शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ज्वारीच्या लागवड करण्यात येणाऱ्या हुरड्यासाठी असणाऱ्या निवडक वाणांची (jowar hurda) आपण माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
हिरव्या दाण्याचा हुरडा (jowar hurda) अतिशय स्वादिष्ट लागतो, कारण त्यावेळेस या दाण्यामध्ये मुक्त अमिनो आम्ल, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. खास हुरडा पार्टी साठी (hurda party) गोडसर रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या जाती राज्यातील कृषि विद्यापीठांनी विकसित केल्या आहेत.
हुरड्यासाठी ज्वारीच्या वाणांची नावे | jowar hurda varieties –
खरीप लागवडीसाठी वाण –
पीडीकेव्ही कार्तिकी (वाणी 103)
पीकेव्ही अश्विनी (वाणी 11/6)
रब्बी लागवडीसाठी वाण –
फुले मधुर
एसजीएस 8-4
परभणी वसंत
ट्रॉम्बे अकोला सुरुची
स्थानिक वाण –
सुरती
गूळभेंडी
कुची कुची
काळी दगडी
वाणी
मालदांडी
हुरड्याच्या वाणांची सविस्तर माहिती | Detail information of jowar hurda variety –
1. एसजीएस-8-4 –
– वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण.
– हुरडा रुचकर आणि गोड
– हुरड्याची प्रत उत्तम
– कणसातील दाणे सहजरीत्या वेगळे होतात
– इतर हुरड्याच्या जातीपेक्षा याचा दाणा टपोरा
– हुरडा उत्पादन 15 -16 क्विंटल प्रति हेक्टरी
– कडब्याचे उत्पादन 70-75 क्विंटल प्रति हेक्टरी.
2. फुले उत्तरा –
– स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित
– हुरड्याची अवस्था येण्यास 90-100 दिवस
– भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात
– सरासरी 70-90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
– हुरडा चवीस सरस अत्यंत गोड.
– ताटे गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
– कणीस गोलाकार, मध्यम घट्ट
– मध्यम उंचीचा,पाने पालेदार
– खोड मध्यम ,गोड रसरशीत
– खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम
– हुरडा उत्पादन – 20-25 क्विंटल प्रति हेक्टरी
– कडब्याचे उत्पादन – 55-60 क्विंटल प्रति हेक्टरी.
3. फुले मधुर (आर एस एस जी व्ही -46) –
– उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा.
– खोड मध्यम,गोड ,रसरशीत.
– वाण उंच व पालेदार जात.
– हुरडा अवस्था येण्यास 93 ते 98 दिवस लागतात.
– हुरडा अवस्थेत दाणे सहज सुटण्याचे प्रमाण हे 95 टक्के पेक्षा जास्त.
– खोडमाशी किडीस ,खडखड्या रोगास प्रतिकारक
– अवर्षणास प्रतिकारक
– हुरड्याचे उत्पादन 30-35 क्विं./हे.
– कडब्याचे उत्पादन 65-70 क्विं./ हेक्टर.
4. सुरती –
– चवीला अत्यंत गोड, त्यामुळे मागणी चांगली.
– दाण्याचा आकार गोल. कणसांचा आकार थोडा वाकडा.
– या ज्वारीचे एकरी 5-7 क्विंटल उत्पादन निघते.
– शिवाय 60 क्विंटल पर्यंत हिरवा कडबा सुद्धा होतो. – हा हुरडा 90 ते 100 दिवसांनी काढणीस येतो.
5. परभणी वसंत (पीव्हीआरएसजी 101) –
– खाण्यास चवदार,गोड,मऊ
– कणसातून दाणे सहजरीत्या वेगळे होतात
– हुरड्याची अवस्था येण्यास 95 दिवस
– खोडमाशी ,खोड कीड व खडखड्या रोगास सहनशील
– दाण्याची आणि कडब्याची प्रत उत्तम
– हुरडा उत्पादन 34 क्विंटल प्रति हेक्टरी
– कडब्याचे उत्पादन 133-135 क्विंटल प्रति हेक्टरी
– मराठवाडा विभागासाठी शिफारस.
6. ट्रॉम्बे अकोला सुरुची (टी ए के पी एस -5) –
– मळणीस अतिशय सुलभ
– हुरड्याची प्रत उत्तम,चवदार
– हुरडा तयार होण्याचा कालावधी 91 दिवस
– हुरड्याचे उत्पादन 43 क्विंटल
– हिरवा चारा उत्पादन 110 क्विंटल
– महाराष्ट्रासाठी प्रसारित.
7. पी डी के व्ही कार्तिकी (वाणी 103) –
– हुरडा चवदार आणि गोड
– हुरडा 82 ते 84 दिवसात तयार होतो.
– मीज माशीच्या प्रादुर्भावाला बळी पडत नाही.
– हुरडा उत्पादन 42 ते 43 क्विंटल प्रति हेक्टर.
– विदर्भासाठी प्रसारित.
8. के व्ही अश्विनी ( वाणी 11/6) –
– 82 ते 84 दिवसात हुरडा तयार
– हुरडा मळणीस सुलभ
– हुरडा अधिक गोड व चवदार
– दाण्यात साखरेचे प्रमाण अधिक
– मीज माशी प्रतिकारक
– हुरडा उत्पादन 42-43 क्विंटल प्रति हेक्टरी.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा jowar hurda: हुरड्यासाठी ज्वारीच्या या वाणांची निवड नक्की करा. हा लेख खूप आवडला असेल.ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल.ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.आणि मका पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या “Krushi Doctor” पेजला भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?
उत्तर – ज्वारीचे पीक तयार होण्यासाठी सुमारे पाच महिने लागतात.
2. तुम्ही ज्वारीची लागवड किती खोलवर करता?
उत्तर – ज्वारीची लागवड विविध पंक्तीच्या रुंदी मध्ये किंवा नमुन्यांमध्ये करता येते, परंतु 30 इंच किंवा त्यापेक्षा कमी पंक्ती रुंद ओळी पेक्षा 10% अधिक उत्पादनक्षम असतील. ज्वारीचे बियाणे साधारणपणे 1.25 ते 1.5 इंच खोल जमिनीचा पोत आणि ओलावा यानुसार लावावे.
3. ज्वारी कोणत्या प्रकारच्या जमिनीत घेतली जाते?
उत्तर – ज्वारीची लागवड कमी सुपीक जमिनीवर करता येते आणि त्यासाठी मध्यम पाऊस आणि मध्यम तापमान आवश्यक असते. विशेषत: ज्वारीसाठी गाळाची माती किंवा मिश्रित काळी माती आणि लाल माती योग्य आहे.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर