शेयर करा

npk 0 52 34

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण npk 0 52 34 या खता बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने 0 52 34 खतामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, हे खत कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे, हे खत देण्याची मात्रा काय आहे, खत देण्याचे प्रकार, हे खत वापरण्याचे फायदे आणि या खताची किंमत याबद्दल या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

npk 0 52 34 मधील पोषक घटक –

0 52 34 या खतामध्ये 52% फॉस्फरस (P) आणि 34% पोटॅशिअम (K) हे पोषक घटक असतात.

शिफारशीत पिके –

1. फर्टिगेशनसाठी:- द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती
2. पानावरील फवारणी साठी:- सर्व पिके

वापराचे प्रमाण –

फवारणी साठी याचे प्रमाण आपण प्रति 20 लिटर पाण्याच्या पंपसाठी 100 gm घेऊ शकतो,
आणि ड्रीपसाठी 200 लिटर पाण्यात 2 ते 4 किलो पर्यंत घेऊ शकतो.

npk 0 52 34 कशा सोबत वापरू नये?

मॅग्नेशियम सल्फेट

पिकाला लागू होण्याचा कालावधी –

हे खत शेतात टाकल्यानंतर स्फुरद घटक हा सातव्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला मिळत असतो यामधील जे पालाश आहे तो अकरा दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध अवस्थेत मिळत राहतो.

शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे

NPK 0 52 34 खत पिकामध्ये वापरण्याचे फायदे –

1. 0 52 34 मध्ये 0% नत्र, 52% स्फुरद आणि 34% पोटॅशिअम असते. याच्यात असलेल्या फॉस्फरस म्हणजेच स्फुरद मुळे मुळ्याच्या विकासाला मदत होते आणि फुलांच्या संख्येत वाढ आणि पिकाचे खोडे टणक बनते.
2. यांच्यातील पोटॅश मुळांची योग्य वाढ करून पिकांना उपटण्यापासून वाचवते.
3. पोटॅशच्या वापरामुळे वनस्पतींच्या पेशींच्या भिंती जाड होतात.
4. ज्यावेळी पिकाची फुल धारणा चालू होते त्यावेळी या खताचा वापर करणे गरजेचे असते.
5. ड्रीप मधून सोडतांना हि काळजी घ्या कि जमीन ओली असणे गरजेचे आहे आणि कोणत्याही तणनाशक, बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत या खताचा वापर करू नये.

कोठे आणि कसे खरेदी करावे?

0 52 34 खत जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल किंवा आपण BharatAgri App मधून हे खत घर बसल्या खरेदी करू शकता.

किंमत | 0 52 34 price –

1 किलो – 230 ते 260 रुपये
25 किलो – 1100 ते 1200 रुपये



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील “npk 0 52 34: वापर, फायदे आणि किंमत” हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. विद्राव्य खतामध्ये कोणते अन्नद्रव्य असतात?
उत्तर – विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य बरोबर दुय्यमअन्नद्रव्ये (मॅग्नेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात.

2. npk 0 52 34 हे खत कशासोबत वापरू नये?
उत्तर – 0 52 34 हे खत मॅग्नेशियम सल्फेट सोबत वापरू नये.

3. 0 52 34 हे खत पिकाला किती दिवसात उपलब्ध होते?
उत्तर – हे खत शेतात टाकल्यानंतर स्फुरद घटक हा सातव्या दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला मिळत असतो यामधील जे पालाश आहे तो अकरा दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत पिकाला उपलब्ध अवस्थेत मिळत राहतो.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412.


शेयर करा