शेयर करा

IFFCO Nano DAP

शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे Krushi Doctor या वेबसाइट वरती पुनः एकदा स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत dap fertilizer 50 kg ते nano dap अर्धा लीटर बॉटल ची संपूर्ण माहिती.

26/4/2023 रोजी दुपारी 2:30 वाजता IFFCO सदन येथे, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह यांनी IFFCO Nano DAP हे खत संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्यांना समर्पित केले. इफको ची नॅनो डीएपी खताची एक बाटली पारंपारिक डीएपीच्या 50 kg बॅग जागा घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बाटली व्यावसायिक विक्रीसाठी 600 रुपये प्रति 500 ​​मिलीलीटर मध्ये उपलब्ध असेल. जी पारंपरिक DAP च्या सध्याच्या किमतीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. नॅनो डीएपीचे पहिले उत्पादन युनिट गुजरातमधील कलोल येथे स्थापन केले जाईल, अशी माहिती इफकोने लॉन्च कार्यक्रमादरम्यान दिली. पारंपारिक DAP ची 9 दशलक्ष टन (mt) कपात करण्यासाठी, इफकोने 2025-26 पर्यंत Nano DAP च्या 180 दशलक्ष बाटल्यांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डीएपी हे युरियानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वापरले जाणारे खत आहे आणि अंदाजे 10-12.5 दशलक्ष टन वार्षिक खप आहे. DAP चे स्थानिक उत्पादन सुमारे 4-5 दशलक्ष टन आहे, तर उर्वरित आयात केले जाते.

शेतकरी मित्रांनो ही तर होती IFFCO Nano DAP बद्दल एक महत्वाची बातमी. परंतु या बातमी पेक्षा जास्त महत्वाचे आहे, Nano DAP म्हणजे काय? Nano DAP कसे वापरावे? तसेच Nano DAP चे नेमके फायदे कोणते आहेत? या प्रमुख प्रश्नाची उत्तरे मिळवणे. चला तर मग आजच्या लेखामधून या सर्व प्रश्नाची अचूक उत्तरे मिळवूया. माहिती संपूर्ण वाचा आणि माहिती आवडलीच तर Like, Comment आणि Share करायला विसरू नका.



( इफको Nano DAP प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी Krushi Doctor या वेबसाइट ला भेट नक्की द्या. )

Nano DAP म्हणजे काय? | dap fertilizer –

1. Nano DAP मध्ये 8.0% नायट्रोजन आणि 16.0% फॉस्फरस आहे, जे की द्रव स्वरूपात एका बाटली मध्ये उपलब्ध आहे.
2. यांच्या कणांचा आकार 100 nm पेक्षा कमी आहे.
3. हे खत वनस्पतींमध्ये सहजरित्या प्रवेश करू शकते.
4. यात कार्यशील नायट्रोजन आणि फॉस्फरस क्लस्टर्स आहेत, ज्यामुळे ते पिकामध्ये लगेच पसरु शकतात.

बॉटल मधील नॅनो डीएपी कसे वापरावे?

1. नॅनो डीएपी बहुउपयोगी आणि सर्व पिकांसाठी योग्य आहे.
2. याचा डोस हा पीक अवस्था, बियांचा आकार आणि वजन यावर अवलंबून आहे.
3. हे बियाणे प्रक्रिया, मूळ/कंद प्रक्रिया किंवा फवारणीद्वारे वापरले जाऊन शकते.
3. शिफारस केलेल्या याची वापराची मात्रा पुढील प्रमाणे –
अ) बिजप्रक्रिया – 3-5 मिली प्रति किलो बियाणे.
ब) फवारणी – 3-5 मिली प्रति लिटर पानी.

नॅनो डीएपीचे फायदे | dap fertilizer –

1. Nano DAP वापरामुळे पीक उत्पादन वाढते.
2. Nano DAP च्या वापरामुळे पिकाचा एकूण दर्जा कमालीचा सुधारतो.
3. Nano DAP ही खत पिकांना पोषक तत्वांचा अचूक वापर प्रदान करते, ज्यामुळे रासायनिक खतांचा एकूण वापर कमी होतो.
4. पर्यावरणास अनुकूल – नॅनो डीएपी पर्यावरणास अनुकूल आहे आणि पर्यावरणास हानी न पोहोचवता पिकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करते.
5. Nano DAP हे एक द्रवरूप फॉर्म्युलेशन आहे जे साठवणे आणि वाहतूक करणे सोपे आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांसाठी तो एक सोयीस्कर पर्याय आहे.



( इफको नॅनो डीएपी प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )

Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की Krushi Doctor वरील आमचा “dap fertilizer 50 kg ते nano dap अर्धा लीटर बॉटल ची संपूर्ण माहिती” हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. IFFCO चे नॅनो डीएपी हे एक क्रांतिकारी उत्पादन आहे जे सर्व पिकांना नायट्रोजन आणि फॉस्फरसचे कार्यक्षम स्त्रोत प्रदान करते. सोबतच ही खत उच्च उत्पादन, चांगली गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासन देखिल देते. या खताचे अद्वितीय कण – बियाणे पृष्ठभागाच्या आत किंवा रंध्र आणि इतर वनस्पतींच्या आत सहज प्रवेश करू शकतात, ज्यामुळे ही खत शेतकर्‍यांसाठी एक प्रभावी आणि कार्यक्षम खत सिद्ध होते. याच्या अनेक फायद्यांसह, नॅनो डीएपी हे खत पीक उत्पादन सुधारण्यासाठी आणि रासायनिक खतांचा एकंदर वापर कमी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. What is nano DAP? नॅनो डीएपी म्हणजे काय?
उत्तर – Nano DAP मध्ये 8.0% नायट्रोजन आणि 16.0% फॉस्फरस आहे, जे की द्रव स्वरूपात एका बाटली मध्ये उपलब्ध आहे. यांच्या कणांचा आकार 100 nm पेक्षा कमी आहे.

2. Is nano DAP available in market? नॅनो डीएपी मार्केट मध्ये उपलब्ध आहे का?
उत्तर – हो Nano DAP आता सहज रित्या मार्केट मध्ये उपलब्ध आहे. ते तुम्ही नजीकच्या कृषि सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा – IFFCO Bazar

3. What is the price of IFFCO nano DAP? नॅनो डीएपी ची किंमत किती आहे?
उत्तर – इफको ची नॅनो डीएपी बाटली व्यावसायिक विक्रीसाठी 600 रुपये प्रति 500 ​​मिलीलीटर मध्ये उपलब्ध असेल. जी पारंपरिक DAP च्या सध्याच्या किमतीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. ते तुम्ही नजीकच्या कृषि सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा – IFFCO Bazar

4. What is the content of nano DAP? नॅनो डीएपी मध्ये कोणता घटक आहे?
उत्तर – Nano DAP मध्ये 8.0% नायट्रोजन आणि 16.0% फॉस्फरस आहे, जे की द्रव स्वरूपात एका बाटली मध्ये उपलब्ध आहे. यांच्या कणांचा आकार 100 nm पेक्षा कमी आहे. हे खत वनस्पतींमध्ये सहजरित्या प्रवेश करू शकते. यात कार्यशील नायट्रोजन आणि फॉस्फरस क्लस्टर्स आहेत, ज्यामुळे ते पिकामध्ये लगेच पसरु शकतात.

5. What is the benefit of nano fertilizer? नॅनो डीएपी चे फायदे कोणते आहेत?
उत्तर – Nano DAP वापरामुळे पीक उत्पादन वाढते.Nano DAP च्या वापरामुळे पिकाचा एकूण दर्जा कमालीचा सुधारतो. Nano DAP ही खत पिकांना पोषक तत्वांचा अचूक वापर प्रदान करते, ज्यामुळे रासायनिक खतांचा एकूण वापर कमी होतो. पर्यावरणास अनुकूल – नॅनो डीएपी पर्यावरणास अनुकूल आहे आणि पर्यावरणास हानी न पोहोचवता पिकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करते. Nano DAP हे एक द्रवरूप फॉर्म्युलेशन आहे जे साठवणे आणि वाहतूक करणे सोपे आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांसाठी तो एक सोयीस्कर पर्याय आहे.



लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489


शेयर करा