शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कांदा लागवड (kanda lagwad) याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने कांदा लागवडीसाठी कोणती जमीन आवश्यक आहे, कांद्याचे विविध वाण, रासायनिक खते रोग आणि किडी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्हयात घेतले जाते.
हवामान | Weather –
कांदा हेक्टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते.
जमीन | Soil –
पाण्याचा उत्तम निचरा असणारी भुसभूशीत जमीन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली मानवते.
पुर्वमशागत | Tillage Managment –
जमिनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.
कांदा लागवड हंगाम | kanda lagwad time –
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
कांदा लागवडीसाठी उपयुक्त वाण | Best variety for kanda lagwad –
1. बसवंत 780 – खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
2. एन 53 – ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.
3. एन- 2-4-1 – ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणूकीत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.
4. पुसा रेड – कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतो. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
बियाण्याचे प्रमाण – हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.
कांदा लागवड पद्धत | kanda lagwad padhat –
1. कांद्याची रोपे, गादी वाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
2. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा.
3. वाफ्यातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफ्याच्या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्यात.
4. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे.
5. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे. बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
6. रोपांना गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्य समजावे.
7. खरीप कांद्याची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात.
8. रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफ्यावर तसेच सरी वरंब्यावर करता येते.
9. सपाट वाफ्यामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते.
10. सपाट वाफा दोन मीटर रुंद व उताराप्रमाणे वाफ्यांची लांबी ठेवावी.
11. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करावी. रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी.
खते व पाणी व्यवस्थापन | kanda lagwad khat niyojan –
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे. त्यानंतर 1 महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
आंतरमशागत | Inter cultivation –
रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयाअगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि माना पडून कांदा काढणीस तयार होतो.
रोग व कीड | Pest & Disease –
कांद्यावर प्रमुख रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात. शेंड्यापासून पाने जळाल्या सारखी दिसतात. खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळ्या अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्टभागात खरडतात. व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
उपाय –
1. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झाल्यानंतर दोन तीन आठवड्यानी प्रती हेक्टरी मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू एस.सी. (फॉस्किल, युपीएल) 550 मिली अधिक मॅनकोझेब 75 डब्ल्यू. पी. (इण्डोफिल,डायथेन एम 45) 1250 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पाहिली फवारणी करावी.
2. पहिल्या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्या वेळी प्रती हेक्टरी मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यू. एस.सी. (नुवाक्रोन) 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्लोराईड 50 डब्ल्यू. पी. (धानुकोप,धानुका) 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी व उत्पादन | Harvesting & Yield –
1. कांदयाचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यात काढणीस तयार होते.
2. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते.
3. यालाच मान मोडणे असे म्हणतात. 60 ते 75 टक्के माना मोडल्यावर कांदा काढणीस पक्व झाला असे समजावे.
4. कुदळीच्या साहाय्याने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4,5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगाऱ्याच्या रूपाने ठेवावा.
5. नंतर कांद्याची पात व मुळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी.
6. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा kanda lagwad: कांदा लागवड ते काढणी संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कांद्याची लागवड कधी करावी?
उत्तर – महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
2. कांदा बियाणे किती दिवसात उगवते?
उत्तर – लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.
3. कांदा वाढण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – कांद्याला बियाण्यापासून परिपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात, जे सुमारे चार महिने असतात. सेटमधून, कांदे सुमारे 80 दिवसांनी किंवा फक्त तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412