शेयर करा

Millipede control

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकी प्रमुख व्यवसाय म्हणून लोक शेती हाच व्यवसाय करतात. आपण आजच्या लेखांमध्ये वाणी (पैसा) किड नियंत्रण (millipede control) कसे करावे याविषयी माहिती पाहणार आहोत. वाणी कीड म्हणजे काय, वाणीचा प्रादुर्भाव कसा होतो, वाणीचा जीवनक्रम कसा आहे, वाणीचे नियंत्रण करण्यासाठी कोणते एकात्मिक उपाय आहेत हे सर्व पाहणार आहोत.

वाणी/पैसा कीड नियंत्रण (millipede control) प्रस्तावना –

1. वाणी या किडीलाच पैसा, तेलंगी अळी अशा विविध नावांनी ओळखले जात.
2. कापूस तसेच सोयाबीन पिकाची पेरणी झाली असेल.
3. अनेक शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत पाऊस झालेला नसल्यामुळे धाडस करत उपलब्ध ओलितावर किंवा धूळ पेरणी केली.
4. अशा लवकर लागवड केलेल्या शेतातील पिके अंकुरण ते रोपे अवस्थेत (१० ते १५ दिवस) आहेत. या पिकांवर वाणी (पैसा) या किडीचा प्रादुर्भाव (millipede Pest Attack) होताना दिसत आहे.
5. सध्या सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) , तूर, मूग, उडीद पिकावर मिलीपेड्स (millipede) म्हणजेच पैसा किंवा वाणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
6. विदर्भ व मराठवाड्यात मागील २ -३ वर्षांपासून खरीप पिकावर जास्त प्रादुर्भाव होत आहे.
7. पेरणीनंतर तुरळक जसे 200 ते 250 मिमी पेक्षा कमी पाऊस, रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.



वाणी/पैसा शरीर रचना आणि ओळख | millipede identification –

शरीराचे प्रमुख तीन भाग असतात. डोके, तन आणि पुच्छ खंड

1. डोके – या किडीचे डोके वरच्या बाजूने अर्धगोलाकार व खालच्या बाजूने चपटे असते. या किडीचे संवेदी अवयव पाहिले तर – तोंड, दोन स्पर्शिका (antennae) आणि डोळे ही असतात.
2. तन – या किडीचे शरीर हे लांब व दंडगोलाकार असते. प्रत्येक भागावर पायांच्या प्रत्येकी दोन जोड्या असतात. एकूण 34 ते 400 पाय असतात. पायांच्या दुसऱ्या जोडी नंतर आणि शरीराच्या तिसऱ्या सेगमेंटवर लैंगिक अवयव असतात.
3. पुच्छ खंड – किडीच्या शेपटाकडील भाग म्हणजे पुच्छ खंड. या ठिकाणी संरक्षण ग्रंथी असतात.
4. आकारमान – या किडीची सर्वात लहान प्रजाती 5 मिमी ते सर्वात मोठी प्रजाती 35 सेमी इतकी असते.
5. रंग – या किडीचा रंग हा गर्द तपकिरी, तांबूस काळपट किंवा लालसर असतो.

वाणी/पैसा वावर, आढळ आणि वर्तन –

1. मुख्यत्वे जमिनीवर राहणारे, तर काही प्रजाती जमिनीलगत मातीमध्ये आढळतात.
2. जमिनीमधील न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमुख विघटक म्हणून वाणी या किडीचा प्रमुख रोल आहे.
3. वाणी ही कीड जैविक अवशेषांचे ह्यूमस मध्ये रूपांतर करते.
4. मादी ओलसर जागेवर मातीत किंवा सेंद्रिय पदार्थांच्या अर्धवट कुजलेल्या अवशेषांमध्ये एका वेळेस 10 ते 300 पर्यंत अंडी घालते.

वाणी किडीसाठी असणारे पोषक वातावरण –

1. उष्ण आणि दमट वातावरण
2. पावसाळ्यात सुरुवातीला पडणाऱ्या हलक्या व तुरळक सरी
3. पडीक गवताळ जमिनी किडीच्या प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतात.



नुकसान | millipedes attack on crops –

1. वाणी (millipede) हे निशाचर असून सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात.
2. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. परंतु जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात.
3. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाऊन पाने कुरतडतात.अंकुर ते रोपे कुरतडल्या मुळे बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.
4. प्रामुख्याने खरिपात, पेरणीनंतर रोपावस्थेत प्रादुर्भाव होतो.
5. रोपे जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात.
6. एकरी रोपांची संख्या घटते. उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवते.

वाणी कीड नियंत्रणाचे एकात्मिक उपाय | millipede control –

1.मशागतीय पद्धती | millipede control –

1. या किडीचा बांधावरील गवतावर शेतातील मुख्य पिकावर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेताच्या चोहोबाजूंनी एक मीटर पट्ट्यात राख पसरावी.
2. राखेमुळे मातीतील कोरडेपणा वाढून या किडीची हालचाल मंदावते.
3. मोरचूद व कळीचा चुना (2:3) यांच्या मिश्रणाचा पातळ थर राखेवर द्यावा. त्यामुळे संपर्क येणाऱ्या किडी मरण्यास मदत होते.

2. रासायनिक पद्धती | millipede control –

1. सुरुवातीच्या टप्प्यात प्राथमिक स्वरूपात प्रादुर्भाव हा शेताच्या एखाद्या विशिष्ट भागात सुरू होतो.
2. कीड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३ मिलि किंवा क्लोरपायरिफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५% ईसी) (संयुक्त कीडनाशक) १.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी (या कीडनाशकाची मिलीपेड या किडीसाठी शिफारस नाही. मात्र कापूस पिकासाठी आहे.)
3. रोपांच्या मुळाजवळ पंपाचे नोझल काढून ‘ड्रेंचिंग’ केल्यास बुंध्यालगत मातीत असलेल्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
4. कार्बोसल्फान (१०% दाणेदार), क्लोरपायरिफॉस (१०% दाणेदार) किंवा फिप्रोनील (०.३%) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने रोपांजवळ वापरावे.



Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील (millipede control) वाणी (पैसा) नियंत्रण कसे करावे याचे A to Z गाईड हा लेख तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. वाणी किडीचा प्रादुर्भाव कोण कोणत्या पिकावर होतो?
उत्तर – सध्या सोयाबीन(Soybean), कापूस (Cotton) , तूर, मूग, उडीद पिकावर मिलीपेड्स (Millipede) म्हणजेच पैसा किंवा वाणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

2. वाणी किडीचा वावर कुठे असतो?
उत्तर – मुख्यत्वे जमिनीवर राहणारे, तर काही प्रजाती जमिनीलगत मातीमध्ये आढळतात.

3. वाणी किडीच्या वाढीसाठी कशा प्रकारचे हवामान लागते?
उत्तर – वाणी किडीच्या वाढीसाठी उष्ण आणि दमट प्रकारचे हवामान लागते.

4. वाणी किडीच्या प्रजोत्पादनासाठी कशा प्रकारची जमीन लागते?
उत्तर – पडीक गवताळ जमिनी किडीच्या प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतात.

5. वाणी किडीच्या नियंत्रणासाठी राखेचा वापर कशा प्रकारे करावा?
उत्तर – या किडीचा बांधावरील गवतावर शेतातील मुख्य पिकावर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेताच्या चोहोबाजूंनी एक मीटर पट्ट्यात राख पसरावी.



लेखक –

कृषी डॉक्टर
9168911489


शेयर करा