शेयर करा

vermiwash

वर्मीवॉश म्हणजे काय? what is vermiwash?

वर्मीवॉश (Vermiwash) हे एक प्रकारचे द्रव स्वरूपातील सेंद्रिय खत आहे. हे द्रव गांडूळ आणि शेणखत यांच्या पासून बनवले जाते .गांडूळ खत भिजवल्यानंतर मिळणारे द्रव हे वनस्पतीसाठी पोषक असते, तसेच सूक्ष्मजीव आणि ह्युमिक पदार्थांनी समृद्ध असते, त्यामुळे ते एक प्रभावी खत आहे.

वर्मीवॉश तयार करण्याची पद्धत | method of vermiwash preparation –

1. आपण 250 लिटर क्षमतेच्या काँक्रीट किंवा प्लास्टिक बॅरलपासून बनवलेल्या मोठ्या कंटेनरमध्ये वर्मीवॉश युनिट तयार करू शकतो.
2. निवडलेल्या कंटेनरच्या तळाशी एक छिद्र पाडून घ्यावे.
3. नंतर बॅरलच्या तळाशी 10 ते 15 सेमी किंवा कंटेनरच्या 10 ते 15% उंचीपर्यंत रेती किंवा विटांचे तुकडे भरावे.
4. कंटेनरमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर किंवा 10-15% उंचीपर्यंत खडबडीत वाळूसह आणखी एक थर जोडावा.
5. व नंतर वाळूच्या या थरावर गवत ठेवावे.
6. मग यामध्ये चांगला कुजलेला सेंद्रिय कचरा किंवा शेण (१० दिवस जुने) टाकावे व ते नंतर ओले करून घ्यावे. 7. वर्मीवॉश कंटेनरमध्ये सुमारे 1000 ते 1500 किशोर किंवा प्रौढ गांडुळे सोडा आणि वर्मीवॉश युनिटमध्ये नियमित ओलावा ठेवावा.
8. वर्मीवॉश मिळविण्यासाठी, त्याच्या मध्यभागी एक छिद्र असलेल्या लहान बादलीतून सतत पाणी काढून घ्यावे. 9. छिद्रांमध्ये कापुस किंवा बांबूच्या काड्या ठेवा जेणेकरून पाणी खाली येईल.
10. फिल्टर युनिटद्वारे पोषक तत्वे वाहून नेणाऱ्या कंपोस्ट द्वारे पाणी हळूहळू तळाशी झिरपते.
11. कंटेनर दररोज 4 ते 5 लिटर पाण्याने भरा.
12. 7 ते 10 दिवसानंतर, व्हर्मीवॉश कंटेनरमध्ये तयार होते.
13. 15 दिवसांत सुमारे 35 ते 40 लिटर व्हर्मीवॉश तयार होऊ शकते.
14. गोळा केलेले वर्मीवॉश थंड आणि कोरड्या जागी साठवले पाहिजे.
15. आता तयार झालेले वर्मीवॉश तुम्ही पिकावर फवारणी किंवा आळवणी साठी वापरू शकता.

शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल

वर्मीवॉश वापरण्याचे फायदे | benefits of vermiwash –

1. वर्मीवॉश हे 100% सेंद्रिय आणि पर्यावरणास अनुकूल आहे.
2. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
3. याच्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते व मुख्य आणि सूक्ष्म पोषक घटकांची पातळी देखील सुधारते.
4. हे पिकाच्या आणि त्यांच्या निरोगी मुळांच्या वाढीस अतिशय उत्तम आहे.
5. वर्मीवॉश हे सेंद्रिय एक कीटकनाशक म्हणून देखील वापरले जाऊ शकते.
6. याचा जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यामध्ये देखील खूप मोठा वाटा आहे.
7. वर्मीवॉशमुळे काही घातक बुरशी देखील कंट्रोल होतात.

वर्मीवॉश वापराचे प्रमाण | vermi wash uses –

1. मित्रांनो याचा वापर आपण फवारणी किंवा आळवणी अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो.
2. फवारणीसाठी – 1 लीटर वर्मीवॉश 10 लीटर पाण्यात मिसळून वापरावे.
3. आळवणी साठी – 20 लीटर वर्मीवॉश 200 लीटर पाण्यात मिसळून एक एकर साठी ड्रिप किंवा आळवणी द्वारे वापरावे.

वर्मीवॉश वापरताना कोणती काळजी घ्यावी –

1. हे 100% सेंद्रिय असल्यामुळे यामध्ये कोणताही रासायनिक घटक मिसळू नये.
2. वर्मीवॉश दीर्घकाळ साठवून ठेऊ नये.
3. तयार झाल्यानंतर 15 दिवसाच्या अंत याचा वापर करावा.
4. तयार झालेले वर्मीवॉश थंड किंवा कोरड्या जागी ठेवावे.
5. भर उन्हात किंवा मोकळ्या हवेत याची साठवणूक करू नये.
6. शक्यतो वर्मीवॉश हे सेपरेट वापरावे, यामध्ये इतर कोणताही घटक मिसळू नये.

वर्मीवॉशची किंमत किती असते? vermi wash price –

50 रुपये / लीटर

वर्मीवॉश कोठे आणि कसे खरेदी करावे?

शेतकरी मित्रांनो, तस पहिल तर मार्केट मध्ये खूप साऱ्या खाजगी कंपण्याचे तुम्हाला वर्मीवॉश मिळेल. पण तुम्हाला जर 100% ओरिजनल वर्मीवॉश खरेदी करायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या डिटेल्स वरती संपर्क करू शकता.

मेल आयडी – fasaljankari@gmail.com
मोबाईल नंबर – 9168911489
पत्ता – मू. पो- इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर।
पिन – 413412.

Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो, आम्ही आशा करतो की कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वरील हा लेख तुम्हाला नक्कीच समजला आणि आवडला असेल. तुम्हाला जर याच्या बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क करा. आणि हा लेख तुम्हाला खरच आवडला असेल तर याची लिंक तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर भेटूया एका नवीन माहितीसह, तूर्तास – धन्यवाद🙏

People also read | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. वर्मीवॉश म्हणजे काय आणि त्याचे उपयोग?
उत्तर – वर्मीवॉश म्हणजे द्रव स्वरूपातील सेंद्रिय खत ज्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून तसेच पिकाच्या वाढीसाठी केला जातो.

2. वर्मीवॉश कसे गोळा करावे?
उत्तर – वर्मीवॉश मिळविण्यासाठी, कंटेनरच्या मध्यभागी एक छिद्र असलेल्या लहान बादलीतून सतत पाणी काढून घ्यावे.

3. वर्मीवॉश हे सूक्ष्मजीव खत आहे का?
उत्तर – हो, वर्मीवॉश हे सूक्ष्मजीव खत आहे.

4. वर्मीवॉशमध्ये कोणते गांडूळ वापरले जाते?
उत्तर – ॲलोपोफोरा एसपीपी, आयसेनिया फेटिडा आणि पेरीओनिक्स हे गांडूळ वर्मीवॉश तयार करण्यासाठी वापरले जातात.

5. वर्मीवॉश वापरण्याचे फायदे कोणते आहेत?
उत्तर – वर्मीवॉशचा वापरांमुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते व पिकाच्या निरोगी मुळांची वाढ होते.

6. वर्मीवॉश ची किंमत असते?
उत्तर – वर्मीवॉश ची किंमत 50 ते 70 रुपये/लिटर असते.

7. वर्मीवॉश वापराचे प्रमाण किती आहे?
उत्तर – फवारणीसाठी – 1 लीटर वर्मीवॉश 10 लीटर पाण्यात मिसळून वापरावे तसेच आळवणी साठी 20 लीटर वर्मीवॉश 200 लीटर पाण्यात मिसळून वापरावे.

 

Author | लेखक,
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा
शॉपिंग कार्ट