शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कडकनाथ कोंबडी (kadaknath kombadi) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये कडकनाथ कोंबडी पालन कसे करावे, कडकनाथ कोंबडीच्या चिकन चे (kadaknath chicken) फायदे, कोंबडीची अंडी आणि कडकनाथ कोंबडीचा चिकन चा भाव सविस्तरपणे पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे.
2. या जातीचे स्थानिक नांव कालामासी असे आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी.
3. संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचे रक्त आणि मांसही काळे असते.
4. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरात लगतचे जिल्हे मिळून अंदाजे 800 चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते.
5. आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या जातीच्या कोंबड्या पाळतात.
6. हा पक्षी पवित्र समजला जातो आणि दिवाळीनंतर देवीला त्याचा बळी चढवला जातो.
7. कडकनाथ कोंबडी (kadaknath kombadi) ही तिच्या विशिष्ट गुणांमुळे आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
कडकनाथ कोंबडीच्या उपजाती | kadaknath kombadi variety –
1. पेन्सिल
2. जेट ब्लॅक
3. गोल्डन
कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये | kadaknath kombadi features –
1. एक दिवसाच्या पिलांचा रंग निळसर ते काळा असतो आणि पाठीवर अनियमित गडद पट्टे असतात.
2. या जातीचे मांस काळे असले आणि पाहायला अयोग्य वाटले तरी ते चविष्ट त्याचबरोबर औषधी असल्याचे मानले जाते.
3. आदिवासी लोक कडकनाथ चे रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.
4. मांस आणि अंडी प्रथिने (मांसामध्ये 25.47 टक्के) आणि लोह यांनी समृद्ध असल्याचे मानले जाते.
– 20 आठवड्यांनी शरीराचे वजन 920 ग्रॅम
– लैंगिकदृष्ट्या पक्वावस्था वय 180 दिवस
– वार्षिक अंडी उत्पादन (संख्या) – 105
– 40 आठवड्यांनी अंड्याचे वजन 49 ग्रॅम
– गर्भधारण क्षमता – 55 %
– उगवण क्षमता – 52 %
कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचे महत्त्व | benefits of kadaknath eggs –
1. या कोंबडीची अंडी वृद्ध लोकांसाठी आणि वाढत्या मुलांसाठी चांगले आहेत. यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर आणि कोलेस्ट्रॉल कमी आहे.
2. कडकनाथ अंडी मायग्रेन, बाळंतपणानंतर होणारी डोकेदुखी, मूत्रपिंडाची तीव्र आणि जुनाट जळजळ, दमा इत्यादी वर उपचार करण्यास मदत करतात.
कडकनाथ कोंबडीचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म | benefits of kadaknath chicken –
1. कडकनाथ मध्ये प्रोटीन चे प्रमाण भरपूर असते.
2. कोंबडीच्या इतर जातींमध्ये प्रथिने 18 ते 20 टक्के असतात तर कडकनाथ मध्ये 25 टक्के जास्त असतात.
3. संशोधनानुसार, कडकनाथ मध्ये कोलेस्ट्रॉल 73 टक्के कमी होते तर ब्रॉयलर चिकन मध्ये 13 ते 25 टक्के कमी होते.
4. कडकनाथ मध्ये अमायनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते.
5. कडकनाथ मधील खनिजे म्हणजे नियासिन, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्व बी 1, बी 2, बी 12, जीवनसत्व सी आणि ई मोठ्या प्रमाणात आहे.
6. कडकनाथ कोंबड्यांचे मांस विविध रोगांवर उपचारासाठी वापरले जाते.
7. कडकनाथ रक्ताचा उपयोग आदिवासी जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी करतात.
कडकनाथ कुक्कुट पालन | kadaknath kombadi palan –
1. तुम्ही देशी कुक्कुटपालनाप्रमाणे कडकनाथ कोंबडीचीही काळजी घेऊ शकता.
2. या कोंबडीला खायला फारसा खर्च येत नाही. हिरवा चारा, बरसीम, बाजरी खाऊनही त्यांची वाढ झपाट्याने होते.
3. पिल्लांसाठी तुम्ही जिल्ह्यातील कोणत्याही प्रगतीशील शेतकरी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधू शकता. तुम्ही याची सुरुवात किमान 30 पिलांसह करू शकता. जर बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही अधिक पिल्ले देखील खरेदी करू शकता.
4. तुम्ही कडकनाथ मुर्गी पालन दोन प्रकारे करू शकता.
A. खुले पोल्ट्री फार्म
B. बंद पोल्ट्री फार्म
व्यवसाय सुरु करण्यासाठी शेड ची उभारणी –
1. शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्या नजिक किंवा शेता मधे शेड ची उभारणी करावी.
2. साधारण 1 ते 1.5 वर्गफूट (square feet) प्रति पक्षी ह्या हिशोबने आपल्या गरजेनुसार पक्क्या शेड ची उभारणी करावी.
3. मध्यभागी 10 ते 12 फूट उंच आणि दोन्ही बाजूस 8 ते 10 फुट उंची ठेवावी.
4. शेड ला 2 ते 3 फुट उंच भिंत असावी.
5. चिकन मेश या जाळीच्या साह्याने शेड बंदिस्त करावे.
6. जमिनीवर फरशी किंवा कोबा करावा.
7. कोंबड्यांना मुक्त संचारा साठी शेड ला लागून मोकळी कंपाउंड जाळी मारलेली जागा असावी.
कडकनाथ कुक्कुटपालनासाठी या गोष्टी लक्षात ठेवा –
1. कडकनाथ कोंबडी (kadaknath kombadi) पालनासाठी गाव किंवा शहरापासून थोड्याच अंतरावर पोल्ट्री फार्म उघडा.
2. यासाठी कृषी विज्ञान केंद्र किंवा कोणत्याही पोल्ट्री फार्ममधून प्रशिक्षण घ्यावे.
3. पोल्ट्री फार्ममध्ये फक्त निरोगी पिल्ले ठेवा.
4. थोड्या उंचीवर फॉर्म तयार करा, जेणेकरून पाणी साचणार नाही.
5. शेतात प्रकाश व पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी.
कडकनाथ कुक्कुटपालनासाठी सरकारी मदत –
1. तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही यासाठी ‘ कडकनाथ मुर्गी पालन योजने’ची मदत घेऊ शकता. मध्य प्रदेश सरकार कडकनाथ जातीच्या कोंबडीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ही योजना चालवत आहे.
2. कडकनाथ च्या 40 पिलांच्या संगोपनासाठी राज्य सरकार 4400 रुपये अनुदान देते. याचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा.
3. याशिवाय, तुम्ही सर्व राज्यांमध्ये नॅशनल लाइव्ह स्टॉक मिशन आणि पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड (PVCF) अंतर्गत कर्ज आणि सबसिडीचा लाभ घेऊ शकता.
4. या मध्ये सर्वसाधारण वर्गाला 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. बीपीएल आणि एससी/एसटी आणि ईशान्येकडील राज्यातील लोकांसाठी 33 टक्क्यांपर्यंत सबसिडीची तरतूद आहे.
कडकनाथ कोंबड्यांच्या अंड्याचे दर | kadaknath egg rate –
अंड्यांबद्दल बोलायचं झालं तर बाजारात कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचा दर 20 ते 30 रुपये आहे. जर तुम्ही याची सुरुवात फक्त 100 पिल्ले संगोपन केले तर तुम्हाला त्यातून सुमारे 60-70 हजार रुपये मिळू शकतात.
कडकनाथ कोंबडीचा दर | kadaknath kombadi –
कडकनाथ कोंबडीची किंमत बाजारात 3000 ते 4000 रुपये आहे, तर मांस 700-1000 रुपये किलोपर्यंत विकलं जातं. जेव्हा हिवाळ्यात मांसाचा वापर वाढतो, तेव्हा कडकनाथ कोंबडीच्या मांसाची किंमत 1000-1200 रुपये किलोपर्यंत पोहोचते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कडकनाथ कोंबडी (kadaknath kombadi) पालन माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कडकनाथ कोंबडी एका वर्षात किती अंडे देते?
उत्तर – कडकनाथ कोंबडी एका वर्षात 105 अंडी देते.
2. कडकनाथ कोंबडीच्या कोणत्या जाती आहेत?
उत्तर -पेन्सिल,जेट ब्लॅक आणि गोल्डन या कडकनाथ कोंबडीच्या उपजाती आहेत.
3. कडकनाथ कोंबडी मध्ये शरीराला आवश्यक असणारे कोणते घटक असतात?
उत्तर – कडकनाथ मधील खनिजे म्हणजे नियासिन, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जीवनसत्व बी1, बी 2, बी 12, जीवनसत्व सी आणि ई मोठ्या प्रमाणात आहे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489