नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर (Krushi Doctor) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “कांदा फवारणी वेळापत्रक (kanda favarni mahiti): मार्केट मधील बेस्ट कीटकनाशकांची यादी ” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –
1. कांदा थ्रिप्स नियंत्रण (kanda favarni mahiti) –
अ) सुरुवाती अवस्थेमध्ये –
थायमिथोक्सम २५ डब्लूजी (अरेव्हा- धानुका एग्रीटेक) ८ ग्राम किंवा असिटामीप्रिड २०एस पी (टाटा माणिक) ८ ग्राम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल (कॉन्फिडोर- बायर क्रॉप सायन्स) ८ मिली किंवा असिफेट ५०% +इमिडाक्लोप्रिड १.८ एस पी ( लान्सर गोल्ड- युपीएल ) – २२ ग्राम किंवा फिप्रोनील ५ एससी (फॅक्स – धानुका एग्रीटेक ) – २२ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.
ब) प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर –
फिप्रोनील ४०% +इमिडाक्लोप्रिड ४०% डब्लू जी (पोलीस- घरडा केमिकल्स)- ८ ग्राम किंवा थायोमेथोक्साम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेड सी (झेपॅक- धानुका एग्रीटेक) ८ मिली किंवा अफीडोपायरोफेन ५० डीसी (सेफिना – बीएएस एफ) ३० ग्राम किंवा फिप्रोनील ४% + असिटामीप्रिड ४% एस सी (प्राविझ – आदामा) ३० मिली प्रति १५ ली पापं या प्रमाणात फवारणी करावी.
2. कांदा करपा नियंत्रन (kanda favarni mahiti) –
अ) प्रतिबंधात्मक उपाय –
रोगांच्या जैविक व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ३७ मिली + शूडोमोनास फ्लुरोसन्स ३७ मिली प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
ब) निवारणात्मक उपाय –
– मेटॅलॅक्सिल ३५% डब्लू पी (मॅट्रिक्स- ऍडव्हान्स पेस्टीसाईड) १५ ग्राम किंवा
– क्लोरोथॅलोनील ७५% डब्लू पी (कवच- सिंजेंटा इंडिया)- ३० ग्राम किंवा
– सायमोक्सिनिल ८% +मॅंकोझेब ६४% डब्लूपी (कर्झेट-ड्यूपॉन्ट)- ३० ग्राम किंवा
– फ्लसीलॅझोल १२.५%+कार्बेन्डाझिम २५% (धानुका लस्टर) ३० मिली किंवा
– टेबुकोनाझोल +ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबीन (नेटीओ- बायर)- ८ ग्राम किंवा
– अझोक्सिस्ट्रोबिन ११.५% +मॅंकोझेब ३०% डब्लूपी (प्लुटॉन- क्रिस्टल) ३० ग्राम किंवा
– मेटीराम ५५% +पायराक्लॉस्ट्रोबीन ५% (कॅब्रिओटॉप- बीएएसएफ)- ३५ ग्राम किंवा
– अझोस्ट्रोबिन १८.२%+डायफेनकोनाझोल ११.४% एस सी (धानुका-गोडीवा सुपर) १५ मिली प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.
( कांदा फवारणी वेळापत्रक प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
कांदा फवारणीसाठी (kanda favarni mahiti) काही स्मार्ट टिप्स –
1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी पानी हे 6.5 ते 7.5 ph चे वापरावे.
3. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा “कांदा फवारणी वेळापत्रक (kanda favarni mahiti): मार्केट मधील बेस्ट कीटकनाशकांची यादी ” हा लेख तुम्हाला आवडला असेल. वरील माहितीनुसार आपण जर कांदा पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या कांदा पिकाचे नियोजन केले तर कांदा पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह एकरी तब्बल 200 क्विंटल इतके उत्पादन घेऊ शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न ( FAQ ) –
1. कांदा किती दिवसात येतो?
उत्तर – कांदा हे पीक 4.5 ते 5 महिन्यात काढणीला येते.
2. कांदा पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?
उत्तर – कांदा पिकाला शक्य तितके सेंद्रिय खत टाकावे, आणि सोबत रासायनिक खत हे एकरी 100 किलो नत्र , 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश या प्रमानात टाकावे. या मात्रा पिकाच्या अवस्थेनुसार विभागून देणे आवश्यक आहे. आणि जर आपण माती परीक्षण करून या मात्रा ठरवल्या तर ते अधिक उत्तम राहील.
3. कांद्याचे फायदे काय?
उत्तर – कांदा हा शरीरासाठी खूपच लाभदायी आहे. कांद्या मध्ये प्रामुख्याने विटामीन B, B6 आणि B9 हे अधिक प्रमानात असते जे आपल्या शरीर वाढीसाठी खूप मदत करते.
4. एक हेक्टर लागवडीसाठी अंदाजे किती किलो कंद लागतात?
उत्तर – कांदा लागवडीसाठी हेक्टरी 1500 ते 2200 किलो निरोगी बियाणे आवश्यक आहे.
5. कांद्याचे रोप कधी टाकावे?
उत्तर – प्रमुखाने खरीप व रब्बी अशा दोन हंगामांत केली जाते. खरीप हंगामात मे – जून महिन्यांत रोपे तयार करूनच त्यांची पुनर्लागवड जून – जुलै महिन्यांत करतात. जुलै – ऑगस्ट ह्या काळात तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असते, त्यामुळे कांदा तयार होण्यास मदत होते.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
मो. 9168911489