शेयर करा

sugarcane trash

शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत. स्वागत करतो Krushi Doctor या शेती निगडीत संपूर्ण माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती. आज आपण जाणून घेणार आहोत, ऊस पाचट व्यवस्थापन बद्दल (sugarcane trash) संपूर्ण माहिती. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ऊस पाचट जाळण्याचे कोणते तोटे आहेत आणि ऊस पाचट कुजवण्याचे कोणते फायदे होतात. तसेच मी तुम्हाला लवकर ऊस पाचट कसे कुजवावे ही देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…

ऊस पाचट म्हणजे काय? (What is sugarcane trash?)

उसाच्या हिरव्या पानातील हरितद्रव्य म्हणजेच हिरवेपणा संपल्यावर त्याचे रूपांतर वाळलेल्या कचऱ्या मध्ये होते असते तशी पाने शेतात आपोआप,तसेच ऊस तोंडतानी खाली पडतात त्याला आपण पाचट असे म्हणतो. ऊसाच्या पाचटाला साइट ने तलवारी सारखी दार आणि काट्या सारखे टोक असते त्यामुळे जनावरे हे पाचट खात नाहीत.

एकरी ऊस पिकातून किती पाचट मिळते?

सर्व साधारण ऊस पिकाच्या वाढीवरती पाचटाचे वजन अवलंबून असते.ढोबळ मानाने १२ ते १४ टन एका एकर पासून वाळलेले पाचट मिळते.

शेतकरी पाचट का जाळतात?

1.बरेच शेतकरी शेतामध्ये पाचट नाही ठेवत ते जाळून टाकतात कारण,त्यांचा काही भागात कुट्टी मशीन उपलब्ध नसते. बऱ्याच ठिकाणी उसातील पाठीमागचे तण जळून जावे.
2.काही शेतकरी मित्रांकडे पाणी जास्त प्रमाणात असल्या कारण मुळे ते पाचट नाही ठेवत.




पाचट जाळण्याचे कोणते तोटे आहेत? (disadvantages of burning sugarcane trash)

1.उसमधील पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो.
2.उसाच्या वाढीसाठी आवशक असणारे जिवाणू ,विकरे मरण पावतात.
3.जमिन ओलावा धरून ठेवण्याची क्षमता राहात नाही आणि माती कडक बनते.
4.जमिनीत असणारे गांडूळे सुद्धा मेली जातात.
5.पाचट जाळल्यामुळे युरिया आणि स्फुरद नाश पावते फक्त पालाश थोड्या प्रमाणत मिळते.
6.आजूबाजूला व शेतात फिरणारे मित्र कीटक याना सुद्धा हानी पोहचते.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

पाचट कसे कुजवावे? (How to decompose sugarcane trash?)

1.ऊस तुटून गेल्यावर पाचट एकसारखे पसरून घ्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.
2.पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक करावे.
3.पाचट बारीक झाल्यावर त्यावरती एक पोते युरिया दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट असे एक एकर साठी पसरून फेकावे. नंतर चार किलो पाचट कुजवणरे जिवाणू टाकावे किंवा लिक्विड जिवाणू दोन लिटर टाकवे.
4.ऊसाचे बुडखे चुकून राहिल्यास कोयत्याने कडून टाकावे.
5.सर्व काम झाल्यावर स्प्रिंकलर ने किंवा पाठपाणी देऊन घ्या.
6.अशा पद्दतीने काम केल्यास साडेचार ते पाच महिन्यात पाचट पूर्णपणे कुजून सेंद्रिय खत तयार होते.
7.तसेच पाचट लवकर कुजविण्यासाठी साखर कारखाण्यातील प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टन पाचटावर टाकवे.
8.नांगराच्या साहयाने पलटी दिल्यास पाचट दोन ते तीन महिन्यात चांगले कुजले जाते.

पाचट कुजवण्याचे फायदे कोणते आहेत? (benefits of the sugarcane trash composting)

1.पाचट कुजवल्यामुळे जमिनीची सेंद्रिय कर्ब वाढून सुपीकता सुधारते.
2.जमिनीची ओलावा धरून ठेण्याची टिकवणं क्षमता वाढते.
3.रासायनिक खताचा खर्च कमी होऊन जवळ-जवळ एकरी २ ते ३ टन सेंद्रिय खत मिळते.
4.पाचट कुजत असताना तणाची वाढ होत नाही.
5.जमिनीतील भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारते.
6.उसाचे उत्पादन १५ ते २० टक्के वाढून सेंद्रिय खत नसेल तरी चालते तो खर्च वाचला जातो.

सारांश । conclusion –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील sugarcane trash: ऊस पाचट व्यवस्थापन हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक नव-नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न । FAQ –

1. ऊस पक्व होण्यासाठी किती महिने लागतात?
उत्तर – 11 ते 12 महीने लागतात.

2. उसासाठी कोणती जमीन चांगली आहे?
उत्तर – ऊस पिकासाठी काळी व माध्यम जमीन उत्तम निचरा होणारी आणि सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

3. एक एकर मध्ये एकूण किती पाचट मिळते?
उत्तर – 4 ते 5 टन पाचट एक एकर मध्ये मिळते.

4. ऊसाचे पाचट लवकर कुजवण्यासाठी काय करावे?
उत्तर – उसाचे पाचट लवकर कुजण्यासाठी प्रेसमड कंपोस्ट,जिवाणू ,आणि नांगराच्या साह्याने मातीला एक पलटी द्यावी.

5. ऊस पाचट जाळल्यामुळे कोणते नुकसान होते?
उत्तर – जमिनीतील असंख्य जिवाणू आणि गांडूळ मरतात.

6. ऊस पाचट कुजवण्याचे कोणते फायदे आहेत?
उत्तर – रासायनिक खतांची मात्रा कमी होऊन आपल्याला सेंद्रिय खत मिळते आणि जमीनीची सुपीकता सुधारते.

7. ऊसाच्या पाचटामध्ये कोणते घटक असतात?
उत्तर – उसाच्या पाचटामध्ये 0.40 ते 0.50 टक्के नत्र,0.04 ते 0.15 टक्के स्फुरद,0.42 ते 0.50 टक्के पालाश तसेच ३० ते ३२ टक्के सेंद्रिय कर्ब असतो.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा