शेयर करा

kabaddi cotton seeds

शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुनः एकदा स्वागत आहे Krushi Doctor या शेती माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. आणि यामध्ये मी तुम्हाला कापूस पिकाच्या एका खूप चांगल्या आणि नामांकित वानाबद्दल म्हणजेच कबड्डी कापूस बियाणे (kabaddi cotton seeds) बद्दल सांगणार आहे. सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांची कपाशी लागवडी बाबत चर्चा सुरू आहे. यात सर्वात जास्त पसंती तुलसी सीड्स च्या कबड्डी वाणास मिळत आहे. खरे तर मागील काही वर्षांपासून कबड्डी या वाणाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या कबड्डी हे वाण इतके लोकप्रिय आहे की शेतकरी या वाणाची खरेदी छापील किमतीपेक्षा जादा दराने करत आहेत. तर चला मग आपण पाहूयात कबड्डी या वाणाची काय काय वैशिष्ट्य आहेत .



कबड्डी कापूस बियाणे (kabaddi cotton seeds) प्रमुख वैशिष्ट्ये –

1. या वाणाची लागवड विदर्भ मराठवाडा या दुष्काळी पट्ट्यात केली जाते.
2. मध्यम आणि भारी, बागायती, कोरडवाहू अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये कबड्डी या वाणाची लागवड केली जाते.

3. पेरणीचे अंतर –
अ) दोन ओळींमधील अंतर ४ फुट
ब) दोन रोपांमधील अंतर २ फूट

4. पेरणीचा हंगाम- मे आणि जून
5. पेरणीची पद्धत – dibbling
6. तुलसी कंपनीच्या कबड्डी या वाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून ते शेंड्यापर्यंत याला पाच पाकळी बोर्ड लागतात त्यामुळे झाडाला जास्तीत जास्त बोंडे लागतात.
7. बोंडांचा आकार मोठा असल्याने बोंडांचे वजन सहा ते सात ग्रॅम भरते.
8. आपल्याला या वानापासून उच्च प्रतीचा धागा मिळतो आणि त्यामुळे आपल्याला बाजारात भाव देखील चांगला मिळतो.
9. एका झाडाला साधारणता 60 ते 70 बोंडे लागतात. आणि त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात चांगली वाढ होते.
10. कापूस या पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, रस शोषक अळींचा प्रादुर्भाव होतो. कबड्डी हे वाण या सर्व समस्यांना सहनशील असे वाण आहे.



कबड्डी कपाशी बियाणे बद्दल आणखीन काही –

1. राज्यातील दर्जेदार वाणांपैकी सर्वोत्कृष्ट कपाशी बियाण्यामध्ये तुळसी तू सीड्स कंपनीचे कबड्डी कापूस वान मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
2. या कापूस वाणाची जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते.
3. खास करून जे शेतकरी जिरायती कोरडवाहू कपाशीची लागवड करतात
4. किंवा बागायती जेणेकरून पाण्याची सोय उपलब्ध असणारे असे दोन्ही शेतकरी कबड्डी या कपाशीची लागवड करतात.
5. मागील वर्षी जून आणि जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत पावसाचे मोठे खंड दिसले.
6. तसेच ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू झाला. अशात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

कबड्डी कपाशी बियाणे (kabaddi cotton seeds) खत व्यवस्थापन कसे करावे?

1. कबड्डी या वाणाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणी बरोबर आपण 10: 26 :26 आणि 12 :32 :16 प्रति एकरी एक बॅग दिली पाहिजे.
2. लागवडीपासून विद्राव्य खतांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे.
3. वाढीच्या अवस्थेमध्ये NPK 19:19:19 100 ग्रॅम+मायक्रोन्यूट्रिएंट 50 मिली प्रती 15 लिटर एक महिन्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे.
4. फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये 12:61:00 100 ग्रॅम+मायक्रो न्यूट्रिएंट 50 ग्रॅम प्रति 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी.
5. बोंडाची साईज वाढवण्यासाठी 00:52:34+मायक्रो न्यूट्रिएंट ६०ग्रॅम फवारणी करावी.
6. बोंडे लवकर फुटण्यासाठी 00:00:50 100 ग्रॅम+मायक्रो न्यूट्रिएंट 60 ग्रॅम प्रमाणे प्रती 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी.



कापूस कबड्डी बियाणे (kabaddi cotton seeds) उत्पन्न –

कबड्डी हे वाण 160 ते 170 दिवसांमध्ये काढायला येते. यामधून उत्पन्न 14 ते 16 क्विंटल एकरी मिळू शकते.

कपाशी कबड्डी बियाणे (kabaddi cotton seeds price) किंमत –

400 ग्रॅम चे पॅकेट आपणास 800 ते 900 रुपये पर्यंत मिळू शकते

Conclusion | सारांश –

चला तर शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो आजच्या आमच्या Krushi Doctor वेबसाइट वरील “कबड्डी कापूस बियाणे (kabaddi cotton seeds)“ या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली आहे. तुम्हाला ही माहिती सांझळी आणि आवडली असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की, ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर यंदाच्या खरीप 2023 मध्ये सोबतीने कापूस पिकाचे भरगोस उत्पादन आणि उत्पन्न घेऊयात. धन्यवाद.

 

लेखक,

कृषि डॉक्टर


शेयर करा