शेयर करा

cotton root rot

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील मुळकुज या रोगविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये मूळकुज रोग (cotton root rot) नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि मूळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. कापूस हे एक नगदी पीक आहे.
2. जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे.
3. भारताच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते.
4. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला ‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाते.
5. सध्या बहुतांश कापूस उत्पादक जिल्ह्यात कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे.
6. बीटी कपाशी पिकाच्या रोपावस्थेत माती द्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे मूळकूज (cotton root rot), रोपाचे देठ लाल पडून झाडाची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसत आहेत.
7 .या रोग व विकृतीची कारणे, लक्षणे जाणून, योग्य ते व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.
8. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील मुळकुज या रोगविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.



कपाशी वरील मूळकुज | cotton root rot –

जगात सगळीकडे कपाशीवरील हा रोग सापडतो आणि महत्वाचा मानला जातो. हा रोग साधारणपणे 300 वेगवेगळ्या प्रकारच्या यजमानांना संक्रमित करतो त्यात, काळी मिरी, खरबुज किंवा काकडी ही येतात. हा जंतु जमिनीत जिवंत राहु शकतो आणि कपाशीच्या मूळांमध्ये खासकरुन वाढीच्या उत्तर काळात झटकन वेगळा काढता येतो.

कपाशी मूळकूज रोगाची लक्षणे | cotton root rot symptoms –

1. झाड एकाएकी पिवळे पडून वाळते, सहजासहजी उपटले जाते.
2. झाडाची मुळे कुजून त्याची साल निघते.
3. मुळाचा खालचा भाग प्रथम पिवळसर व नंतर काळपट पडतो.
4. रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशीमुळे झाडाची मुळे तांबडी किंवा काळी पडून कोरडी दिसतात आणि कुजतात.
5. झाडाची मुळे हाताला ओलसर व चिकट लागतात.
6. अलीकडील काळात काही भागांत बीटी कपाशीवर मॅक्रोफोमिना फॅसिओलिना या बुरशीचा अधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे.
7. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटली जाऊन झाड लालसर पडून मुळे व खोडे सडतात व सुकतात.

रोगकारक बुरशी –

रायझोक्टोनिया सोलॅनी, मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझोक्टोनिया बटाटीकोला), क्लेरोशिअम रॉल्फसाई इ. बुरशीमुळे कपाशीमध्ये मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो.

मूळकुज रोगासाठी (root rot in cotton) या वर्षी जास्त अनुकूल परिस्थिती –

या वर्षी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पीक हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कमी ते मध्यम पाऊस आणि त्यानंतर अधूनमधून कोरडा दुष्काळसदृश (तात्पुरती उष्ण आणि कोरडी) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अशी परिस्थिती रोपावस्थेत मूळकूज या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव करिता पोषक असते.



मूळकुज रोगासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धती | cotton root rot treatment –

1. मागील हंगामात मूळकुजचा प्रादुर्भाव आढळलेल्या शेतात कपाशी लावणे टाळावे.
2. दरवर्षी पिकांची फेरपालट करावी.
3. जमिनीची खोल नांगरणी करून रोगग्रस्त पिकांचा काडीकचरा काढून नष्ट करावा.
4. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. त्यामुळे केवळ शाकीय वाढ जास्त होते.
5. जमिनीतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये कमी होऊन पाण्याचा व पोषण द्रव्यांचा ताण वाढतो.
6. परिणामी मूळकूज सारख्या रोगाची शक्यता वाढते.
7. पीक काढून झाल्यानंतर कपाशींची झाडे व अवशेष अत्यंत बारीक करून त्यावर ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी भुकटी फॉर्म्युलेशन 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात फवारणी करावी.
8. मशागतीवेळी ट्रायकोडर्मा (ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी) (1 टक्का डब्ल्यू. पी. भुकटी) 10 किलो प्रति 200 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतात पसरवावे.
9. चांगला पाऊस पडल्यावर पेरणी करावी.
10. पेरणीपूर्व रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणू नाशक किंवा जैविक खते या क्रमाने बीज प्रक्रिया केल्यास मूळकुज रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
11. बियाण्या द्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी थायरम (75 टक्के डब्ल्यू.एस.) 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे व जिवाणूजन्य रोगासाठी कार्बोक्सिन (75 टक्के डब्ल्यू. पी.) 1.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बोक्सिन (37.5 टक्के) अधिक थायरम (37.5 टक्के डी.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) 3.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे, तसेच ट्रायकोडर्मा भुकटी (परजीवी जैव नियंत्रण बुरशी) 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
12. शेतामध्ये वाफसा स्थिती राहील, असे सिंचन करावे.ओलाव्याचा ताण पडला तरी मूळकुज रोगाचे प्रमाण वाढते.
13. रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावी.
14. शेतात प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त रोपांसोबतच आसपासच्या रोपांना ट्रायकोडर्मा (ट्रायकोडर्मा हार्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी) (1 टक्का डब्ल्यू.पी.) 50 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (50 टक्के डब्ल्यू. पी.) 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. किंवा ड्रीपद्वारे मुळाभोवती प्रसारित करावे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कापूस या पिकातील मूळकुज (cotton root rot) नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. कपाशीमध्ये मूळकुज रोगाचा कोणत्या बुरशीमुळे प्रादुर्भाव होतो ?
उत्तर – रायझोक्टोनिया सोलॅनी, मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझोक्टोनिया बटाटीकोला), क्लेरोशिअम रॉल्फसाई इ. बुरशीमुळे कपाशीमध्ये मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो.

2. कपाशीतील मूळकूज रोगासाठी कोणते बुरशीनाशक वापरावे ?
उत्तर – कपाशीतील मूळकूज रोगासाठी बाविस्टिन, क्रिस्टल क्रॉप सायन्स,कार्बेन्डाझिम (50 टक्के डब्ल्यू. पी.) 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. किंवा ड्रीपद्वारे मुळाभोवती प्रसारित करावे.

3. कपाशीमध्ये नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यावर काय परिणाम होतो ?
उत्तर – नत्रयुक्त खतांचा अतिवापर केल्यामुळे केवळ शाकीय वाढ जास्त होते. जमिनीतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये कमी होऊन पाण्याचा व पोषण द्रव्यांचा ताण वाढतो. परिणामी मूळकूज रोगाचा (cotton root rot) सारख्या रोगांची शक्यता वाढते.

लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा