शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मिरची या पिकावरील व्हायरस (chilli leaf curl virus) बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. महाराष्ट्र राज्यात मिरची हे एक प्रमुख भाजीपाला तसेच मसाल्याचे पीक आहे.
2. आजकाल सर्व मिरची उत्पादक शेतकरी एका मोठ्या समस्येने ग्रस्त असतात.
3. ही समस्या म्हणजे मिरची पिकावर लिफ कर्ल व्हायरस (chilli leaf curl virus) चा अटॅक ही होय.
4. या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविध प्रकारचे नाव आहेत जसे की,चुरडा मुरडा,घुबड्या, बोकड्या इत्यादी नावाने हा रोग ओळखला जातो.
5. हा रोग विषाणूजन्य असून या रोगावर कुठलाही प्रकारचा उपाय नसून हा रोग येऊच नये यासाठी उपाययोजना करणे फार महत्त्वाचे असते.
6. या लेखात आपण या रोगाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
chilli leaf curl virus या रोगाची लक्षणे –
1. पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपतात.
2. शिरा पिवळ्या पडतात.
3. पानांचा आकार कमी होतो.
4. झाडांची वाढ खुंटते.
5. जुनी पाने खरबडीत आणि जाड होतात.
6. फळांची गुच्छ लहान आकाराची होतात.
हे देखील वाचा – मिरची पिकातील थ्रिप्स (chilli thrips control) नियंत्रण कसे करावे?
प्रादुर्भाव –
1. मिरचीवरील चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव प्रथम रोपवाटिकेत होतो.
2. या रोपांची आपल्या शेतात लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसात म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये प्रादुर्भावास
सुरुवात होते.
3. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रोग शेतभर पसरतो.
रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व त्यांचे नियंत्रण होत नसल्याने अनेक शेतक-यांना पीक सोडून द्यावे लागले.
व्हायरस (chilli leaf curl virus) चे स्वरूप –
1. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे,मावा, तुडतुडे,पांढरी माशी इत्यादी रसशोषक किडी मार्फत होतो.
2. जेव्हा या किडींचा प्रादुर्भाव मिरचीच्या झाडावर होतो तेव्हा विषाणू रसासोबत किडींच्या शरीरात प्रवेश करतो.
3. पुढे निरोगी वनस्पतीवर या किडी रस शोषण करताना हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो.
मिरची वरील वायरस (chilli leaf curl virus) साठी एकात्मिक उपाय –
1. मिरची लागवड करण्यापूर्वी तयार रोपांच्या निर्मिती करिता वापरण्यात येणारे बियाणे खात्रीशीर व दर्जेदार असल्याची खात्री करावी.
2. रोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट किंवा कपडा बांधावा. जेणेकरून बाहेरील रसशोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये येऊ शकणार नाहीत.
3. या रोगाचा प्रसार रसशोषक किडी मार्फत होतो. त्यामुळे आपण शेतात 10 निळे चिकट सापळे आणि 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
4. अतिरिक्त पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा वापर टाळावा. जेणेकरून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही.
5. शेताच्या चारही बाजूला किंवा मिरची पिकामध्ये तीन ओळींनंतर मका,ज्वारी,चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी.
6. लागवडीकरिता प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
7. मिरची पिकामध्ये तण काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.
8. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नीम तेलाची 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
रासायनिक उपाययोजना (leaf curl of chilli control pesticides) –
1. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 10 ग्रॅम डायफेनथुराँन 50 डब्ल्यू पी ( पेगासस, सिजेंटा) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. मावा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 4 ग्रॅम थायमेथोक्झाम (ॲक्टरा, सिंजेटा) किंवा 4 मिली इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल ( कॉन्फिडोर, बायर) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3. रीजंट, बायर (फिप्रोनील 5 एस. सी). 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
4. अपेक्स 50, क्रिस्टल क्रॉप सायन्स ( इमामेक्टीन बेन्झोएट 1.5 %+ फिप्रोनिल 3.5 % एस. सी.) 25 मिली /10 लिटर पाणी.
5. वरील कीटकनाशकांचा गरजेनुसार आलटून-पालटून फवारण्या घ्याव्यात.
हे देखील वाचा – या आहेत कृषि विभागाच्या टॉप 10 योजना
फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी ?
1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी योग्य पीएच चे म्हणजेच 6.5 ते 7.5 ph चे पानी वापरावे.
3. फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. वारे जर जास्त वेगाने वाहत असेल तर फवारणी घेऊ नये.
5. फवारणी द्रावण तयार करताना एक घटक पाण्यात टाकून पानी 2 मिनिट चांगले ढवळावे व नंतर दूसरा घटक मिसळावा.
6. म्हणजेच एकदम सर्व घटक पाण्यात मिसळू नये.
7. फवारणी करताना स्टीकर चा अवलंब अवश्य करावा.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा Chilli leaf curl virus: मिरची वरील वायरस नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1.मिरची लागवड कधी करावी?
उत्तर – हंगाम खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्यात आणि उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्यात करावी.
2. मिरचीची पाने कुरळे का होतात?
उत्तर – उष्णतेच्या ताणामुळे जलद बाष्पीभवन होते, त्यामुळे ओलावा वाचवण्यासाठी झाडे कुरवाळतात.
3.लीफ कर्ल रोग म्हणजे काय?
उत्तर- पीच लीफ कर्ल, ज्याला लीफ कर्ल असेही म्हणतात, हा टफ्रीना डिफॉर्मन्स या बुरशीमुळे होणारा रोग आहे.
लेखक –
कृषी डॉक्टर मृण्मयी
9168911489