शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण दोडका लागवड करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या निवडक वाणांची (dodka seeds) माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांनी दोडक्या ची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास त्यांना या पिकापासून चांगले उत्पादन घेता येते. दोडक्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, थायामिन, रिबोफ्लेविन आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. याशिवाय या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शेतकऱ्यांनी दोडक्याच्या सुधारित वाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना यातून चांगला नफा मिळू शकतो.
दोडक्याच्या काही निवडक जाती –
1. पुसा नसदार
दोडक्याची ही एक सुधारित जात आहे. या जातीचे दोडके हे हलके हिरवे असतात. या जातीच्या दोडक्याच्या सालीवर फुगलेल्या नसा सारखा आकार असतो. या जातीचा आतील भाग पांढरा आणि हिरव्या रंगाचा असतो. तसेच या जातींचे दोडके हे 12-20 सें.मी. लांब असते. दोडक्याच्या या जातीचे उत्पादन हे चांगले लक्षणीय आहे. या जातीपासून 70-80 क्विंटल प्रति एकरपर्यंत उत्पादन मिळू शकते.
2. सरपुटिया
दोडक्याची ही देखील एक सुधारित वाण आहे. या जातीची दोडके वेलीवर गुच्छांमध्ये लागतात. या जातीच्या दोडक्याचा लांबी हि इतर जातीपेक्षा लहान असते. या जातीच्या दोडक्यावर उंच पट्टे आढळतात. या जातीच्या दोडक्याची साल हि इतर जातीच्या दोडक्यापेक्षा अधिक जाड आणि मजबूत असते. दोडक्याची या जातीची लागवड जास्त करून मैदानी भागात आपल्याला अधिक पहावयास मिळेल.
3. P K M 1
दोडक्याच्या सुधारित जातीपैकी एक जात म्हणजे PKM1 हि एक जात. या जातीची दोडके हे चवीला चांगले चविष्ट असल्याचे सांगितले जाते. ह्या जातीचे दोडके हे दिसायला खुपच सुंदर असतात हे प्रामुख्याने गडद हिरव्या रंगाचे असतात. दोडक्याच्या या जातीपासून 280-300 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन मिळू शकते. दोडक्याची हि जात 160 दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातींचे दोडके हे पातळ, लांब, पट्टेदार आणि दिसायला किंचित वाकलेले असते.
4. घिया
दोडक्याची ही एक सुधारित जात आहे. या जातीचे दोडके हे चांगले हिरवे असतात. दोडक्याच्या या जातीची भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, आणि या जातीची लागवड करून शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत. शेतकरी मित्रांनो या जातीच्या दोडक्याची साल हि पातळ असते. दोडक्याच्या या जातीमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण चांगले मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे याचे सेवन आरोग्यासाठी चांगले सांगितले जाते.
5. काशी दिव्या
दोडक्याच्या या जातीचे वेल 4.5 मीटर उंच असून फळे दंडगोलाकार असतात रंग हलका हिरवा असून लांबी 20 ते 25 सें.मी. पेरणीनंतर 50 दिवसांनी पीक तयार होते. त्याची उत्पादन क्षमता 130-160 क्विंटल प्रति हेक्टर आहे.
6. नागा दोडका
दोडक्याच्या या जातीचा रंग हिरवा आणि लांबी 20-25 सें.मी. पेरणीनंतर 50-55 दिवसांनी पीक काढण्यासाठी तयार होते. त्याची उत्पादन क्षमता देखील चांगली आहे. दोडक्याचे प्रति हेक्टरी 200-220 क्विंटल उत्पादन मिळते.ओळीतील अंतर : 6-8 फूट; दोन रोपांमधील अंतर : 3 फूट ठेवावे.
7. पुसा स्नेहा
दोडक्याच्या या जातीचा रंग गडद हिरवा आणि लांबी 20-25 सें.मी. पेरणीनंतर 50-55 दिवसांनी पीक काढण्यासाठी तयार होते. त्याची उत्पादन क्षमता देखील चांगली आहे. दोडक्याचे प्रति हेक्टरी 200-230 क्विंटल उत्पादन मिळते.
8. स्वर्णप्रभा
या जातीला तयार होण्यास थोडा जास्त वेळ लागतो, परंतु उत्पादन चांगले मिळते. पेरणीनंतर 70-75 दिवसांनी पीक काढणी योग्य होते. प्रति हेक्टर उत्पादन क्षमता 200-250 क्विंटल आहे.
9. कल्याणपूर ग्रीन स्मूदी
दोडकाच्या या जातीची फळे मध्यम आकाराची आणि मांसल असतात. फळांवर हलके पट्टे तयार होतात आणि दोडक्याच्या या जातीची उत्पादन क्षमता खूप जास्त असते. लुफा चे प्रति हेक्टरी 350 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते.
शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल
सारांश | Conclusion –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा dodka seeds: मार्केट मधील टॉप 5 दोडका बियाणे हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या रब्बी हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि गहू पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1.दोडका लागवड कधी करावी ?
उत्तर – दोडका लागवड खरीप मध्ये जून-जुलै, तर उन्हाळी दोडका लागवड जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात करावी.
2. दोडका किती दिवसात काढायला येतो ?
उत्तर – दोडका सुमारे 140 ते 150 दिवसात काढणीला येतो.
3. दोडक्याचे प्रति हेक्टरी किती उत्पन्न होते ?
उत्तर – दोडक्याचे 15 ते 20 टन प्रति हेक्टरी उत्पादन होते.
लेखक –
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412