मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Mukhyamantri ladki bahin yojana –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (लाडकी बहीण योजनेबद्दल (Ladki bahini yojana) संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कृषी डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाईट वरील हा लेख पूर्ण वाचा. ही महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- ची आर्थिक मदत DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर) द्वारे देण्यात येईल.
पात्रता | Ladki bahin yojana criteria –
1. स्थायी रहिवाशी: महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
2. महिला प्रकार: विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि कुटुंबातील एकटा अविवाहित महिला.
3. वयोमर्यादा: किमान २१ वर्षे व कमाल ६५ वर्षे पूर्ण असावे.
4. आधार लिंक बँक खाते: लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5. वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असावे.
अर्जासाठी अपात्रता –
1. उच्च उत्पन्न: ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा अधिक आहे.
2. आयकरदाता: ज्यांचे कुटुंब आयकरदाता आहे.
3. सरकारी नोकरी: सरकारी विभाग किंवा उपक्रमांमध्ये कार्यरत कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी.
4. इतर लाभ: ज्यांना इतर आर्थिक योजनांद्वारे रु. १५००/- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ मिळत आहे.
5. उच्च पदाधिकारी: कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहेत.
(सूचना – आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा —-> शेती माहिती)
अर्ज प्रक्रिया | Ladki bahin yojana application process –
👉ऑनलाइन अर्ज: महिलांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना ऑनलाइन अर्ज करणे अवघड असेल, त्यांना स्थानिक अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा सरकार सेवा केंद्राच्या मदतीने अर्ज भरता येईल.
👉अर्जामध्ये माहिती: अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव, जन्मदिनांक, पत्ता, बँक तपशील आणि मोबाईल नंबर अचूक भरावा.
👉अर्जाच्या साठी शुल्क: अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे | Ladki bahin yojana documents –
1. आधार कार्ड
2. अधिवास प्रमाणपत्र (जुने रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक)
3. उत्पन्न प्रमाणपत्र (जर लागले तर)
4. बँक खाते तपशील (आधार लिंक असलेले)
5. महिलेसाठी हमीपत्र व फोटो
अर्जाची स्थिती | Ladki bahin yojana form status –
👉पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या: १,१२,७०,२६१
👉मंजूर अर्जांची संख्या: १,०६,६९,१३०
अर्जाची स्थिती कशी तपासायची –
1. महिला लाभार्थी त्यांच्या अर्जाची स्थिती लाडकी बहिण योजना पोर्टल वर जाऊन तपासू शकतात.
2. “अर्ज स्थिती तपासा” या पर्यायावर क्लिक करून, आपले आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका.
3. अर्जाची सद्यस्थिती मिळेल.
अर्ज स्थितीचे वेगवेगळे अर्थ
👉समीक्षित: अर्जाची प्रक्रिया चालू आहे.
काय करावे: थोडा वेळ प्रतीक्षा करा. सूचित केले जाईल.
👉मंजूर: अर्ज मान्य करण्यात आला आहे.
काय करावे: आपल्या बँक खात्यात लाभाची रक्कम येण्याची प्रतीक्षा करा.
👉अर्ज अस्वीकृत झाल्यास: अर्ज अस्वीकृत झाल्यास, तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल ज्यामध्ये कारण दिले जाईल. स्थानिक कार्यालय किंवा संगणक सेवा केंद्रात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
आवश्यक कागदपत्रांमध्ये सुधारणा करून पुन्हा अर्ज भरा.
लाडकी बहीण योजनेबद्दल तक्रार कोठे करावी –
👉अधिकृत वेबसाइट: ladkibahin.maharashtra.gov.in
👉हेल्पलाइन नंबर: 1800 120 3023 (कॉलिंगसाठी)
👉संबंधित अधिकाऱ्याचे कार्यालय.
👉नारी शक्ती दूत मोबाइल अॅपद्वारे तक्रार करा.
निष्कर्ष | Conclusion –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण संधी आहे. योग्य कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेणे आपल्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरू शकते.
सतत विचारले जाणारे प्रश्न | People also ask –
1. लाडकी बहिण योजना काय आहे?
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली योजना आहे, ज्यात २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य मिळते.
2. लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना मिळतो, जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत.
3. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, व इतर संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
4. लाडकी बहिण योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज करता येतो.
5. या योजनेचा लाभ किती वेळात मिळतो?
अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीस रुपये १,५००/- लाभ मिळतो.
6. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
या योजनेच्या अंतिम अर्जाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु शासनाने लवकरच याबाबत माहिती जाहीर करेल.
7. लाडकी बहिण योजना सुरू करण्याची तारीख काय आहे?
या योजनेला २८ जून २०२४ रोजी मान्यता मिळाली.
8. कसा तपासावा अर्ज मंजूर झाला का?
अर्जाच्या स्थिती तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक वापरून लॉगिन करावे लागेल.
9. योजनेचे आर्थिक फायदे काय आहेत?
या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- ची आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्यात मदत होते.
आमच्या इतर वेबसाइट्स –
👉कृषी औषधे (सर्व कृषी औषधांची माहिती देणारी वेबसाइट)
👉फसल जानकारी (शेती निगडित हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)
👉कृषि दवा (सर्व कृषी औषधांची हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)
Author | लेखक –
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412
संपर्क – contact@krushidoctor.com