शेयर करा

cucumber mosaic virus

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण केळी पिकातील कुकुंबर मोजेक वायरस (cucumber mosaic virus) या रोगाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये कुकुंबर मोजेक वायरस रोग नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि कुकुंबर मोजेक वायरस रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

केळी पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. बदलते वातावरण आणि ढगाळ हवामान यामुळे रस शोषणाऱ्या किडी चा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. गेल्या 2-3 वर्षांपासून केळीवर ककुंबर मोझॅक विषाणू (cmv virus in banana) (सी.एम.व्ही.) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. स्थानिक भाषेत या रोगास ‘हरण्या’ असे म्हटले जाते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादनात मोठी घट येते. विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण करणे शक्य नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव टाळणे आणि प्रसार रोखणे शक्य आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब फायदेशीर ठरतो.



अनुकूल घटक | Favorable climate for the cucumber mosaic virus –

1. सततचे ढगाळ वातावरण, सतत पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता हे घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात.
2. यासोबतच रोगयुक्त लागवड साहित्य, तन नियंत्रणाचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता हे घटक रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत.
3. रोगाचा प्राथमिक प्रसार लागवड साहित्य मार्फत आणि दुय्यम प्रसार ‘मावा’ किडी मार्फत होतो.
4. या विषाणूची जवळपास 800 ते 1000 यजमान पिके आहेत.
5. यात काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची तसेच एकदल व द्विदल पिकांचा समावेश होतो.
6. पीक फेरपालट पद्धतीचा अभाव हे देखील प्रमुख कारण आहे.

लक्षणे | cucumber mosaic virus symptoms –

1. सुरुवातीला कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात.
2. एका पानावर १ ते २ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पानांचा आकार लहान होतो.
3. नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात.
4. पानाच्या देठाची लांबी कमी होऊन पाने जवळ येतात.
5. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड आवाज होतो.
6. पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील उती मरतात. पाने फाटतात.
7. प्रादुर्भाव जास्त झाल्यास, पाने पिवळी पडून पोंगा सडतो. झाडांची वाढ खुंटते.
8. प्रादुर्भावग्रस्त झाडांची निसवण उशिरा तसेच अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात.
9. फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. अशी विक्रीसाठी योग्य नसतात.

प्रसार | cucumber mosaic virus spread –

1. कुकुंबर मोझेक व्हायरस रोगाचा प्राथमिक प्रसार रोग ग्रस्त कंदामार्फत होतो.
2. तसेच रोगाचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडीं मार्फत होतो.
3. प्रामुख्याने, कापसावरील मावा, पांढरी माशी, फुलकिडे, मक्यावरील मावा चवळी वरील मावा, मिरची वरील फुल किडे हे रोगाचे मुख्य वाहक आहेत.

नियंत्रण | Control measures of cucumber mosaic virus –

1. केळीची बाग व्हायरस मुक्त ठेवण्यासाठी मशागतीच्या पद्धती व व्हेक्टरचे नियंत्रण महत्वाचे आहे.
2. केळी लागवडीसाठी रोग मुक्त व व्हायरस इंडेक्सिंग केलेल्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड करावी.
3. बाग तण मुक्त ठेवावी कारण अनेक तणे रोगाची जोपासना करतात.
4. बागे शेजारी मका, कापुस, चवळी, काकडी, घोसाळे, टोमॅटो, टरबुज, मिरची, ऊस या सारख्या पिकांची लागवड करु नये.
5. जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर च्या लागवडीवर सीएमव्ही रोग येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लागवडीची विशेष काळजी घ्यावी.
6. रोगांचा प्रसार करणाऱ्या रसशोषक क़िडींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
7. सीएमव्ही रोगग्रस्त झाडातुन व्हायरस मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी.
8. क्लोरोपायरीफॉस, टर्मिनेटर, ऍग्रोसिस, 45 मिली + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात किंवा असिटामॅप्रिड, धनप्रीत, धानुका, 6 ग्रॅम + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात घेवून आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा केळी पिकातील कुकुंम्बर मोजेक वायरस (cucumber mosaic virus) या रोगाचे नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. मोझॅक विषाणू मातीमध्ये किती काळ राहतो?
उत्तर – मोझॅक विषाणू मातीत 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहू शकतो, परंतु काही नैसर्गिक परिस्थितीत तो तुलनेने जलद निष्क्रियतेच्या अधीन आहे.

2. काकडी मोजेक विषाणू मानवासाठी हानिकारक आहे का?
उत्तर – मोजेक विषाणू मानवांना किंवा पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक नाही कारण विषाणू वनस्पतींसाठी विशिष्ट आहे.

3. आपण केळी मोजेक कसे नियंत्रित करता?
उत्तर – वाढीच्या काळात: सापळा पिकाचा वापर करा. संवेदनाक्षम पिकाच्या आजूबाजूला प्रतिरोधक वाण, भाजीपाला प्रतिरोधक प्रकार किंवा संसर्ग न होणारी मूळ पिके लावा.

4. काकडी मोजेक रोग कशामुळे होतो?
उत्तर – सर्वसाधारणपणे, काकडी मोझॅक विषाणूचा प्रसार शेतात ऍफिड क्रियाकलाप जास्त असतो तेव्हा होतो. ऍफिडचा प्रकार जो विषाणूच्या प्रसारास प्रोत्साहन देतो जेव्हा ऍफिड सक्रियपणे पिकांमधून फिरतात तेव्हा उद्भवते, जेव्हा ते वनस्पतींमध्ये वसाहत करतात तेव्हा नाही.

लेखक –

K Suryakant




शेयर करा