शेयर करा

custard apple diseases

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सिताफळ पिकातील प्रमुख किडी विषयी (custard apple diseases) सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तसेच त्यांच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

सीताफळ हे कोरडवाहू तसेच डोंगराळ भागातील प्रमुख फळपीक म्हणून सुपरिचित आहे.महाराष्ट्रातील पुणे, जळगाव,धुळे आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड झालेली आढळून येते. मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगररांगामध्ये सीताफळ हे नैसर्गिकरित्या वाढलेले दिसते.भविष्यात या दुर्लक्षित व विना खर्चिक फळपिकाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघणे गरजेचे दिसून येत आहे. सीताफळ या फळपिकावर सहसा कीड व रोग (custard apple diseases) यांचा प्रादुर्भाव होत नसला तरी बदलत्या हवामानामुळे त्यावर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. सीताफळाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करण्यासाठी रोग व किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण याविषयी माहिती घेणार आहोत.



महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | custard apple diseases control –

👉 पिठ्या ढेकूण (पांढरे ढेकूण/मेण कीडे) | Custard apple mealybug –

1. ही कीड पाने,कोवळ्या फांद्या,कळ्या आणि कोवळी फळे यामधून रस शोषण करते.
2. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्या व फळे गळतात.
3. अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर जास्त आढळतो.
4. या किडीच्या अंगातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळी बुरशी चढते.
5. त्यामुळे झाडांची पाने काळी पडून प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.

नियंत्रण –

1. कीडग्रस्त फांद्या व पाने काढून त्यावर 10 टक्के कार्बारिल भुकटी टाकून ती गाडावीत.
2. मिलीबगला खाणारे परभक्षी किटक क्रिटोलिमस मोन्टोझरी प्रती एकरी 600 ग्रॅम या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावे. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक बागेवर फवारू नये.
3. व्हर्टीसिलीयम लेकॅनी (फुले बगीसाइड) हे जैविक बुरशीनाशक 40 ग्रॅम + 50 ग्रॅम फिश ऑइल रोझीन सेप प्रति 10 लिटर पाण्यात आर्द्रता युक्त हवामानात फवारावे.
4. मिलीबग ला मारक पण परभक्षी कीटकांची कमी हानिकारक त्रिशुल, कोरोमंडल, क्लोरोपायरीफॉस 20 टक्के ई. सी. 25 मिली + 25 ग्रॅम ऑइल रोझीन सोप, निंजा, कोरोमंडल, बुप्रोफेझीन 25 एससी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून भुंगेरे सोडण्यापूर्वी फवारणी करावी.

👉 फळ पोखरणारे पतंग | Custard apple fruit borer –

1. ही कीड दक्षिण भारतात अधूनमधून आढळते.या पतंगाच डोके आणि खांद्याजवळचा भाग हिरवा असतो.
2. अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या फळांमध्ये घुसतात.फुलांमध्ये व घुसताना त्या वाकडा तिकडा मार्ग तयार करतात.नंतर त्यातील गर खातात.
3. त्यामुळे फळे खाली गळून पडतात. ही कीड ओळखण्याची खूण म्हणजे या किडीची विष्ठा फळावरील छिद्रावर जमा होतो.

उपाय –

1. किडग्रस्त फळे वेचून नष्ट करावीत.
2. झाडाजवळ खणून माती हलवून घ्यावी.
3. 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅ.या प्रमाणात पाण्यात विरघळणारे 50 टक्के अवान्सर ग्लो, युपीएल, कार्बारिल फवारावे.

👉 फळमाशी | Custard apple fruit fly –

1. ही कीड वर्षभर आढळते.
2. ही कीड फळाच्या आत अंडी घालते आणि मग अळ्या फळांचा गर खातात.
3. या किडीची ओळख म्हणजे ही कीड अंडी घालताना फळाला बारीक छिद्र करते.
4. त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते. कीड लागल्यावर फळे सडतात.
5. शेवटी ही फळे खाली गळून पडतात.



नियंत्रण –

1. सर्व किडकी फळे वेचून नष्ट करावीत. उन्हाळ्यात जमीन खोलवर खणून किंवा नांगरून त्यांचा नाश करावा.
2. 10 मी. ली. मेटॉसीड + 700 ग्रॅम गूळ + 3 थेंब सीट्रॉनील ऑईल एकत्र करून घ्या.
3. मिश्रणाचे 4 थेंब टाकून ते प्लास्टिकच्या डब्यात टाकावे.
4. या डब्यात 2 मी.मी. छिद्र करावे. त्यामुळे या किडीचे नर आकर्षित होऊन ते मरतील.
5. त्यामुळे किडीचा बंदोबस्त आपोआप होईल.
6. पाण्यात विरघळणारे अवान्सर ग्लो, युपीएल, कार्बारील 50 टक्के 40 ग्रॅम प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारावे.

👉 फुलकिडे | Custard apple thrips –

1. सीताफळ आणि द्राक्षांवर फुलकिडे आढळतात.
2. ही कीड व तिची पिल्ले पानातील व फुलातील रस शोषण करतात.
3. त्यामुळे काही वेळेस पाने गळून पडतात. यांचा जीवनक्रम फारच थोड्या दिवसांचा असतो.

नियंत्रण –

1. बेंज, नागार्जुन, बुप्रोफेझीन 25 एससी 20 मिली किंवा पोलो, सिजेंटा, डायफेन्थुरान 50 एसपी 12 ग्रॅम किंवा रीजेंट एस.सी, बायर, फिप्रोनील 5 एस सी 30 मिली.
2. तसे पाहिले तर सीताफळांवर ही कीड अगदी क्वचितच येते. परंतु ही कीड आल्यास 10 लि. पाण्यात वरील कीटकनाशकाची फवारणी करावी.

👉 पांढरी माशी | Custard apple white fly –

ही कीड दक्षिण भारतात कधीकधी आढळते. याची पिल्ले पानाच्या खालच्या भागातून अन्नरस शोषतात. त्यांच्या पोटातून ते चिकट पदार्थ पानांवर टाकतात. त्यामुळे त्यावर एक थर जमा होतो व अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे फळे लहान राहून उत्पन्नात घट येते.

नियंत्रण –

ही कीड सीताफळावर क्वचितच येत असल्यामुळे यावर औषधे फवारण्याची सहसा गरज भासत नाही. ही कीड दिसल्यास निंबोळी तेल 5 टक्के 50 मिली, पोलो, सिजेंटा, डायफेन्थुरान 50 डब्ल्यू पी 12 ग्रॅम किंवा बेंज, नागार्जुन, बुप्रोफेझीन 25 एससी 20 मिली किंवा रीजेंट एस.सी, बायर, फिप्रोनील 5 एससी 30 मिली. प्रती 10 लिटर पाणी या प्रमानात कीटकनाशके फवारावीत.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा custard apple diseases: सीताफळ पिकातील प्रमुख कीड आणि नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1.सीताफळ छाटणी कधी करावी?
उत्तर – उन्हाळी बहारामध्ये दुबार छाटणी केली जाते.
पहिली छाटणी ही बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मेमध्ये सुरू करण्यात येते.

2. सीताफळ झाडाच्या वाढीसाठी किती पाऊस आवश्यक असतो?
उत्तर – साधारणपणे झाडाच्‍या वाढीसाठी 500 ते 650 मिमि पाऊस आवश्‍यक असतो.

3. सीताफळापासून आपल्याला कोणत्या वर्षापासून उत्पन्न सुरु होते?
उत्तर – साधारणता तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्नास सुरुवात होते.

4. सीताफळ मध्ये कोणती आंतरपीके घेतली जातात?
उत्तर – सीताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.

लेखक –

K Suryakant


शेयर करा