शेयर करा

custard apple cultivation

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सीताफळ लागवड sitafal lagwad (custard apple cultivation) करण्याची आधुनिक पद्धत पाहणार आहोत. यामध्ये सीताफळासाठी जमीन आणि हवामान अशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, सीताफळाची लागवड पद्धत आणि पाणी व्यवस्थापन, सीताफळावर येणारे कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख सीताफळ लागवड क्षेत्र –

1. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सीताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात.
2. दौलताबाद व पुण्‍याची सीताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा ब-याच ग्राहकांकडून मिळतो.
3. मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिध्‍द आहेत.
4. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सिताफळ करिता नावारूपाला येऊ लागला आहे.



सीताफळ लागवडीसाठी (custard apple cultivation) लागणारी जमीन –

1. सीताफळ (Custard Apple) हे हलक्या, मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे पीक आहे.
2. हे अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड असल्याने उथळ, हलक्या, मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते.
3. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन निवडावी.

सीताफळा लागवडी (custard apple cultivation) साठी लागणारे हवामान –

1. या फळपिकाला उष्ण, कोरडे हवामान (Dry Weather) आणि मध्यम किंवा कमी हिवाळा मानवतो.
2. साधारणपणे 30 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आणि 500 ते 650 मि.मी. पर्जन्यमान (Rainfall) वाढीसाठी पोषक असते.
3. फळधारणेवेळी 80 टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेची गरज असते.
4. फळे पिकताना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते.

ही माहिती देखील नक्की वाचा – आंबा लागवड करा इस्रायल पद्धतीने आणि मिळवा दुप्पट उत्पादन

सीताफळासाठी योग्य जातींची निवड –

1. धारूर 6
2. टी. पी. 7
3. बाळा नगर
4. एन.एम.के. गोल्डन 1
5. अर्का सहन
6. फुले पुरंदर

एन.एम.के. गोल्डन 1 (nmk golden custard apple cultivation) विषयी थोडक्यात माहिती –

1.एनएमके-1 गोल्डन या वाणात गर भरपूर आहे. 2.यातील बियांची संख्या 15 ते 20 आहे.
3.साखरेचे प्रमाण 22 ते 24 टक्के तर गराचे प्रमाण 70 ते 75 टक्के आहे.
4.फळांचा आकार बाळानगरीच्या तुलनेत मोठा असून, त्याचे वजन 300 ते 1000 ग्रॅमची फळे जास्त प्रमाणात मिळतात.
5.इतर वाणाच्या तुलनेत एनएमके-1 गोल्डन हा वाण दिसायला देखणा, डोळे मोठे, रंग सोनेरी पिवळा आकर्षक असा आहे.
6.टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे हा वाण निर्यात करण्यासाठी योग्य वाण आहे, या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे या फळाला आजिबात तडे जात नाहीत.



लागवड (sitafal lagwad mahiti) –

1.सीताफळाच्‍या लागवडीसाठी (custard apple cultivation) पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खड्डे घ्‍यावेत.
2. 5 बाय 5 मिटर अंतरावर हे खड्डे घ्‍यावेत.
3. 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडे बसतात.
4.पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये कलमे किंवा रोपे लावावीत.
5. हेक्‍टरी खड्डे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्‍फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरण्‍यात यावे.
6.यासाठी हेक्‍टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेटची आवश्‍यकता आहे. अशा प्रकारे खड्डे भरल्‍यानंतर झाडाची लागवड पावसाळयात करावी.

खते –

सीताफळाच्‍या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍याबरोबर प्रत्‍येक झाडाला 2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत देणे योग्‍य ठरते. तसेच पहिल्‍या 3 वर्षापर्यंत प्रत्‍येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

वर्ष नत्र (ग्रॅम) स्‍फूरद (ग्रॅम) पालाश (ग्रॅम)
1 125 १२५ 125
2 250 २५० 250
3 375 २५० 250

 

5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला 5 ते 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

आंतरपिके | custard apple cultivation –

सीताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.

पाणी व्यवस्थापन –

1. सीताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्‍याने वरच्‍या पाण्‍याशिवाय वाढू शकते.
2. सीताफळाच्‍या पिकाला नियमित पाण्‍याची आवश्‍यकता नसते.
3. निव्‍वळ पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते.
4. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

वळण देण्याची पद्धत –

1. सिताफळ लागवड (custard apple cultivation) केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी तसेच फांद्या जमिनीला टेकू न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटरपर्यंत वरचेवर काढाव्यात.
2. त्याच्यावर चारही दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे.
3. ज्या ठिकाणी फांद्याची गर्दी आहे, आडव्या फांद्या आहेत अशा फांद्या काढव्यात.
4. अशाप्रकारे झाडांना वळण दिल्यास बागेत झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहते.
5. त्यामुळे झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून फळधारणा चांगली होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.



सीताफळ (custard apple cultivation) बहार व्यवस्थापन –

1. फळांच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते.
2. जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो.
3. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो.
4. उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफा मिळतो.

काढणी आणि उत्पन्न –

1. सीताफळांच्‍या झाडांना जून, जूलै मध्‍ये फूले येण्‍यास सुरुवात होते.
2. फूले आल्‍यावर फळे तयार होण्‍यास सर्वसाधारणपणे 5 महिन्‍यांचा कालावधी लागतो.
3. फळे सप्‍टेबर ते नोव्‍हेबर मध्‍ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्‍या सुमारास सिताफळे बाजारात येतात.
4. शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सीताफळाच्‍या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणी साठी ग्राह्य धरावेत.
5. साधारणता तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्नास सुरुवात होते.
6. पाच वर्षानंतर साधारण 25-30 किलो/झाड इतके उत्पन्न मिळते.

ही माहिती देखील नक्की वाचा – मका पीक लागवडीचा आधुनिक पॅटर्न

प्रतवारी | custard apple cultivation –

1. प्रतवारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत.
2. मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्‍हणून बाजूला काढावीत.
3. फळे मध्‍यम आकाराची असल्‍यास ती ब ग्रेड ची म्‍हणून निवडावीत आणि राहिलेली लहान सहान फळे ही क ग्रेडची म्‍हणून समजावीत.

पॅकिंग –

1. स्‍थानिक बाजारपेठांकरिता जर माल पाठवायचा असेल तर उपलब्‍धतेनुसार बांबूच्‍या करंडयात खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्‍यात फळे व्‍यवस्थित भरावीत.
2. व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेडयावाकडया आकाराची फळे शक्‍यतो अगदी जवळच्‍या स्‍थानिक बाजारात त्‍वरीत विकून टाकावीत.

साठवण –

1. सीताफळ हेक्‍टरी जास्‍त नाशवंत फळ असल्‍यामुळे ते जास्‍त दिवस साठविता येत नाही.
2. शितगृहातसुध्‍दा सीताफळ जास्‍त दिवस ठेवता येत नाहीत.
3. आणि समजा मोठया प्रमाणात व्‍यापारी तत्‍वावर उत्‍पादन करणा-या या शेतकरी बांधवांनी सामुहीकपणे शितगृहाची व्‍यवस्‍था उपलब्‍ध केल्‍यास या फळासाठी शितगृहातील साठवणूकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहिट तर आर्द्रता 45 ते 90 टक्‍के राखावयास हवी.
4. असे झाल्‍यास साठवणूकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो.



प्रक्रिया | custard apple cultivation –

1. सीताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात.
2. डबाबंद सीताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्‍यापारी तत्‍वावर करणे, शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्‍यासाठी सीताफळाची भूकटी (कस्‍टर्ड पाऊडर) इत्‍यादी सीताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.

रोग कीड व्यवस्थापन –

1. सीताफळास जास्त करून फळकूज या रोगाचा आणि पिठ्याढेकुन आणि फळमाशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो.
2. फळकूज रोगास युपियल, साफ (कार्बेन्डाझिम 12%+ मन्कोझेब 63% wp) या बुरशीनाशकाची 2 ग्राम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
3. पिठ्याढेकुन नियंत्रणासाठी धानुका सुपर डी – 2 (क्लोरोपायरीफॉस 50 टक्के +सायपर मेथरीन 5% w/w) मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
4.फळमाशीच्या नियंत्रसाठी कामगंध सापळे प्रति एकरी 5 लावावेत.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सीताफळ लागवड (custard apple cultivation) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. सीताफळ झाडाच्या वाढीसाठी किती पाऊस आवश्यक असतो ?
उत्तर – साधारणपणे झाडाच्‍या वाढीसाठी 500 ते 650 मिमि पाऊस आवश्‍यक असतो.

2. सीताफळापासून आपल्याला कोणत्या वर्षापासून उत्पन्न सुरु होते ?
उत्तर – साधारणता तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्नास सुरुवात होते.

3. सीताफळामध्ये कोणती आंतरपीके घेतली जातात ?
उत्तर -सीताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.



लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा