शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हरभरा पिकातील (chickpea disease) मर, खोडकुज आणि मुळकुज नियंत्रण विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये हरभरा पिकातील मर, खोडकुज आणि मुळकुज म्हणजे नेमके काय आहे, त्याचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो आणि यांच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
हरभरा पिकातील प्रमुख रोग | Major chickpea disease –
1. हरभरा पिकातील मर रोग | chickpea wilt disease –
हा रोग फ्युजारियम ऑक्झीस्पोरम सायसेरी या बुरशीमुळे होतो. प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमेजतात. शेंडा मलूल होतो. झाड हिरवे असतानाच वाळते. मर रोग पिकाच्या रोपावस्थेत व पीक प्रौढावस्थेत (म्हणजे 6 आठवड्यांच्या अवस्थेनंतर) असताना दिसून येतो.
अ) रोपावस्थेमधील मर –
1. रोपावस्थेतील पिकामध्ये मर रोग पेरणीनंतर 3 आठवड्यांत दिसून येते.
2. 3 ते 5 आठवड्यातील अवस्थेतील पीक कोलमडते.
3. जमिनीवर आडवे पडते. या अवस्थेत रोप हिरवेच असते.
4. असे रोप उपटले असता जमिनीवरील व जमिनी खालील खोडाचा भाग बारीक झालेला आढळतो, परंतु खोड कुजलेले नसते.
5. रोप उभे चिरले असता आतील ऊती काळपट तांबूस दिसतात. अशी रोपे काही दिवसात वाळतात.
ब) प्रौढावस्था मधील मर –
1. पीक साधारण 6 आठवड्यांचे झाल्यानंतर दिसून येते.
2. झाड शेंड्याकडून मलूल होऊन सुकते. झाडाची खालील पाने पिवळी पडतात.
3. काही पाने मात्र हिरवीच असतात. 2 ते 3 दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडतात.
ही पिवळी झालेली पाने पीक परिपक्व अवस्थेपर्यंत झाडावर सुकलेल्या अवस्थेत दिसतात.
4. रोगग्रस्त झाड उपटले असता झाड वाळलेल्या अवस्थेत दिसते.
5. झाड उभे चिरले असता उतीमध्ये काळपट भाग दिसतो.
6. कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात.
7. झाड वाढल्यानंतरही बुरशी उर्वरित अवशेषांमध्ये वास्तव्य करते.
2. हरभरा पिकातील खोडकुज | Chickpea stem rot disease–
1. हा रोग स्क्लेरोशियम रोलफसाय या बुरशीमुळे होतो.
2. या रोगाची लक्षणे पीक पेरणीनंतर 6 आठवड्यांपर्यंत दिसून येतात.
3. ओलसर जमिनीमध्ये हा रोग जास्त दिसून येतो.
4. रोपावस्थेतील पीक कोलमडते, परंतु प्रोढावस्थेतील पीक कोलमडत नाही.
5. ठळकपणे पाने गळण्याची प्रक्रिया दिसत नाही.
6. झाड उपटले असता जमिनीलगतचा खोडाचा भाग कुजलेला व खालपर्यंत कुजत गेलेला दिसतो.
7. कुजलेल्या भागावर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. ही बुरशी बराच काळापर्यंत दिसते.
8. ओलसर जागेतील बाधित झालेली रोपे उपटली असता मोहरीच्या आकाराची बुरशीची बीजफळे (पांढरी बुरशी) खोडाभोवताली वाढलेली असते.
9. या बुरशीचा प्रादुर्भाव शेतात सहज ओळखता येते.
10. शेतात काही ठिकाणी अशी वाळलेली झाडे आढळतात.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
3. हरभरा पिकातील मूळकुज | Chickpea root rot disease–
1. हा रोग राझोक्टोनिया सोलानी किंवा राझोक्टोनिया बटाटीकोला या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशींमुळे होतो.
2. ज्या जमिनीत जास्त ओलावा असेल किंवा पाणी देऊन पेरला आहे, अशा शेतात (विशेषतः काळी, भारी जमिनीमध्ये) हा रोग जास्त आढळतो.
3. परंतु ओलिताच्या हरभऱ्यात हा रोग प्रौढ अवस्थेतही दिसतो.
4. यामध्ये झाडे पिवळी पडतात. पण झाड कोलमडत नाही.
5. जमिनीलगत मुळे कुजतात. असे झाड सहजासहजी उपटून येते.
6. राझोक्टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे कोरडा मूळकुज रोग होतो.
7. यामध्ये संपूर्ण झाड वाळते. वाळलेली झाडे विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण शेतात दिसतात.
8. या रोगात टोकावरील पाने व देठ कोमेजतात.
9. मुख्य मुळावर कुजलेपणा दिसतो. या रोगात मुळे कोरडी राहतात.
10. मेलेली मुळे ठिसूळ होतात, तर मुळावरील साल अलगद निघून येते.
11. झाड उभे चिरले असता अतिरिक्त धागेधागे झाल्यासारखी लक्षणे दिसतात.
12. रोग साधारण 30 अंश सेल्सिअसच्या वर तापमान असल्यावर आढळतो.
नियंत्रणाचे उपाय | Chickpea disease control –
1. रोगग्रस्त शेतात हरभरा पीक 3 ते 4 वर्षे घेण्याचे टाळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी.
2. रोगप्रतिकारक जाती उदा. विजय, जाकी 9218, पीडीकेव्ही कांचन (ओलिताखाली), पीडीकेव्ही कनक, पीडीकेव्ही काबुली 2, पीडीकेव्ही काबुली 4 इ. वाणांचा पेरणीकरिता वापर करावा.
3. वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची अन्य वैशिष्ट्ये लक्षात घेणे गरजेचे आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
4. पेरणीपूर्वी बियाण्यास ओरियस, अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टेब्युकोनॅझोल (5.4 टक्के एफ. एस.) बुरशीनाशक 4 मि.लि. किंवा शोरेश, अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्रोक्लोराझ (5.7 टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (1.4 टक्के ई.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) 3 मि.लि. किंवा टेझिंग, युपीएल इंडिया लिमिटेड,टेब्युकोनॅझोल (15 टक्के) अधिक झायनेब (57 टक्के डब्ल्यू. डी. जी.) (संयुक्त बुरशीनाशक) 40 मि.लि. प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणे प्रकिया करावी.
5. त्यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणात बीजप्रकिया करावी.
6. जास्त प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात ट्रायकोडर्मा एकरी 2 किलो या प्रमाणात 200 किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा chickpea disease: हरभरा पिकातील मर, खोडकुज आणि मुळकुज नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. हरभरा शेंगा बोअरचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – लागवडीपूर्वी जमिनीची खोलवर नांगरट करावी. पिकाच्या मध्ये-मध्ये मका व ज्वारी ची ताटे लावावीत. प्लॉट जास्तीत – जास्त तणमुक्त ठेवावा. एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत. आणि प्रादुर्भाव वाढल्यानंतर शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.
2. हरभरा पीक किती दिवसाचे आहे?
उत्तर – हरभरा पिकाचा कालावधी हा जाती नुसार वेग-वेगळा असू शकतो. पण सरासरी हरभरा पीक हे 100 ते 110 दिवसांनी काढणीला येते.
3. हरभरा शेंगा बोअरर म्हणजे काय?
उत्तर – ही एक हरभरा पिकातील कीड आहे. याचे शास्त्रीय नाव – ग्रॅम पॉड बोअरर (हेलीकोव्हरपा आर्मिगेरा हबनर) हे आहे. जी हरभरा पिकाच्या घाट्या मध्ये जाऊन आतील दाना खाऊन टाकते.
4. हरभऱ्याचे उत्पादन कोणता देश करतो?
उत्तर – तसे पाहिले तर जगभरातील सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये घेतले जाते परंतु जगातील इतर 550 हून अधिक देशामध्ये चणा म्हणजेच हरभरा पिकाचे उत्पादन घेतले जाते.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412