शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण रब्बी ज्वारी लागवड करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये ज्वारीसाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, ज्वारीच्या लागवडीची (jowar cultivation) पद्धत आणि पाणी व्यवस्थापन, ज्वारीवर येणारे कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
जमिनीची निवड | Soil selection for jowar cultivation –
1. ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
2. हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही व वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते.
ज्वारीचे बेस्ट वाण | Best variety for jowar cultivation –
1. हलकी जमीन (खोली 30 सें.मी. पर्यंत) — फुले अनुराधा, फुले माउली
2. मध्यम जमीन (खोली 60 सें.मी. पर्यंत) — फुले सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-35-1
3. भारी जमीन (खोली 60 सें.मी. पेक्षा जास्त) — सुधारित वाण : फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती. संकरित वाण : सी.एस.एच.15 आणि सी. एस.एच.19
4. बागायतीसाठी — फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही.18, सी. एस.एच 15, सी. एस.एच 19
5. हुरड्यासाठी वाण — फुले उत्तरा, फुले मधुर
6. लाह्यांसाठी वाण — फुले पंचमी
7. पापडासाठी वाण — फुले रोहिणी
ज्वारी लागवड कालावधी | Best season for jowar cultivation –
1. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीची पेरणी (jowar perni) मोठ्या प्रमाणावर केली जाते.
2. पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड (jowar cultivation) होत नाही.
3. गोकुळाष्टमीनंतर 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या ओलीवर 5 सें.मी. खोल रब्बी ज्वारीची लागवड करतात.
4. या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते.
5. रब्बी ज्वारीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवाडा (1 ते 15 ऑक्टोबर) हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते.
6. लवकर पेरणी केल्यास खोड माशीचा उपद्रव वाढतो.
7. उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही.
बियाणांचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया | Seed rate & Seed treatment –
1. हेक्टरी 10 किलो बियाणांची शिफारस आहे.
2. घरचे बियाणे वापरताना काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आणि पेरणी उशिरा झाल्यास खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम (70 टक्के) 3 ग्रॅम प्रति किलो अशी बीजप्रक्रिया करावी.
3. चाऱ्यासाठी ज्वारी लागवड (jowar cultivation) करताना एकरी 16 किलो बियाणे दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. ठेवून दाट पेरावे.
ताटांची योग्य संख्या आणि रुंद पेरणी –
1. जिरायती रब्बी ज्वारी जमिनीतील ओलाव्यावरच वाढते.
2. या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. (18 इंच) आणि हेक्टरी 10 किलो प्रमाणे बियाणे वापरून ज्वारीची पेरणी (sorghum farming) करावी.
3. उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपातील अंतर 15 सें.मी. ठेवून विरळणी करून, हेक्टरी ताटांची संख्या 1,35,000 ठेवावी.
4. ताटांची संख्या ही 1,35,000 पेक्षा अधिक ठेवल्यास ओलाव्यासाठी स्पर्धा होते, तसेच कमी अंतरावरील पेरणीमुळे आंतरमशागत करता येत नाही.
5. कणसे बाहेर न पडणे, कणसामध्ये दाणे न भरणे यामुळे उत्पादन कमी मिळते.
6. ओलिताखाली रब्बी ज्वारी लागवडीसाठी ताटांची संख्या 1,80,000 पर्यंत राखता येते.
सरी काढून त्यात पेरणी करणे –
1. मध्यम ते भारी (45 सेमी खोल) जमिनीवर बळीराम नांगराने दोन ओळींतील अंतर 45 सेमी. किंवा सुधारित वखराने 45 सेमी. अंतर ठेवून पेरणी पूर्वी 15 दिवस अगोदर सऱ्या काढाव्या.
2. आणि तिफणीच्या साहाय्याने पेरणी करावी. सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासणी करू नये.
खत व्यवस्थापन आणि फवारणी | Fertilizer management in jowar cultivation –
1. ज्वारी पिकासाठी एकूण रासायनिक खतांमध्ये 120 किलो नत्र 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश या प्रमाणे प्रती हेक्टरी एकूण खतांची आवश्यक असते.
2. या एकूण खतांचे वर्गीकरण दोन वेळेस करावे.
3. प्रथम पेरणीच्या वेळेस 60 kg नत्र, 60 kg स्फुरद, 60 kg पालाश या प्रमाणे खत द्यावे.व पेरणी नंतर 1 ते 1.50 महिन्यानी उर्वरित 60 kg नत्र द्यावे.
4. फवारणीच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करतांना 55 ते 60 दिवसा दरम्यान 13:00:45 (विद्राव्य खत) 100 ग्रॅम प्रती पंपासाठी आणि 70 ते 75 दिवसा दरम्यान फवारणी करतांना बीग.बी या विद्राव्य खताचा वापर करावा.
5. या खतामध्ये पोटॅश + मॅग्नेशियम + सल्फर यांचा समावेश असून या खताची 100 ग्रॅम प्रती पंप या प्रमाणे फवारणी करावी.
आंतरमशागत | Interculturing operations –
1. रुंद पद्धतीने 45 सेमी. अंतरावर ज्वारीची पेरणी केल्यास पिकांमध्ये कोळप्याच्या सहाय्याने दोन वेळेस मशागत करता येते.
2. अंतर मशागतीमुळे चिकणमातीच्या काळ्या जमिनीत पडलेल्या भेगा मातीने बुजवल्याने ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते.
3. आंतरमशागत मुळे (2 कोळपण्या) निंदणीचा खर्च कमी होतो.
4. पेरणी केल्यानंतर 3 आठवड्यांनी दोन ओळींत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन (मूग, उडीद इत्यादी काड) केल्यासही उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.
5. रुंद आणि खोल पेरणीसाठी सुधारित तिफणीचा वापर करावा.
6. रब्बी ज्वारीच्या पेरणी (sorghum cultivation) नंतर 65 आणि 75 दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होईल.
पाणी व्यवस्थापन | Water management in jowar cultivation –
1. रब्बी ज्वारीसाठी पहिले पाणी जोमदार वाढीच्या अवस्थेत म्हणजे पेरणी नंतर 25-30 दिवसांनी द्यावे.
2. अर्धे राहिलेले नत्र या पाण्याबरोबर देता येते.
3. दुसरे पाणी ज्वारी पोटरीत असताना म्हणजेच पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी द्यावे.
4. ज्वारीची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली असते. यामुळे अन्नद्रव्य कणसात जाण्यास मदत होते.
5. तिसरे पाणी ज्वारी फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 70-75 दिवसांनी द्यावे.
6. या पाण्यामुळे कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणीस वजनदार व मोठे होते.
7. चौथे पाणी कणसात दाणे भरताना म्हणजे पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी द्यावे.
8. या पाण्यामुळे दाण्याचा आकार मोठा होवून उत्पादनात वाढ होते.
9. रब्बी ज्वारीस एकच पाणी देणे शक्य असल्यास, ते पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांत अगर जमिनीत ओल असल्यास 40 ते 50 दिवसांत द्यावे.
10. दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरे पाणी 50 ते 55 दिवसांनी द्यावे.
11. हे संरक्षित पाणी तुषार सिंचन पद्धतीने दिल्यास अधिक फायदा होतो.
12. पाणी दिल्यानंतर आच्छादनाचा वापर करावा.
आंतरपीक | Intercropping –
1. वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास रब्बी ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते.
2. याउलट अधिक थंडीमुळे करडईचे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या समतोलपणाचा विचार केला तर रब्बी ज्वारी अधिक करडई यांचे 4 : 4 किंवा 6 : 3 या प्रमाणात आंतरपीक घ्यावे.
पीक संरक्षण | Crop protection in jowar cultivation –
अ) कीड नियंत्रण | Insect control –
1. रब्बी ज्वारीमध्ये खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळ्या या महत्त्वाच्या किडी आहेत.
2. त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळी खाली ठेवण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा.
4. मशागतीय तंत्रामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असलेल्या किडी व त्यांची अंडी इ. पक्षी व इतर कीटकभक्षकांकडून आणि वातावरणातील उष्णतेमुळे नाश होतो.
5. कीटकांची संख्या मर्यादित राहते. त्यासाठी उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
6. ज्वारीचा कडबा जनावरांना खाण्यास देतेवेळी बारीक तुकडे (कुट्टी) केल्यास कोशाचा मोठ्या प्रमाणात नाश होतो.
7. पुरेसा पाऊस पडल्यावर शक्य तितक्या लवकर (15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर) ज्वारीची पेरणी केल्यास खोडमाशी पासून पीक वाचवता येते. पिकांची फेरपालट हेही महत्त्वाचे ठरते.
8. पेरणीपूर्वी बियाण्यास सिजेंटा,कॅपकॅडीस, थायोमेथोक्झाम (30% एफ.एस.) 10 मि.लि. किंवा फॉर्मिडा गोल्ड,इमिडाक्लोप्रिड (48 % एफ.एस.) 10 मि.लि. अधिक 20 मि.लि. पाणी प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
9. पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी साधारण 10 टक्क्यांपर्यंत पोंगे मर आढळून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळी पर्यंत झाल्याचे समजून खोड कीड नियंत्रणाचे उपाय करावेत.
10. त्यासाठी, एकालक्स, सिंजेंटा,क्विनॉलफॉस (25 % ई.सी.) 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात 1 किंवा 2 फवारण्या कराव्यात.
ब) रोगनियंत्रण | Disease control –
प्रमुख रोग – खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि कणसातील काणी.
1. काणी रोगाच्या नियंत्रणासाठी, पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक (80 डब्ल्यू पी) 4 ग्रॅम प्रति किलो ही प्रक्रिया करावी.
2. खडखड्या रोगाच्या प्रादुर्भावास जमिनीतील पाण्याची कमतरता आणि जास्त उष्णतामान अनुकूल असते.
3. त्यासाठी विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण असल्यास पिकास एखादे पाणी द्यावे.
4. त्याच प्रमाणे पेरणीनंतर चौथ्या आठवड्यात सेंद्रिय आच्छादन (हेक्टरी 5 टन तूरकाड्या) केल्यास खडखड्या रोगामुळे ताटे लोळण्याचे प्रमाण 42 टक्क्यांनी कमी होते.
5. धान्य उत्पादनात 14 टक्क्यांनी वाढ होते.
उत्पादन | Yield –
वरील सर्व तंत्रज्ञान कमी खर्चाचे असून त्याचा वापर केल्यास उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होऊन हेक्टरी 15 ते 18 क्विं. धान्य आणि 35 ते 40 क्विं. कडबा उत्पादन मिळते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा jowar cultivation: रब्बी ज्वारी लागवड ते काढणी संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
लेखक –
K Suryakant