शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण खरीप हंगामामध्ये लागवड करण्यात येणाऱ्या निवडक वाणांची ( varieties of jowar) आपण माहिती पाहणार आहोत. प्रामुख्याने आपल्या राज्यात ज्वारी या पिकाची तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामा ज्वारी लागवड आपल्याकडे केली जाते. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. म्हणून आज आपण ज्वारी पिकाच्या सुधारित जातींची (best jowar variety in maharashtra) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं पाहता ज्वारी पिकाच्या लागवडीकडे अलीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असली तरी बहुतांशी शेतकरी या पिकाच्या शेतीला पसंती दाखवत आहेत. या पिकाची मिश्र पीक म्हणून म्हणजेच आंतरपीक म्हणून तसेच स्वतंत्रपणे देखील शेती केली जाते. आपल्या महाराष्ट्रात चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी, कुळीथाबरोबर या पिकाची मिश्रपीक म्हणून लागवड केली जाते.
खरिपासाठी योग्य असणारे ज्वारीचे वाण (best jowar variety in maharashtra) –
1. पी.व्ही.के. 801 (परभणी श्वेता)
– हा वाण 2000 साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आला.
– या वाणापासून हेक्टरी 32 ते 34 क्विंटल धान्याचे 90 ते 95 क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.
– 115 ते 120 दिवसात तयार होणाऱ्या या वाणाच्या दाण्यामध्ये खरीप ज्वारीच्या इतर सुधारित वाणांपेक्षा लोह (40 पीपीएम) व जस्त (22 पीपीएम) सर्वात जास्त आहे.
2. पी. व्ही. के. 809 –
– उंच वाढणाऱ्या या वाणापासून 32 ते 36 क्विंटल दाणे, तर 120 ते 122 क्विंटल वाळलेला कडबा मिळतो.
– दाण्याचा रंग मोत्यासारखा चमकदार असून, हे वाण काळ्या बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे.
या वाणास पक्वतेसाठी ११८ दिवस लागतात.
3. सीएसएच- 25 (परभणी साईनाथ/ एस.पी.एच. 1567) –
– उंच वाढणारा हा वाण ११० दिवसांत पक्व होतो.
– त्यापासून प्रतिहेक्टरी 43.3 क्वि. धान्य उत्पादन होते.
– 120.7 क्वि. कडब्याचे उत्पादन मिळते.
– तसेच हे वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी उत्तम आहे.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
4. एसपीएच 1635 –
– खरीप हंगामात मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठीचा हा वाण 108 ते 110 दिवसात पक्व होतो.
– या पासून हेक्टरी 38 ते 40 क्विंटल धान्याचे आणि 118 ते 120 क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते.
– हा वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असून, धान्याची व भाकरीची प्रत उत्तम आहे.
5. परभणी शक्ती –
– प्रसारित वर्ष व क्षेत्र – २०१८, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी.
– परभणी शक्ती वाणाच्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये प्रति किलो ४२ मि. ग्रॅम लोह असून २५ मि. ग्रॅम जस्ताचे प्रमाण आहे.
– पीक ११० ते ११५ दिवसात परिपक्व होते.
– परभणी शक्ती या वाणाचे धान्य उत्पादन ३६ ते ३८ क्विंटल प्रति हेक्टर आणि कडब्याचे उत्पादन ११० ते ११५ क्विंटल प्रति हेक्टर मिळू शकते.
6. एस. पी. एच. 1641 –
– या संकरित वाणाची 2015 साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन महाराष्ट्रातील खरीप ज्वारी असलेल्या भागासाठी शिफारस करण्यात आली.
– हा संकरित वाण उंच वाढत असल्यामुळे या वाणापासुन कडब्याचे व धान्याचे भरपूर उत्पादन मिळते. तसेच दाण्याची व कडब्याची प्रत चांगली आहे.
– हा वाण 115 ते 118 दिवसात पक्र होत असुन धान्य उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
– कडबा उत्पादन 142 ते 145 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
7. पीव्हीके 400 –
– सदर सुधारित वाण 115 ते 120 दिवसात पक्व होते .
– त्याचे एकरी उत्पादन 14 ते 15 क्विंटल मिळते .
– त्याचबरोबर कडब्याचे एकरी उत्पादन 48 ते 50 क्विंटल या प्रमाणात मिळते .
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा best jowar variety in maharashtra: खरीप लागवडीसाठी बेस्ट ज्वारी जातीची नावे हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि ज्वारी पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
उत्तर – भारतात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादक महाराष्ट्र हे आहे जे एकूण उत्पादनाच्या जवळपास 54 टक्के आहे.
2. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?
उत्तर – ज्वारीचे पीक तयार व्हायला पाच महिने लागतात.
3. ज्वारीच्या वाढीच्या अवस्था काय आहेत?
उत्तर – धान्य ज्वारी उदयानंतर विकासाच्या तीन वेगळ्या टप्प्यांतून जाते – रोपांचा विकास, पॅनिकल आरंभ आणि पुनरुत्पादन.
4. ज्वारीची काढणी केव्हा करावी हे मला कसे कळेल?
उत्तर – जेव्हा बियांना नखाने डेंट करता येत नाही तेव्हा ज्वारीच्या धान्याची कापणी करा.
5. महाराष्ट्रात ज्वारीचे किती प्रकार आहेत?
उत्तर – महाराष्ट्रात आरोग्याचा खजिना शोधण्यासाठी ज्वारीच्या 25,000 जाती पुन्हा उगवल्या जात आहेत.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
लेखक –
कृषी डॉक्टर टीम