नमस्कार शेतकरी मित्रांनो! स्वागत आहे तुमच Krushi Doctor या वेबसाइट वरती. आजच्या लेखामध्ये आपण “कापूस बोंड अळी नियंत्रण ( kapus bond ali niyantran in marathi )” या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे की कापूस पीक म्हणल की बोंडअळी हा विषय आलाच आणि बोंडआळी म्हणल की भरमसाठ फवारण्या देखील आल्या. मग इतक्या फवारण्या खर्च घेण गरजेच असतं का ? तर मुळीच नाही. आपण जर कापूस पिकामध्ये सुरुवाती पासून बोंडआळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केले तर खूप कमी खर्चामध्ये आपण बोंडआळीचे नियंत्रण करू शकतो. आणि तीच एकात्मिक पद्धत आपण या ठिकाणी सविस्तर मध्ये पाहणार आहोत, हा लेख तुम्हाला आवडला तर शेयर करायला विसरू नका. चला तर सुरू करूया …
kapus bond ali niyantran चे निवारक उपाय –
1. प्लॉट चे वेळो – वेळी निरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे.
2. एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत.
3. बोंडआळीच्या प्रकारानुसार ल्युरचा वापर करावा. ( गुलाबी बोंड आळी ) – पेक्टिनो ल्युअर
4. प्लॉट मध्ये ट्रायकोग्रामा स्पे . ( ट्रायको कार्ड चा वापर अवश्य करावा. )
कापूस बोंड अळी नियंत्रणाचे प्रतीबंधात्मक उपाय –
अ) प्रादुर्भाव कमी असताना – ( कापूस बोंड अळी नियंत्रण )
1. सर्व प्रथम निंबोळी अर्क 5% या प्रमानात फवारणी करावी.
2. एझाडीरेक्टिन ( 300 ppm ) – 5 मिलि / लीटर पानी
3. स्पिनोसॅड 45 एस सी – 1 मिलि / लीटर पानी ( ट्रेसर ,कोर्टेवा )
4. बिटा – सायफूथ्रीण ( 2.45% Sc ) – 1 मिलि / लीटर पानी ( रिसपोंसर , बायर )
ब) प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर –
1. सायपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% EC – 10 मिलि ( विराट, यूपीएल )
2. थायोडिकार्ब 75% Wp – 20 ग्राम ( लारविण , बायर )
3. एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी – 4 ग्राम ( प्रोक्लेम , सिंजेन्टा )
4. प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC – 20 मिलि ( प्रो-रिन, धानुका )
5. क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रिन ५% – 20 मिली ( हमला 550 , घरडा केमिकल्स )
( सूचना – वरील प्रमाण ही प्रति 10 लीटर पाण्यासाठी आहे. )
( कापूस बोंड अळी नियंत्रण प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
kapus bond ali niyantran ची फवारणी घेताना कोणती काळजी घ्यावी ?
1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
3. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
5. फवारणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.
6. फवारणी करताना कीटकनाशके ही आलटून – पालटून वापरावी. म्हणजे एकच-एक कीटकनाशक वारंवार वापरू नये.
7. फवारणी करताना स्टीकरचा वापर अवश्य करावा.
Conclusion ) | सारांश –
अश्या प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर वरील माहितीनुसार कापूस पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या कापूस पिकामध्ये बोंडआळीचे नियंत्रण केले तर तुम्ही देखील खूप कमी खर्चामध्ये बोंडआळीचे नियंत्रण करू शकता. ही माहिती हा लेख आवडला असेल तर खाली कमेंट नक्की करा व या लेखाची लिंक शेयर नक्की करा. धन्यवाद 🙏 भेटूया अश्याच एका नवीन लेखामध्ये .
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. बोंड आळी साठी काय करावे?
उत्तर – बोंडआळी नियंत्रणासाठी आपल्याला कापूस पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन केले पाहिजे. व सुरुवातीपासून बोंडआळीचे विविध पद्धतीने म्हणजेच ( यांत्रिक, जैविक, रासायनिक व मशागत ) नियंत्रण करायला हवे.
2. बोंड आळी आहे का?
उत्तर – कापूस पिकामध्ये बोंडामध्ये जर छिद्र दिसत असेल तर ती नक्कीच बोंडआळी असू शकते.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489