शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण लव्हाळा या तनासाठी कोणते तणनाशक (lavala weed control) वापरायचे, त्यासाठी कोणते एकात्मिक उपाय करायला पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. लव्हाळा हे तण खूप झपाट्याने वाढते, त्याच्या मुळाशी खूप साऱ्या गाठी तयार होतात त्यांना नागरमोथा असेही म्हणतात.
2. या गाठीपासून पुन्हा नवीन कोंब फुटून त्याचे प्रमाण खूप वाढते.
3. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर ते पूर्ण शेतात पसरते व लवकर नियंत्रणात येत नाही.
4. लव्हाळ्यामुळे आपल्या पिकाचे 20 ते 90 टक्के पर्यंत नुकसान होते.
5. आजकाल शेतकरी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा वापर करतो.
6. तणनाशक वापरल्यामुळे मुख्य पिकाला थोडी का होईना हानी पोहोचतेच.
7. त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी अतिरिक्त खताचा वापर करावा लागतो, अर्थातच खर्चही वाढतो.
8. या लेखात आपण लव्हाळा या तणांचा कसा बंदोबस्त (lavala weed control)करायचा ते पाहणार आहोत.
लव्हाळा तण नियंत्रण (lavala weed control) करण्याचे एकात्मिक उपाय –
अ) प्रतिबंधात्मक उपाय –
1. शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
2. शेतातील पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवू देऊ नयेत.
3. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावी. त्यामुळे तणांचा प्रसार रोखला जातो.
ब) निवारनात्मक उपाय –
1. उन्हाळ्यामध्ये आपल्याला शेतीची खोल नांगरट करायची आहे. जेणेकरून जमिनीतील लव्हाळ्याच्या गाठी वर येतील आणि उन्हामध्ये त्या तळून नष्ट होतील.
2. नांगरणी नंतर त्या ठिकाणी दोन ते तीन वेळा कोळपणी करायची आहे.
3. पिक फेरपालट, सेंद्रिय मल्चिंग, आंतरपीक या पद्धतीचा वापर करावा.
क) जीव जिवाणूंचा वापर –
1. कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते.उदा.
2. लव्हाळा या तणाचे निर्मूलन बॅक्ट्रा वेरुटाना या जैविक कीटक यांद्वारे करता येते.
ड) लव्हाळा तण नियंत्रण (lavala weed control) करण्याचे रासायनिक उपाय (lavala herbicide) –
1. सोयाबीन – सोयाबीन पिकामध्ये लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांमध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास सिजेंटा कंपनीचे फ्युजिफ्लेक्स 400 मिली किंवा यूपीएल कंपनीचे आयरिश 400 मिली किंवा ड्युपाँड कंपनीचे क्लोबेन हे तण नाशक 15 ग्रॅम प्रति एकर फवारणी साठी वापरावे.
2. ऊस – ऊस पिकामध्ये लागवडी नंतर 30 ते 35 दिवसांमध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास धानुका कंपनीचे सेम्प्रा हे तणनाशक 36 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला फवारणीसाठी वापरायचे आहे. आणि एक काळजी घ्यायची आहे की फवारणी केल्यानंतर शेतामध्ये दहा ते पंधरा दिवस कोणतीही मशागत करायची नाही.
3. भात – भात पिकामध्ये लागवडीनंतर 20 ते 22 दिवसांनी लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बायर कंपनीचे सनराइज 40 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला फवारणीसाठी वापरायचे आहे. फवारणीनंतर 24 तासानंतर आपल्याला भात पिकाला पाणी द्यायचे आहे.
4. मका – मका पिकामध्ये लागवडी नंतर 25 ते 30 दिवसांनंतर लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास
धानुका कंपनीचे सेम्प्रा हे तणनाशक 36 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला फवारणीसाठी वापरायचे आहे.
lavala weed control करताना काही महत्वाची सूचना –
1. वरील तणनाशके जर तुम्ही आपल्या शेतात फवारले तर तुम्हाला आपली पिके थोडीफार पिवळी पडल्याची दिसतील.
2. त्यासाठी चिलेटेड झिंक 15 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी लागेल. तुमच्या पिकावरील पिवळेपणा दूर होईल.
तणनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी –
1. तणनाशकांची शेतात फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य नेहमी तयार ठेवावे.
2. खाद्य पदार्थ, औषधे व तणनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये.
3. तणनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी कुलूपबंद ठेवावीत.
4. तणनाशकांच्या डब्यावरील पतंगाच्या आकाराचे चिन्ह व त्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तणनाशकाची निवड करावी.
5. पीक, कीड व रोग निहाय तणनाशकांची निवड करून शिफारशीत प्रमाणात फवारणी करावी.
6. तणनाशक फवारणी साठी वापरलेला पंप चुकूनही कीडनाशकांच्या फवारणी साठी वापरू नये.
7. तणनाशक हाताळताना व फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गमबुट इ. चा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्यावी.
8. तणनाशके द्रावण हाताने न ढवळता काडीच्या साहाय्याने हातात हात मोजे घालून ढवळावे.
9. तणनाशके अंगावर पडू नयेत यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.
10. फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत.
11. तणनाशकांचे रिकामे डब्बे तसेच शेतात फेकून न देता पाण्याचे स्त्रोत विहीर, नदीपासून दूर जमिनीत खोल गाडून टाकावे.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील लव्हाळा तणनाशक फवारणी (lavala weed control) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1.लव्हाळा या तणाचा उपयोग कशासाठी होतो?
उत्तर – सुगंधी तेल आणि अगरबत्ती बनवण्यासाठी लव्हाळा या तणाचा उपयोग होतो.
2. लव्हाळा हे तण कोणत्या वर्गात मोडते?
उत्तर – लव्हाळा हे तण एकदल वर्गीय आहे.
3. लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकात होतो?
उत्तर – लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव सोयाबीन ऊस मका भात या पिकांमध्ये होतो.
4. तणनाशके वापरणे सुरक्षित आहे का?
उत्तर – तणनाशकांसह सर्व रसायने मानवी आरोग्यासाठी संभाव्य घातक आहेत.
लेखक –
कृषी डॉक्टर मृण्मयी
9168911489