शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण एक शेतकरी एक डीपी (ek shetkari ek dp) योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. एक शेतकरी एक डीपी योजना नक्की काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
प्रस्तावना –
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 14 एप्रिल 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मान्यता दिली होती. तसेच 14 ऑक्टोबर 2020 रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च 2014 पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये 2 लाख 24 हजार 785 शेतकर्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएस ला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा आतापर्यंत 90 हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे. 11347 कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन 2248 कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.
एक शेतकरी एक डिपी योजनेची उद्दिष्ट | ek shetkari ek dp yojana objective –
शेतकऱ्यांना सध्या विजेसंबंधी वेग-वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समस्या जसे की –
1. लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे.
2. विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे.
4. तांत्रिक वीज हानी वाढणे.
5. रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ.
6. विद्युत अपघात.
7. लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे इत्यादि..
यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणाली द्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.
पात्रता व अटी | Eligibility criteria for ek shetkari ek dp yojana –
1. महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
2. फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र लाभ दिला जाईल.
3. अर्जदार शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे वयाची आठ कोणतीही नाही.
5. या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/गरीब वर्गातील शेतकरी घेऊ शकतात.
6. शेतकऱ्यांना प्रति HP 7,000 रु. इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल.
7. अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
8. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
9. अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
9. अर्जदार अपंग महिला असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
10. या योजनेचा लाभ पुरुषांना व महिलांना दिला जाणार आहे.
एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे | Benefits of the ek shetkari ek dp yojana –
1. ज्या शेतकऱ्यांच्या 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP मात्र 7,000 रुपये द्यावे लागतील.
2. अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना मात्र 5000 रुपये द्यावे लागतील.
आवश्यक कागदपत्रे | Documents for the ek shetkari ek dp yojana –
1. जवळच्या शेतकऱ्याची लाईट बिल
2. आधार कार्ड
3. 7/12 उतारा
4. 8/अ उतारा
5. 100 रुपये स्टॅम्प
6. जातीचा दाखला
7. मोबाईल नंबर
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया | Online application process –
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा – https://mahadiscom.in/ . या पेजवर गेल्यानंतर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा.
2. त्यावर नवीन कनेक्शन साठी अर्ज भरा या पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर अग्रिकल्चर (agriculture) वर क्लिक करा.
4. पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेल्या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा.
5. पुढे तुमच्यासमोर येईल नवीन फॉर्म उघडेल त्यावर तुमची सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट जमा करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
7. त्यानंतर मेल आयडी मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे सबमिट करा. शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा.
हेल्पलाईन नंबर | Helpline number for ek shetkari ek dp yojana –
1. शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
2. राष्ट्रीय टोल-फ्री – 1912 / 19120
3. महावितरण टोल-फ्री – 1800-102-3435 / 1800-233-3435
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा ek shetkari ek dp: एक शेतकरी एक डीपी योजना हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
उत्तर – एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
2. एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे ?
उत्तर – एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो.
3. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागेल?
उत्तर – अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5,000 रु. इतकी रक्कम अदा करावी लागेल.
4. एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?
उत्तर – एक शेतकरी एक डीपी योजनेची अंमलबजावणी राज्यात 14 एप्रिल 2014 पासून करण्यात आली.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489