शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मिरची मधील आढळणाऱ्या पांढरी माशीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कसा होतो, पांढऱ्या माशीचा नियंत्रण (chilli whitefly) करण्यासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
नमस्कार शेतकरी बंधूनो,सध्या सर्वच भागात मिरची पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरणातील सतत होणारे बदल, आर्द्रता, उष्णता याचा परिणाम म्हणून रसशोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतो आहे. मिरची पिकांबरोबरच ईतरही पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे बदलत्या वातावरणाबरोबर दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनिची सुपिकता आणि यामुळेच कमी होत असलेली पिकांची ही रोगप्रतिकारक क्षमता त्यामुळे सर्व प्रकारच्या रसशोषक किडींचा सर्व पिकांवर वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ओळख व लक्षणे | Identification & symptoms of chilli whitefly –
1. पांढरी माशी ही कीड टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी व फळ पिकांवर आढळते.
2. या किडींचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो. रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
3. या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते. कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
4. पिल्ले व प्रौढ शरीरावर केस असतात.
5. ही कीड पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्थेत पानांतील रस शोषण करते.
6. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो. या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
जीवनक्रम | Life Cycle of chilli whitefly –
1. 30 दिवसांचा (अंडी, पिले, कोष आणि प्रौढ) पांढरी माशी किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला 150 ते 200 पर्यंत अंडी घालते.
2. 10 दिवसात अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले योग्य वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकतात.
3. वास्तव निश्चित झाल्यावर वनस्पतीच्या पेशी जलात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषण करतात.
4. या किडीची पूर्ण वाढ 70 ते 75 दिवसात होते. वाढ झालेली कीड कोषावस्थेत जाते.
5. ही अवस्था 160 दिवस असते. त्यातुन नंतर पांढरी माशी बाहेर पडते.
प्रादुर्भावाची लक्षणे | Symptoms on plant –
1. पानांच्या कडा खालील बाजूस वळतात. तसेच पाने पिवळी पडतात.
2. पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात.
3. तसेच पांढऱ्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पारदर्शक चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते.
4. ही कीड पर्णगुच्छ (लीफ कर्ल) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.
कृषि औषधांची सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Aushadhe
एकात्मिक किड नियंत्रण | Chilli whitefly control –
1. जैविक नियंत्रण | Biological control –
बिव्हेरिया बॅसियाना + व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझिम ऍनिसोपली या जैविक उत्पादनाची 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
2. सेंद्रिय नियंत्रण | Organic control –
IFC निम (10000 ppm) किंवा गार्डप्लस किंवा निमकरंज अधिक फ़िश ऑईल या सेंद्रिय कीटकनाशकांची 1.5 मिली प्रति लीटर पाणी यांप्रमाणे दर 7 ते 10 दिवसाच्या कालावधीत फवारणी घ्यावी.
3. रासायनिक नियंत्रण | Chemical control of chilli whitefly –
अ) रोपवाटिकेत रोपे उगवल्यानंतर – अडमायर, बायर, इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली अधिक धानुस्टीन, धानुका, कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीसाठी वापर करावा.
ब) पुर्नलागवड वेळी – रोपांची मुळे खालील औषधाच्या द्रावणात बुडवावीत. रेजेंट, बायर, फिप्रोनिल (5% SC) 1.5 मिली किंवा ॲक्टरा, सिजेंटा, थायामेथोक्झाम ( 25% WG) 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी यांप्रमाणे घ्यावे.
क) लागवडीनंतर – अरेवा,धानुका, थायमेथोक्झाम ( 25% WG ) 0.4 ग्रॅम 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावे.
ड) लागवडीनंतर फळे येण्यापूर्वी – पेगासस, सिजेंटा, डायफेन्थुरान ( 50 पी.डब्ल्यू.पी. ) 1 ग्रॅम किंवा वेटसिट, धानुका, फेनप्रोपॅथ्रीन ( 30 ईसी) 1 मिली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीसाठी घ्यावे.
अन्य उपाय –
1. जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने जमिनीची मशागत व खत व्यवस्थापन व्यवस्थित रित्या करावे.
2. पिकास संतुलित खते देऊन पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळून, संतुलित वापर करावा.
3. पुर्नलागवडीच्या वेळी मुख्य पिकांच्या कडेने पाच ते सहा ओळी मका, चवळी आणि झेंडू लावावा.
4. निंबोळी पेंड हेक्टरी 400 ते 500 किलो या प्रमाणात जमिनीत / मातीत मिसळून वापरावी.
5. पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे प्रति एकरी 10 ते 20 याप्रमाणे लावावेत.
6. पांढरा, पिवळा, काळा किंवा निळ्या रंगाचे प्लॅस्टिक मल्चिंग केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा chilli whitefly control: मिरची पिकातील पांढरी माशी नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. मिरचीच्या झाडांमध्ये पांढऱ्या माशीचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – अंडी, अळ्या आणि प्रौढांना मारण्यासाठी सेंद्रिय कडुलिंबाचे तेल भाज्या, फळझाडे आणि फुलांवर फवारले जाऊ शकते. सर्व पानाच्या पृष्ठभागावर (पानांच्या खालच्या बाजूस) पूर्णपणे ओले होईपर्यंत फवारणी करा. बागायती तेल, जे कीटकांना मारण्याचे काम करतात, या किडीच्या सर्व टप्प्यांवर खूप प्रभावी आहेत.
2. मिरचीच्या झाडांसाठी कोणते तणनाशक सर्वोत्तम आहे?
उत्तर – मिरची पिकातील तण नियंत्रणासाठी डायफेनॅमिड, ट्राय फ्लुरालिन, ईपीटीसी, नायट्रो फेन, आलाक्लोर या तणनाशकाचा वापर केला जातो.
3. मिरचीसाठी कोणते खत वापरले जाते?
उत्तर – मिरचीच्या रोपांसाठी आदर्श खत वेळापत्रक म्हणजे वनस्पतिजन्य अवस्थेत आठवड्यातून एकदा संतुलित नायट्रोजन-फॉस्फरस-पोटॅशियम (NPK) खत घालणे योग्य आहे.
4. हिरवी मिरची आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे?
उत्तर – हिरवी मिरची आरोग्यासाठी चांगली असते. हे आहारातील फायबरने भरलेले आहे जे निरोगी पाचन तंत्र राखण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412