नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवारामध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला खोडवा ऊस व्यवस्थापन (khodwa us niyojan) बद्दल सविस्तर माहिती देणार आहे. ज्याच्या मध्ये आपण पाहणार आहोत –
– खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे.
– उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे, पाचट व्यवस्थापन.
– ऊस पिकाची बुडखे छाटनी.
– बगला फोडणे.
– खत व्यवस्थापन.
– पानी व्यवस्थापन.
– अंतरमशागत आणि कीड व रोग व्यवस्थापन.
चला तर मग आज “खोडवा ऊस व्यवस्थापन (khodwa us niyojan): टार्गेट एकरी 100 टनाचे !” हा विषय सविस्तर मध्ये समझून घेऊया.
खोडवा उसाचे उत्पादन कमी येण्याची कारणे –
1. सेंद्रिय खतांचा वापर होत नाही.
2. उसाचे पाचट जाळणे.
3. लागणी पेक्षा खोडव्याकडे हॉट असलेले शेतकऱ्यांचे दुर्लक्ष.
4. कीड व रोगाचा प्रादुर्भाव.
5. अपुरे खत नियोजन.
उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे –
1. पूर्वमशागतीची गरज नसल्याने श्रम, वेळ व पैशांची बचत होते.
2. बेणे, बेणे प्रक्रिया यावरील खर्चात बचत होते. (२५ ते ३० टक्के).
3. मुळांची वाढ अगोदरच झालेली असल्याने फुटवा लवकर, एकसमान व भरपूर होतो.
4. खोडवा ऊस व्यवस्थापनला लागणारा १ ते २ महिन्यांचा कालावधीही वाचतो. ऊस लवकर पक्व होतो.
5. साखरेचा उतारा चांगला येतो.
6. कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार उसाचे ३ ते ४ खोडवे यशस्वीरीत्या घेता येतात. त्याचे हेक्टरी १०० मे. टन उत्पादन घेता येते.
7. खोडवा पिकात पडलेल्या पाचटामुळे जमिनीवर आच्छादन होऊन ओलावा टिकून राहते.
8. पाण्यामध्ये बचत होते. दुष्काळी परिस्थितीतही पीक तग धरण्यास मदत होते.
9. आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
10. पाचटाचे शेतामध्येच कंपोस्टमध्ये रुपांतर करता येते. परिणामी सेंद्रिय खतांवरील खर्च कमी होतो.
11. उसाच्या पाचटात अंदाजे ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद, ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२-४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो.
* खोडवा ऊस व्यवस्थापन मधील प्रमुख मुद्दे –
1. खोडवा ऊस व्यवस्थापनसाठी (khodwa us niyojan) सुधारित जाती –
अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी. उदा. को-८६०३२, को-एम-२६५, को-८०४०, को-७२१९, को-८०१४, को-युएआय ९८०५ इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.
2.खोडवा ऊस व्यवस्थापन मध्ये पाचट व्यवस्थापन कसे करावे ?
1. ऊस तुटून गेल्यावर पाचट न जाळता त्याचे आच्छादन करावे. याच्या मुळे आपल्याला Khodwa us niyojnatun एकरी अंदाजे ४ ते ५ मे. टन पाचटापासून शेतातच उत्तम कंपोस्ट तयार करता येते.
2. त्यासाठी ऊस तोडणीनंतर शेतातील पाचटाचे ढीग पसरून घ्यावेत. ऊस बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटून बुडखे मोकळे करावेत किंवा एक आड एक सरीमध्ये पाचट दाबून बसवावे.
3. ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली असल्यास पाचटाचे तुकडे होऊन जमिनीलगत हलकासा पाचटाचा थर तयार होतो.
4. त्यावर हेक्टरी १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक शेणखतात मिसळून समप्रमाणात पसरावे.
5. त्याचबरोबर हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे.
शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल
3. खोडवा ऊस व्यवस्थापनमध्ये (khodwa us niyojan) बुडखे छाटणे –
तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास उसाचे बुडखे मोठे राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. यामुळे जमिनीखालील कोंब जोमाने फुटतात. एकूण फुटव्यांची संख्या वाढते. कीड व रोगग्रस्त उसाचे बुडखे नष्ट करून सर्व नांग्या भरून घ्याव्यात.
4. खोडवा ऊस व्यवस्थापनमध्ये (khodwa us niyojan) बगला फोडणे –
ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते. त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. नवीन मुळ्याची वाढ होते.
5. खोडवा ऊसातील खत व्यवस्थापन –
1. खोडवा ऊसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते.
2. त्यासाठी ऊस तुटल्यावर १५ दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी ७५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६, ५० किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी.
3. खते माती आड करून पाणी द्यावे.पहिल्या मात्रेनंतर ६ आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी ७५ किलो द्यावी.
4. ऊर्वरित मात्रा एकरी १०० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६ व ७५ किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी.
5. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी ६० टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा. उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फर्टिगेशन तंत्राने द्यावी.
( टीप – दर १५ दिवसांनी एकरी ८ किलो मॅग्नेशियम सल्फेट व २५० ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत. )
6. खोडवा ऊसातील (khodwa us niyojan) पाणी व्यवस्थापन –
1. मुख्य ऊस पीक तुटून गेल्यावर ३५ दिवसांत वरील सर्व कामे पूर्ण झाल्यावर आणि खतांची मात्रा जमिनीतून दिल्यावर पहिले पाणी लगेच देणे गरजेचे आहे.
2. सुरवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांनी आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे.
3. पाचटाचे आच्छादन असल्यास पाण्याची पाळीचे अंतर वाढण्यास मदत होते व जमिनीतील पाणी जास्त दिवस टिकून राहते.
4. Khodwa us pikat ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. जास्तीचे क्षेत्र ओलिताखाली आणता येते.
5. ठिबकमधून पाणी व्यवस्थापन करताना पाणी कार्यक्षम मुळांच्या कक्षेत ४५ ते ५० सें.मी. खोलीपर्यंत जाईल अशाच पद्धतीने द्यावे. 6. ४५ ते ५० सें.मी. खोल पाणी जाण्यासाठी किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून त्यानुसार ठिबक संच किती वेळ चालवायचा हे ठरवावे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
7.खोडवा ऊसामधील (khodwa us niyojan) आंतरमशागत –
ऊस तुटून गेल्यावर २ ते २.५ महिन्यांनी ४ इंच माती खोडव्याच्या बुडख्याशी लावून घ्यावी. ३.५ ते ४ महिन्यांनी मोठी भरणी करावी. त्यामुळे अपेक्षित फुटव्यांची संख्या नियंत्रित करणे शक्य होते. तसेच जमिनीत हवा खेळती राहून पाणी धारण करण्याची क्षमता वाढते, तणांचा बंदोबस्तही करता येतो.
8. खोडवा ऊस पीक संरक्षण –
1. कीड व रोगाचा Khodwa usawar प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाची पिकावर फवारणी करावी.
2. पीक पिवळे पडू नये म्हणून १ टक्के फेरस सल्फेट (१० ग्रॅम प्रतिलिटर) अधिक १ टक्के मॅग्नीज सल्फेट अधिक २.५ टक्के युरियाची (२५ ग्रॅम प्रतिलिटर) १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी.
3. ऊस तुटल्यावर आणि बुडखे छाटल्यावर बुडख्यांवर अर्धा टक्का (५ ग्रॅम प्रतिलिटर) चुन्याची निवळी तयार करून फवारावे.
4. त्यामुळे रसातील फ्रुक्टोजचे ग्लुकोजमध्ये रुपांतरण होऊन त्याचा ऊस लवकर फुटण्यासाठी फायदा होतो.
9. ऊस पक्वता व तोडणी –
खोडवा पीक १२ महिन्यात पक्व होते. पक्वता चाचणी घेऊन उसतोडणी केल्यास उत्पादन व उतारा जास्त मिळण्यास मदत होते.
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो, आशा करतो की कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वरील आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि या लेखाच्या मदतीने तुम्ही यंदाच्या हंगामात खोडवा ऊसातून देखील एकरी 100 टन उत्पादन घ्याल. जाता-जाता एक विनंती, हा लेख तुम्हाला जर खरच आवडला असेल तर कृपया तुमच्या इतर What’s App Group मध्ये शेयर करा.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. खोडवा ऊस म्हणजे काय?
उत्तर – खोडवा ऊस म्हणजे ऊसाच्या पहिल्या पिकाच्या तोंडणी नंतर त्याच शेतात नवीन लागवड न करता त्याच ऊसाच्या मूळ आणि खोडावर ऊसाचे दुसरे पीक घेणे. जर आपण त्यावरच तिसरे पीक घेतले तर त्याला निडवा असे म्हणतात.
2. उसासाठी सर्वोत्तम बुरशीनाशक कोणते?
उत्तर – ऊस पिकासाठी बरीच बुरशीनाशके शिफारशीत करण्यात आली आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही एका बुरशीनाशकावर अवलंबून न राहता गरजेनुसार वेग-वेगळ्या नामांकित कंपनीच्या बुरशीनाशकांचा वापर करावा.
3. उसाचे व्यवस्थापन कसे केले जाते?
उत्तर – ऊस व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून नियोजन करणे गरजेचे आहे. जसे की जमिनीची मशागत, बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड, खत व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन. तुम्ही जर या सर्व गोष्टी अभ्यास पूर्वक केल्या तर नक्कीच तुम्हाला एकरी 100 टन ऊस उत्पादन मिळू शकते.
4. ऊस रोगावर नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – यासाठी तुम्हाला ऊस पिकाचे दररोज निरीक्षण करणे गरजेचे आहे. रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्येच शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करावा. पानी गरजेनुसार द्यावे व खत व्यवस्थापन देखील माती परीक्षण वर आधारित करावे. ही सर्व केले तर नक्कीच तुम्ही ऊस पिकातील कोणत्याही रोगावर विजय मिळवू शकता.
5. उसाचे उत्पादन कशामुळे वाढते?
उत्तर – उसाचे उत्पादन ही चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन केल्यामुळे वाढते. त्यामुळे ऊस लागवडीपूर्वी जमीनचे माती परीक्षण करा व त्यानुसार खत व्यवस्थापन करा.
लेखक –
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412