शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कलिंगड लागवड (kalingad lagwad) करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये कलिंगडासाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, कलिंगडाच्या लागवडीची पद्धत आणि पाणी व्यवस्थापन, कलिंगडाची काढणी आणि उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
प्रस्तावना –
महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड (kalingad lagwad) अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात कलिंगड हे पिक उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते.
जमीन व हवामान | best climate for kalingad lagwad –
मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या kalingad lagwad करण्यासाठी योग्य असते. या पिकाकरिता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच 18 अंश सेल्सिअस च्या खाली व 32 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. 21 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.
कलिंगड लागवड हंगाम best climate for watermelon |
या पिकाची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. |
बियाण्याचे प्रमाण watermelon seed rate |
कलिंगडासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास 3 ग्रॅम थायरम चोळावे. |
पूर्वमशागत soil preparation for watermelon |
शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी. |
कलिंगड लागवड पद्धत | kalingad lagwad method –
कलिंगडाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.
1. आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी 3-4 बिया टोक्याव्यात.
2. सरी वरंबा पद्धत – 2 X 0.5 मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी 1 X 0.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया टोकून लावाव्यात
3. रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीने लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेळ गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येत खरब होत नाहीत. यासाठी 3 ते 4 मी. अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मी. अंतरावर 3 ते 4 बिया टाकाव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन | fertilizer & water management in kalingad lagwad –
या पिकासाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश लागवडीपुर्व द्यावा व kalingad lagwad केल्यानंतर 1 महिन्यांनी 50 किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर 8 ते 10 दिवसांच्याअंतरानेपाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे 15 – 17 पाळ्या द्याव्या लागतात.
आंतरमशागत | intercultural operations kalingad lagwad –
बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे. रानातील म्होठले तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बे पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो. अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वाफसा आल्यानंतर बी टोकावे.
सुधारित जाती – best variety of watermelon –
क्रमांक | नाव | कंपनीचे नाव | किंमत |
1 | FB रॉयल रेड | फार्म सन बायोटेक | 598 प्रति 25 ग्रॅम |
2 | ऊर्जा युएस 20011 | ऊर्जा सीड्स | 350 रूपये प्रति 10 ग्रॅम |
3 | कबीर f1 हायब्रीड | आयरिश हायब्रीड सीड्स | 2178 प्रति 50 ग्रॅम |
4 | आस्था | ननहेम्स | 1115 प्रति 1000 बिया |
5 | FB रॉयल बेबी | फार्मसन बायोटेक | 578 प्रति 25 ग्रॅम |
6 | एन एस 777 | नामधारी सीड्स | 406 प्रति 50 ग्रॅम |
7 | AFA 306 | अशोका सीड्स | 185 प्रति 50 ग्रॅम |
8 | सागर किंग | सागर सीड्स | 1375 प्रति 50 ग्रॅम |
विद्राव्य खते कशी सोडावी –
1. शाखीय वाढ – 19:19:19 आणि 12:61:00
2. फुल आणि फुटवा – 12:61:00 आणि 13:40:13
3. फळ सेटिंग – 12:61:00 आणि 13:00:45
4. फळ फुगवण – 00:52:34 आणि 13:00:45
5. फळ परिपक्वता – 00:00:50
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
रोग | disease of watermelon –
1. भुरी | powdery mildew in watermelon – या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
उपाय – इंडोफिल कंपनीचे सलफील, सल्फर 80 % डब्ल्यू. पी. हे औषध 90 लिटर पाण्यात 10 ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा फवारवे. नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा फावरणी करावी.
2. केवडा | downy mildew of watermelon – पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.
उपाय – इंडोफिल कंपनीचे इंडोफिल झेड 78, डायथेन झेड -78, 0.2% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.
3. मर | wilt in watermelon – हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मारतात.
उपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व 1 किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम चोळावे.
कीड | insects in watermelon –
1. फळमाशी | fruit fly in watermelon – या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.
उपाय – कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेलाथिऑन या औषधाचा 1 टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.
2. तांबडे भुंगे | beetle in watermelon – बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.
3. मावा | aphids in watermelon – हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.
उपाय – किड दिसल्यास मेलाथिऑन हे औषध 0.1 टक्का या प्रमाणात फवारावे.
काढणी व उत्पादन | watermelon harvesting –
1. कलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात.
2. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात.
3. बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी सुरु होते व 3 ते 4 आवडयात पुर्ण होते.
4. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे.
5. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.
6. कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली कि ते तयार झाले असे समजावे.
7. तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो.
8. मात्र कच्चे असल्यास धातुच्या वस्तूवर ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.
9. कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .
10. तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर असा फळातून आवाज येतो.
11. फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.
12. कलिंगडाचे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल येते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा kalingad lagwad: कलिंगड लागवड संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कलिंगड किती दिवसात तयार होते?
उत्तर – बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी सुरु होते व 3 ते 4 आवडयात पुर्ण होते.
2. कलिंगड कधी लावावे?
उत्तर – तापमान उपयुक्त असून असून भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान मानवते. कलिंगडाची लागवड जानेवारीत करावी म्हणजे कलिंगडाची फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412