शंखी गोगलगाय नियंत्रण (gogalgai niyantran) प्रस्तावना –
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्रात आपण बघतो अनेक व्यवसाय आहेत. आपण आजच्या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या शंखी गोगलगाय नियंत्रण (gogalgai niyantran) कसे करावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच शंखी गोगलगाय म्हणजे काय, या गोगलगाय ची ओळख आणि प्रसार कसा होतो, आणि याचे नियंत्रण (gogalgay niyantran) करण्यासाठी काय करावे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
1. मागील तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन (Soybean) पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव (Snail Outbreak On Soybean) सर्वत्र दिसत आहे.
2. विदर्भातील विशेषतः अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि धामणगाव तालुक्यात संत्रा (Orange) बागांसह पपई, केळी, वांगी, कपाशी (Cotton), सोयाबीन, मिरची, टोमॅटो, कोबी, हळद या पिकांवरही मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
3. एक ते दीड महिन्यापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आणि कमी सूर्यप्रकाश असलेले वातावरण गोगलगायींच्या प्रजोत्पादन व वाढीसाठी पोषक आहे.
4. शंखी आणि शेंबडी या दोन्ही प्रकारातील गोगलगाय या मृदुकाय वर्गात समाविष्ट आहेत.
5. ही कीड सर्वसाधारणपणे दोन ते तीन फूट उंचीपर्यंत वाढणाऱ्या पिकामध्ये जास्त हानिकारक ठरते.
गोगलगायीचा जीवनक्रम | snail life cycle –
1. एक मादी सरासरी ८० ते १०० अंडी एकाच वेळी पिकांच्या खोडाशेजारी किंवा मुळांजवळ भुसभुशीत मातीत घालते. ह्या अंड्यांचा रंग पारदर्शक किंवा पांढरा असतो.
2. अशाप्रकारे एक मादी वर्षातून ६ वेळा अंडी देते. सर्वसाधारण १७ दिवसांपर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, त्यांची वाढ पूर्ण होण्यास १० ते १२ महिने कालावधी लागतो.
शंखी गोगलगायीचा प्रसार | gogalgai niyantran –
1. या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली अशा साधनांद्वारे होतो. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कलम, रोपे, बेणे, ऊस इ. मार्फत प्रसार होतो.
2. पावसाळ्यात ढगाळ वातावरणात कमी प्रकाश, जास्त पाऊस म्हणजेच जास्त आर्द्रता, कमी तापमान २० अंश ते ३२ अंश सेल्सिअस या किडीला पोषक आहे.
3. सर्वसाधारणपणे शंखी अन्नपाण्याशिवाय चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात.
नुकसानीचा प्रकार | snail damage –
1. पालापाचोळा, कुजके पदार्थ, पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवरील पिवळी पाने (कॅल्शिअम जास्त असलेली) हे आवडीचे खाद्य आहे.
2. रात्री रोपावस्थेत पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. पिकांचे शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे व साल खातात.
3. लपण्याच्या जागा वाळलेल्या, कुजलेल्या गवताखाली, पाला पाचोळ्या खाली, काडी कचऱ्याखाली, पिकाच्या खोडा शेजारी, दगडांच्या सापटीत, शेतीच्या अवजारां खाली किंवा शंखात लपून बसतात.
शंखी गोगलगाय नियंत्रण (gogalgay niyantran) कसे करावे ?
1. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.
2. गोगलगायीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात द्राक्ष बागेमध्ये आच्छादन (मल्चींग) करू नये.
3. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.
4. किंवा शेतात मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे.
5. जेणेकरून त्यामध्ये गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्ये मरून जातील.
6. लहान शंखी साठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शियम क्लोराईड चा सुद्धा नियंत्रणासाठी बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो.
7. शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा 5 सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायीला शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.
8. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास 10 % बोर्डो पेस्ट लावल्याने गोगलगाय झाडावर चढत नाही.
9. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी (gogalgay niyantran) मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा.
10. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
11. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
12. शंखी गोगलगाय (shankhi gogalgay) प्रामुख्याने पिकलेली उंबराची फळे, पपईची रोपे व झेंडूच्या रोपाकडे आकर्षित होतात.
13. म्हणून मेटाल्डिहाईडच्या (स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानाजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.
14. शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी (gogalgay niyantran) जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.
15. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे.
16. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे.
17. त्यानंतर त्यामध्ये थायामिथॉक्झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
शंखी गोगलगाय (gogalgai niyantran) सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील gogalgai niyantran (शंखी गोगलगाय) नियंत्रण कसे करावे? हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. शंखी गोगलगाय चा प्रादुर्भाव कोणत्या पिकावर होतो?
उत्तर – सोयाबीन, पपई, केळी, वांगी, कपाशी (Cotton), सोयाबीन, मिरची, टोमॅटो, कोबी, हळद या पिकांवरही शंखी गोगलगाय चा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
2. शंखी गोगलगाय चा प्रसार कशा मार्फत होतो?
उत्तर – वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कलम, रोपे, बेणे, ऊस इ. मार्फत प्रसार होतो.
3. शंखी गोगलगाय प्रसारासाठी कशा प्रकारचे हवामान लागते?
उत्तर – पावसाळ्यात ढगाळ वातावरणात, कमी प्रकाश, जास्त पाऊस म्हणजेच जास्त आर्द्रता, कमी तापमान २० अंश ते ३२ अंश सेल्सिअस या किडीला पोषक आहे.
4. गोगलगाय फळ झाडावर चढू नये म्हणून काय उपाय करावे?
उत्तर – फळबागेमध्ये झाडाच्या खोडास 10 % बोर्डो पेस्ट लावल्याने गोगलगाय झाडावर चढत नाही.
लेखक
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412