शेयर करा

high density mango plantation

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अति घन पद्धतीने आंबा लागवडीची (high density mango plantation) संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये अतिघन पद्धत म्हणजे काय, अतिघन आंबा लागवड पद्धत वापरून होणारे फायदे तसेच संपुर्ण लागवड (mango tree farming) कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

अतिघन आंबा लागवड म्हणजे काय? | What is high density mango plantation –

अति घन लागवड म्हणजे एकरी जास्तीत जास्त झाडे बसवणे होय. या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड, जमीन व अन्य संसाधने, तंत्रज्ञानाचा काटेकोर वापर करून एकरी जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे शक्य आहे. सर्वसाधारण शिफारशीत 10 × 10 मीटर अंतराऐवजी लागवडीचे अंतर अर्धे म्हणजे 5 × 5 मीटर केल्यास दुप्पट झाडे बसतात. त्याला घन लागवड म्हणतात. त्याहीपुढे जाऊन 1.5 × 3 मीटर किंवा 1.5 × 4 मीटर असे अंतर ठेवल्यास एकरी झाडांची संख्या आठ ते दहा पट जास्त होते. त्यास अतिघन लागवड असे म्हणतात.
फक्त ही लागवड चौरस पद्धतीने करण्याऐवजी आयताकृती (एकीकडून अंतर कमी करावे, तर दुसरी बाजू सर्वसाधारण ठेवावी.) व दक्षिण उत्तर पद्धतीने करावी. त्यामुळे दिवसभर झाडांना सूर्यप्रकाश याचा लाभ मिळू शकतो.



अतिघन आंबा लागवड पद्धतीमुळे होणारे फायदे –

1. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो.
2. कार्बनडाय ऑक्साईड (CO2) हा हवेपेक्षा जड असल्यामुळे झाडांकडून खालच्या थरात जास्त शोषण होते.
3. बाग लवकर फळात येते.
4. एक अंतर सर्वसाधारण ठेवल्यामुळे आंतरमशागत, फवारणी, खते देणे, फळांची अंतर्गत वाहतूक इ. कामे ट्रॅक्टरने करणे सोईस्कर.
5. जमीन आणि संसाधने यांचा उत्तम वापर.
6. फळांची निर्यातयोग्य गुणवत्ता मिळण्यासाठी उपाययोजना उदा. विरळणी, काढणी इ. सहज करता येतात.
7. उत्तम प्रतीची फळे आणि जास्त उत्पादन शक्य.
8. आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज वापर करता येतो.

अति घन लागवडीचे तोटे –

1. फळबाग उभारणीस सुरुवातीला जास्त खर्च लागतो.
2. बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी.
3. झाडाचे घेर नियंत्रण थोडे खर्चिक होते.

आवश्यक जमीन | Best soil for high density mango plantation –

1. आंब्याची अतिघन पद्धतीने लागवड (mango farming) करण्यासाठी जमीन ही उत्तम निचऱ्याची, एक मीटर खोल असावी. यासाठी काळी जमीन लागते.
2. जमिनीचा सामू 6.5 ते 8 असावा लागतो.

अतिघन लागवड पद्धत | Method of high density mango plantation –

1. आंबा लागवडीसाठी साधारणतः 1 × 1 × 1 मीटरचा खड्डा खोदून भरून घ्यावा लागतो.
2. अतिघन लागवडीत दोन झाडातील अंतर अतिशय कमी असल्याने खोदकाम यंत्राद्वारे एक मीटर रुंद व एक मीटर खोल नाली खोदून घेता येते.
3. जमीन हलकी असेल, तर 60 टक्के गाळ आणि 40 टक्के नालीतील मुरमाड माती अशा मिश्रणाने भरून घ्यावी.
4. नाली भरताना जेथे कलम लावायचे आहे, त्या ठिकाणी दोन टोपले शेणखत एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक पावडर मिसळून भरून घ्यावा.
5. चांगला पाऊस पडून किंवा पाणी देऊन भरलेली मोकळी माती दाबल्यानंतर कलमांची किंवा इनसिटू पद्धतीने लागवड करावी.
6. लागवडीच्या ठिकाणी कलमाची पिशवी बसेल असा लहानसा खड्डा खणावा.
7. त्यामध्ये 500 ग्रॅम निंबोळी पेंड, 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 25 ग्रॅम अझोटोबॅक्टर व 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक मिसळून कलम लागवड करावी.

आच्छादन वापर –

1. अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी कलमा खालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे तणसाचे आच्छादन करावे.
2. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुरळावी.
3. त्यामुळे वाळवीचा त्रास होणार नाही.
4. सेंद्रिय पदार्थ उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.



वारा प्रतिबंधक झाडांची लागवड –

1. कलमांना हिवाळ्याच्या शेवटी फळधारणा सुरू होते.
2. फळांची संपूर्ण वाढ ही भर उन्हाळ्यात होते.
3. या काळात ऊन तसेच गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरू, महागनी या उंच वाढणाऱ्या वारा प्रतिबंधक वृक्षाची लागवड करावी.

फळांसाठी छाटणी –

1. फळधारणा सुरू झाल्यानंतर दरवर्षी बागेत शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी.
2. दरवर्षी फळ काढणी होताच झाडाची छाटणी करावी.
3. छाटणीवेळी शक्यतोवर मागील वर्षाची अर्धी किंवा पूर्ण फूट छाटून घ्यावी.
4. छाटलेल्या ठिकाणी झाडावर बोर्डो पेस्ट लावावी. नवी पालवी येत असताना पावसाळा सुरू होतो.
5. त्यामुळे पानावर करपा रोग किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
6. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रण करावे.

कलमांना वळण –

1. लागवडीनंतर कलमांना शिफारशीप्रमाणे खत, पाणी द्यावे.
2. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड, रोग नियंत्रण करावे.
3. कलम दीड ते दोन फिट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा.
4. त्या ठिकाणाहून 3 ते 4 फांद्या निघतील.
5. त्यातील चांगल्या व भरघोस तीन फांद्या ठेवाव्यात. परत त्या फांद्यांना दोन ते तीन पेरांनंतर शेंडा मारावा.
6. अशा प्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा.
7. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कलमांची चांगली वाढ होऊन त्यावर भरपूर मोहोर येतो.

अतिघन लागवड पद्धतीची वैशिष्ट्ये | Features of the high density mango plantation –

1. फळधारणा सुरुवात – 3 वर्ष
2. पूर्ण उत्पादकता सुरुवात – 5 वर्ष
3. छाटणी – अत्यंत सोपी
4. फवारणी – फार सोपे
5. बागेचे आयुष्य – 20 ते 25 वर्ष
6. उत्पादकता –
👉चांगल्या उत्पादक जातीची – 20 ते 25 टन प्रति हेक्टरी
👉कमी उत्पादक वाण – 10 ते 12 टन प्रति हेक्टरी.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा high density mango plantation: अतिघन पद्धतीने आंबा लागवडीची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’S | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1.आंब्याचे झाड लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
उत्तर – हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला आंब्याची झाडे लावणे सर्वात उत्तम मानले जाते.

2. आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर – कोरड्या भागात कलम केलेली झाडे साधारणपणे 3 ते 5 वर्षात फळ देतात, तर रोपे लावलेल्या झाडांना साधारणपणे पाच वर्षे लागतात.

3. आंब्याची झाडे किती काळ उत्पन्न देऊ शकतात?
उत्तर – आंब्याची झाडे 40 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन देऊ शकतात.

4. एक आंबा पिकायला किती महिने लागतात?
उत्तर – झाडाला फुले आल्यानंतर आंब्याची फळे पिकण्यास तीन ते पाच महिने लागतात.

लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत


शेयर करा