शेयर करा

nativo fungicide

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण बायर कंपनीच्या नेटिवो (nativo fungicide) या बुरशीनाशक बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार यामध्ये प्रामुख्याने नेटिवो मध्ये कोणते घटक असतात, कोणत्या पिकांसाठी याचा वापर होतो, याची वापरण्याची मात्रा किती आहे, नेटिवो बुरशीनाशक कोणत्या अवस्थेत वापरतात आणि याचा काय फायदा होतो हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

बायर नेटिओ (टेबुकोनाज़ोल + ट्राइफ्लॉक्सीस्ट्रोबिन 75 डब्ल्यूजी) बुरशीनाशक | bayer nativo technical name –

नेटिओ बुरशीनाशक (nativo fungicide) हे एकत्रित टेब्युकोनाझोल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन असलेले बुरशीनाशक आहे. नेटिओ हे संरक्षणात्मक आणि उपचारात्मक कृतीसह एक पद्धतशीर ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे जे केवळ रोग नियंत्रणच देत नाही तर पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारते.
नेटीओ हे एक आंतरप्रवाही विस्तृत गुणधर्म ज्यात संरक्षणात्मक आणि उपचारात्मक क्रियाशील बुरशीनाशक आहे जे रोगावर नियंत्रण ठेवण्या बरोबर पिकाच्या गुणवत्ता वाढवते.

क्रिया ची पद्धत –

टेबुकोनाझोल हे डायमेथिलेस इनहेबिटर (DMI) आहे – बुरशीजन्य पेशींच्या भिंतीची रचना तयार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करते. शेवटी ते बुरशीचे पुनरुत्पादन आणि पुढील वाढ रोखते. ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन वनस्पती रोगजनक बुरशीच्या श्वसन यामध्ये हस्तक्षेप करते.

फायदे | Benefits of nativo fungicide –

1. नेटिओ पानांचे ठिपके, तांबेरा, ब्लास्ट, अन्थ्रॅकनोज, डाउनी मिल्ड्यू, पावडर बुरशी आणि बरेच बुरशीजन्य रोगाच्या विस्तृत श्रेणी पासून संरक्षण करते.
2. हे दीर्घकाळ टिकणारे संरक्षण प्रदान करते, पिके आठवडा ते महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवतात.
3. नेटिओ पिकाच्या आत आणि बाहेर दोन्ही पद्धतीने कार्य करते, सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते.
4. गहू, भात, मका, सोयाबीन, बटाटा, टोमॅटो, मिरे, काकडी, खरबूज, द्राक्षे, सफरचंद आणि लिंबूवर्गीय यासह विविध पिकांवर वापरण्यासाठी हे सुरक्षित आहे.
5. नेटिओ पिकांचे रोगांपासून संरक्षण करून आणि त्यांना कीटकांपासून अधिक प्रतिरोधक बनवून त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

नेटिवो बुरशीनाशक (nativo fungicide) कोणत्या पिकांत वापरतात आणि कशासाठी वापरतात?

पीक रोग
भात शीथ ब्लाइट, पानांवरील करपा आणि काडी करपा व ओंबी वरील करपा 
टोमॅटो पानावरील बुरशीजन्य ठिपके आणि करपा
आंबा अन्थ्रॅकनोज आणि पावडर मिल्ड्यू (भुरी)
गहू नारंगी तांबेरा आणि पावडर मिल्ड्यू (भुरी)
द्राक्ष अन्थ्रॅकनोज आणि पावडर मिल्ड्यू (भुरी)
मिरची अन्थ्रॅकनोज आणि पावडर मिल्ड्यू (भुरी)

प्रमाण | nativo buyer dose –

पीक वापराचे प्रमाण (प्रती एकर)
भात 80 ग्रॅम
टोमॅटो 140 ग्रॅम
द्राक्ष 70 ग्रॅम
मिरची 100 ग्रॅम
गहू 120 ग्रॅम

 

वापरण्याची पद्धत – फवारणी

मिसळण्यास सुसंगत – स्टिकर शी सुसंगत

पुनर्वापर आवश्यकता – किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

नेटिवो बुरशीनाशक (nativo fungicide) फवारणी करताना घ्यावयाची काळजी –

1. नेटिवो बुरशीनाशक (natevo fungicide) वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
2. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली बुरशीनाशक सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी व सर्वसाधारण ,निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली बुरशीनाशक कमीत कमी विषारी असतात.
3. तणनाशक फवारणी पंप चुकूनही बुरशीनाशक फवारणी साठी वापरू नये.
4. फवारणी करतांना संरक्षक कपडे ,बुट ,हातमोजे ,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.

नेटिवो बुरशीनाशक किंमत | nativo fungicide price –

वजन (ग्राम) अंदाजे किंमत (रुपये)
50 465
100 930
250 2139

नेटिवो बुरशीनाशक कसे खरेदी करावे | How to buy nativo fungicide –

नेटिवो बुरशीनाशक जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये उपलब्ध होईल किंवा आपण BharatAgri App ला भेट देऊन हे बुरशीनाशक (fungicide nativo) खरेदी करू शकता.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील nativo fungicide: नेटिवो बुरशीनाशकाची संपूर्ण माहिती डोस, उपयोग, फायदे आणि किंमत हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

People also ask | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. नेटिवो हे कोणत्या कंपनीचे बुरशीनाशक आहे?
उत्तर – साफ हे बायर (Bayer nativo) या कंपनीचे बुरशीनाशक आहे.

2. नेटिवो या बुरशीनाशक मध्ये कोणते घटक समाविष्ट असतात?
उत्तर – नेटिवो या बुरशीनाशकामध्ये टेबुकोनाज़ोल + ट्राइफ्लॉक्सीस्ट्रोबिन 75 डब्ल्यूजी हे घटक असतात.

3. नेटिवो बुरशीनाशक कोणत्या पिकांमध्ये वापरले जाते?
उत्तर – नेटिवो हे बुरशीनाशक भात, टोमॅटो, द्राक्षे,मिरची, गहू या पिकांमध्ये वापरले जाते.

लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा