शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. सध्या सगळीकडे डोळ्याची साथ पसरली आहे आणि ही साथ संसर्गजन्य आहे. हे सर्वांना माहीत आहे. मात्र याची काय लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही हे जाणून घ्यायलाच हवे. याशिवाय डोळ्यांची काळजी साथीपासून वाचण्यासाठी कशी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. आज आपण या लेखात डोळे येणे (eye flu) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आय फ्ल्यू म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणे काय आहेत, त्याचा प्रसार कसा होतो, आणि उपाय बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
पावसाळ्यात अनेक आजार पसरतात आणि सध्या सर्वाधिक पसरलेला आजार म्हणजे डोळे येणे. डोळ्यांची साथ अर्थात डोळ्यांचा संसर्ग अधिक प्रमाणात सध्या पसरताना दिसून येत आहे. डोळ्यांची साथ येण्यामागे नक्की काय कारणे आहेत आणि डोळ्यांचा संसर्ग कसा पसरतो अथवा डोळे येणे म्हणजे नेमके काय ज्याला इंग्रजीत Eye Flu असंही म्हटलं जातं. पिंक आय किंवा आय फ्ल्यू म्हणून देखील ओळखल्या जाणाऱ्या या आजारामध्ये कंजंक्टिवा (नेत्रश्लेष्मला) म्हणजेच डोळ्याच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ ऊतींवर आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह होतो. बहुतांश केसेसमध्ये कंजंक्टिवायटिस हा आजार विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गामुळे होतो.
आय फ्लूची लक्षणे | eye flu symptoms in marathi –
1. डोळ्याचा पांढरा भाग लालसर होणे.
2. कंजंक्टिवाला सूज येणे.
3. डोळ्यातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी येणे.
4. डोळ्यातून पिवळा स्त्राव येणे, हा पिवळा स्त्राव पापण्यांवर जमा होतो, खासकरून झोपून उठल्यावर हा स्त्राव जास्त प्रमाणात दिसतो. यामुळे जेव्हा तुम्ही झोपून उठता तेव्हा पापण्या जड आणि चिकटलेल्या असतात.
5. डोळ्यांना खाज येते.
6. डोळ्यांमध्ये जळजळ होते.
7. जास्त उजेड डोळ्यांना सहन होत नाही.
आय फ्लू कसा पसरतो? | eye flu spread –
1. आय फ्लूचा प्रतिबंध आणि प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी.
2. संक्रमित व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू न वापरणे.
3. हा आजार थेट संपर्कात आल्याने किंवा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने होते.
4. साधारणपणे टॉवेल, उशीचे अभ्रे, नळ, दाराच्या कड्या इत्यादी वस्तूंच्या स्पर्शाने हा आजार पसरतो.
5. संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा संपर्कात येते तेव्हा संक्रमण होते. संक्रमित हात डोळ्यांना लागल्यास संसर्ग होतो.
आय फ्लू संसर्ग किती दिवसात बरा होतो?
बहुतांश केसेसमध्ये आय फ्लू एका आठवड्यात पूर्णपणे बरा होतो. पण काही केसेसमध्ये याला पूर्णपणे बरे होण्यास २ आठवड्यांपर्यंतचा वेळ जाऊ शकतो. आय फ्लू हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे.
डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स | eye flu treatment at home –
1. हात वारंवार साबण आणि कोमट पाण्याने कमीत कमी २० सेकंद धुवावेत. साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल-बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर वापरा.
2. डोळ्यांना हात लावणे किंवा चोळणे टाळावे.
3. डोळ्यांमधून येणारा स्त्राव तसेच डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ हातांनी धुवावा. ही क्रिया दिवसातून अनेक वेळा करावी.
4. संसर्ग झालेल्या आणि संसर्ग न झालेल्या डोळ्यांसाठी एकच आय ड्रॉप बॉटल वापरू नये.
5. कॉन्टॅक्ट लेन्सेस पुन्हा वापरू शकता असे डोळ्यांचे डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरू नयेत.
6. चष्मा स्वच्छ ठेवा, तुमच्या हॅन्ड टॉवेल सारख्या वस्तू फक्त तुम्हीच वापरा, इतरांसोबत शेयर करू नका, तसे केल्यास संसर्ग वाढण्याचा, पसरण्याचा धोका असतो.
7. उशा, हात व चेहरा पुसण्याचे कापड, टॉवेल, आय ड्रॉप, डोळे किंवा चेहऱ्यांचा मेकअप, मेकअपचे ब्रश, कॉन्टॅक्ट लेन्सेस, कॉन्टॅक्ट लेन्स ठेवण्याच्या केसेस आणि चष्मा यासारख्या व्यक्तिगत वस्तू इतरांच्या वापरू नका, तुमच्या वस्तू इतरांना देऊ नका.
8. स्विमिंग पूलमध्ये जाऊ नका.
आय फ्ल्यू लक्षणे कमी करण्याचे मार्ग | eye flu treatment in marathi –
1. लक्षणे कमी करण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे आय ड्रॉप वापरा.
2. ल्युब्रिकंट आय ड्रॉप वारंवार वापरा.
3. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे बंद करा.
4. डोळ्यांना मेकअप करणे बंद करा.
5. कोमट ओल्या कापडाने तुमचे डोळे वारंवार धुवा.
6. जर पापण्यांना सूज आलेली असेल तर खोलीइतके तापमान असलेल्या पाण्यामध्ये कापड भिजवून त्याने डोळे स्वच्छ करून, बंद डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा eye flu: जाणून घ्या डोळे येणे (आय फ्ल्यू) या संसर्ग जन्य रोगाची लक्षणे, प्रसार आणि उपाय बद्दल संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. आय फ्लूची लक्षणे काय आहेत?
उत्तर – लालसरपणा आणि चिडचिड ही डोळा फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. हे डोळ्यांच्या नेत्रश्लेष्मला जळजळ झाल्यामुळे होते. डोळ्यांच्या रक्तवाहिन्या पसरतात आणि त्यामुळे गुलाबी दिसतात. लोकांना त्यांच्या डोळ्यांमध्ये खाज सुटणे, ओरखडे येणे किंवा शरीरातील परदेशी संवेदना जाणवू शकतात.
2. आय फ्लू गंभीर आहे का?
उत्तर – ही स्थिती अस्वस्थ आणि त्रासदायक असू शकते, परंतु योग्य काळजी आणि उपचाराने, डोळ्याच्या फ्लूची बहुतेक प्रकरणे गुंतागुंत न होता सुटतात .
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489