शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कारले लागवड करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या निवडक वाणांची (karle seeds) माहिती पाहणार आहोत. कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्यामध्ये नर व मादी फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. आजच्या लेखामध्ये आपण कारले लावण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वाणांची (karle seeds) माहिती पाहणार आहोत.
मार्केट मधील टॉप कारले बियाणे | karale seeds in marathi –
अ) विद्यापीठाच्या जाती –
क्र | जातीचे नाव | वैशिष्ट्ये |
1 | हिरकणी | फळे गडद हिरव्या रंगाची, 15 ते 20 सेंमी. लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन 130 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते. |
2 | फुले ग्रीन गोल्ड | फळे गडद हिरव्या रंगाची, 25 ते 30 सेंमी. लांब व काटेरी असतात. हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळते. |
3 | फुले प्रियांका | या संकरित जातींची फळे गर्द हिरवी, 20 सेमी. लांब व भरपूर काटेरी असतात. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीस योग्य आहे. ही जात केवडा या रोगास बळी पडत नाही. सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. |
4 | कोकण तारा | फळे हिरवी, काटेरी व 15 सेमी. लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. निर्यातीसाठी अशी फळे योग्य असतात. सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर आहे. कोकण विभागात या जातीच्या लागवडीची शिफारस आहे. |
ब) खाजगी कंपनीचे बियाणे –
क्र | जातीचे नाव | वैशिष्ट्ये |
1 | महिको व्हाईट लाँग | लागवडीपासून 75 ते 78 दिवसात पीक काढणीस तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळांची लांबी 9 ते 12 इंच असते. |
2 | महिको ग्रीन लाँग | फळांचा रंग गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून इतर वैशिष्ट्ये महिको व्हाईट लाँग प्रमाणेच आहेत. |
3 | एम. बी. टी. एच. 101 (MBTH 101) | 50 ते 55 दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन 65 ते 70 ग्रॅम असून फळांची लांबी 18 ते 20 सें.मी. असते. फळे गडद हिरव्या रंगाची, चांगल्या शिरा असलेली जात आहे. एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते. |
4 | एम. बी. टी. एच 102 (MBTH 102) | 55 ते 60 दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन 100 ते 120 ग्रॅम भरते. फळांचा रंग पांढरा असून फळे 30 ते 35 सें.मी. लांब व बारीक असतात. एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते. |
शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल
सारांश | Conclusion –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा karle seeds: मार्केट मधील टॉप 5 कारले बियाणे हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या रब्बी हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि कारले पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कारल्याच्या लागवडीसाठी किती किलो प्रति हेक्टरी बियाणे लागतात ?
उत्तर – कारल्याच्या लागवडीसाठी 4 ते 5 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागतात.
2. कारले लागवडीचा हंगाम कोणता असतो ?
उत्तर – खरीप हंगाम करिता लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्चपर्यंत लागवड करता येते.
3. कारल्याचे किती उत्पादन होते ?
उत्तर – सरळ जातीचे 60 ते 70 क्विंटल तर संकरित जातीचे 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते.
लेखक
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412