शेयर करा

brinjal fruit and shoot borer

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण वांग्यामधील फळ आणि शेंडा पोखरणारी अळी (brinjal fruit and shoot borer) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी अळी नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि या अळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

शेतकरी मित्रांनो, आपण वांग्याचे पीक घेत असताना चांगले व्यवस्थापन करूनही अपेक्षित उत्पादन भेटत नाही. उत्पादन न निघण्याचे बरीच कारणे आहेत. त्यापैकी वांगी पिकावर येणारी कीड हे प्रमुख कारण आहे. वांगी पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळीची (brinjal fruit and shoot borer) लागण खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे किडीचा प्रधुरभाव ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास कीड नियंत्रणात येऊ शकते.वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वसाधारणपणे 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. वेळीच उपाययोजना न केल्याचे नुकसान 100 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊ शकते. या लेखात आपण वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या आळी (shoot and fruit borer in brinjal) व तिचे व्यवस्थापन विषयी माहिती घेऊ.



ओळख | Identification of brinjal fruit and shoot borer –

1. वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणारी अळी (fruit and shoot borer) ही कीड अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमधून आपले जीवन पूर्ण करते.
2. त्यापैकी अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते.
3. या किडीची अळी छोटी व फिक्कट गुलाबी रंगाची असते.
4. पतंग मध्यम आकाराचा असून पुढील पंख पांढरे व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

जीवनक्रम | Life cycle of brinjal fruit and shoot borer –

1. या किडीची मादी एकानंतर एक अशी 250 अंडी झाडाच्या पानावर, शेंड्यावर, फुलकळ्यावर आणि कोवळ्या फळांवर घालते.
2. अंडी गोलाकार व सफेद पिवळसर रंगाची असतात. ही अंडी 3-5 दिवसांनी उबतात व त्यातून सफेद अळी बाहेर पडते.
3. ही अळी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील शेंडा व फळधारणा वेळी फळांमध्ये नुकसान करते.
4. ही अळी 15-20 दिवसांनी प्रौढ बनून गुलाबी रंगाची दिसते, नंतर ती शेंडा अथवा फळांमधून निघून जमिनीत अथवा पालापाचोळ्यात किंवा मुळाजवळ कोषावस्थेत जाते.
5. आठवडाभराच्या कालावधीनंतर कोषामधून प्रौढ (पतंग) बाहेर येतो. प्रौढांचे आयुष्य 6-10 दिवसांचे असते.

नुकसान | Crop loss by brinjal fruit and shoot borer –

1. या किडीचा प्रादुर्भाव रोप लावल्यानंतर काही आठवड्यानंतर दिसून येतो.
2. अळी प्रथम पानाच्या देठात, कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते.
3. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात.
4. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते, प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.
5. फळे आल्यानंतर ही अळी सुरवातीला छिद्र करून फळांत प्रवेश करून विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते.
6. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही.
7. आतील गर खाऊन विष्ठा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन | IPM brinjal fruit and shoot borer –

1. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, त्यामुळे किडींच्या विविध अवस्था नष्ट होतात.
2. एकाच शेतामध्ये वर्षानुवर्षे वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे. पिकाची योग्य प्रकारे फेरपालट करावी
3. मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
4. लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारशीत वाणांचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसार खतमात्रा द्यावी. आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
5. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व फळे तोडून अळ्यांसहीत त्यांचा नायनाट करावा.
6. वाणांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
7. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
8. वांगी पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावे. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेची कल्पना येईल.
9. पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा (अँझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम ) 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
10. जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व ब्रेकॉन या परोपजीवी कीटकांच्या अंड्याचे प्रसारण करावे.
11. वरील उपाययोजना केल्यावरही शेंडा व फळे पोखरणारी अळीचा (fruit and shoot borer of brinjal) प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी पेक्षा अधिक आढळल्यास, रासायनिक नियंत्रण याचा विचार करावा.



आर्थिक नुकसान पातळी | Economic threshold level –

5 टक्के शेंड्यांचे किंवा फळांचे नुकसान.

रासायनिक नियंत्रण | Best insecticide for brinjal fruit borer –

1. बायर सोलोमन (बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) – 15 मिली
2. प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी) – 30 मिली
3. बायर डेसिस 100 ईसी (डेल्टामेथ्रिन 100 ईसी) – 10 मिली
4. डाऊ एग्रो सायन्स ट्रेसर (स्पिनोसॅड 45% एससी) – 8 मिली
5. एफएमसी कोराजन (क्लोरॅनट्रानिलीप्रोल, 18.5% ) एससी – 6 मिली

टीप – वरील प्रमाण हे 15 लीटर पानी म्हणजेच एका पंपासाठी आहे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कापूस या brinjal fruit and shoot borer: वांगी पिकातील फळ आणि शेंडा पोखरणारी आळी नियंत्रनासाठी या फवारण्या नक्की करा हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. वांग्यातील फळ आणि अंकुराचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – खराब झालेले आणि संक्रमित कोंब आणि फळे काढून टाका आणि योग्यरित्या विल्हेवाट लावा . पुरुषांची लोकसंख्या दडपण्यासाठी आकर्षक किंवा फेरोमोन ल्यूर वापर. नांगरणी करून मातीची मशागत करा.

2. वांग्याचे किडीचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – प्रादुर्भावग्रस्त पानांचा किडीसह सुरुवातीच्या टप्प्यावर नाश केल्यास प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो. कीड प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी कार्बारिल किंवा मॅलाथिऑनसह सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करा.

3. वांग्यासाठी सर्वोत्तम खत कोणते आहे?
उत्तर – वांगी हे दीर्घकालीन पीक आहे आणि त्याला खत आणि खतांची चांगली मात्रा लागते. शेत तयार करताना, चांगले कुजलेले खत किंवा कंपोस्ट (200-250 क्विंटल/हेक्टर) घाला. पिकास 100-120 किलो नायट्रोजन आणि 50-60 किलो स्फुरद आणि पोटॅश संकरित खतांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते.



लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा