफारशीत कीटक नाशके आलटून – पालटून वापरावीत.

3. कांद्यामध्ये थ्रिप्स का येतात?
उत्तर – दमट व ढगाळ वातावरण. नत्र युक्त खतांचा अतिरिक्त वापर. अपुरे खत व्यवस्थापन. पांढऱ्या मुळीची वाढ थांबणे. माती मध्ये पानी साचून राहणे. इत्यादि कारणामुळे कांदा पिकात थ्रिप्स कीड येऊ शकते.

4. कांद्यामध्ये थ्रिप्सचे नियंत्रण जैविक पद्धतीने कसे करावे?
उत्तर – यामध्ये तुम्ही अगोदर कांदा पिकामध्ये निळ्या रंगाचे चिकट सापळे लाऊ शकता. व नंतर कीडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निम तेल, बिव्हेरिया बॅसियाना आणि व्हर्टिसिलियम लेकनी यांच्या फवारण्या देखील करू शकता. तसेच काही नैसर्गिक जीव देखील तुम्हाला यात मदत करतील जसे की – लेसबिंग बग, लेडी बर्ड बीटल, शिकारी माशा, शिकारी थ्रिप्स आणि माइट्स.

5. थ्रिप्स किडीला प्रतिकार करणारी कांद्याची कोणती जात आहे का?
उत्तर – नाही . कांदा पिकाच्या जवळ-जवळ सर्वच जातीवरती कमी अधिक प्रमानामध्ये थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोच. यासाठी आपल्याला सुरुवातीपासून उपाय योजना करणे आवश्यक आहे.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412.


शेयर करा