शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मागेल त्याला शेततळे (magel tyala shettale) योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मागेल त्याला शेततळे (namo shettale abhiyan) ही योजना नक्की काय आहे, शेततळे योजना (shettale yojana 2023) कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान –
या योजने अंतर्गत खालील आकारमान यापैकी एका प्रकारची शेततळे घेण्यास मुभा राहील. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेची उद्दिष्टे | Objective of magel tyala shettale yojana –
1. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे.
2. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे.
3. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे.
4. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे.
5. तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली.
6. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.
मागेल त्याला शेततळे योजना 2023 पात्रता | Magel tyala shettale 2023 Eligibility Criteria –
1. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर कमीत-कमी 0.6 हेक्टर (0.6 hectare Land Record Required) जमीन असणे आवश्यक.
2. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे, सामूहिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
3. लाभार्थी शेतकऱ्याचे शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक राहिल.
4. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
5. शेततळ्याची काळजी घेणे व निगा राखणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक जबाबदारी राहील.
6. शेततळे योजनेसाठी ज्या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी शेततळे खोदणे बंधनकारक राहील.
7. मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यातच काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी आकारमानानुसार मदत अनुदान | Shettale plastic paper subsidy –
1. 15 x 15 x 3 – 28 हजार 275 रुपये अनुदान मिळेल
2. 20 x 25 x 3 – 31 हजार 598 रुपये अनुदान मिळते.
3. 25 x 30 x 3 – 49,671 अनुदान मिळते
4. 25 x 25 x 3 – 58 हजार 700 रुपये अनुदान मिळते.
5. 30 x 25 x 3 – 67 हजार 728 रुपये अनुदान मिळते.
6. 30 x 30 x 3 – 75 हजार रुपये एवढे अनुदान मिळते.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
शेततळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents for magel tyala shettale yojana 2023 –
1 आधारकार्ड (Adhar Card)
2. शेतजमिनीचा 7/12 (सातबारा)
3. 8 अ उतारा
4. शेततळ्यासाठी साधन खरेदी करण्याचे किंवा उपकरणाचा Quotation
5. कंपनीचे Testing Report (पंपासाठी)
6. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7. हमीपत्र / संमतीपत्र (यादीत नाव आल्यानंतर)
8. बँक पासबुक
शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा | How to apply for magel tyala shettale yojana 2023 –
1. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbt) पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे.
2. लॉग इन केल्यानंतर Dashboard दिसेल. त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3. अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन 4 घटक दिसतील.
4. ज्यामध्ये कृषीयांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, बि- औषधे व खते, फलोत्पादन हे पर्याय दिसतील.
5. तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
6. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे घटक निवडायचे आहेत. : मुख्य घटक :- सिंचन साधने आणि सुविधा < बाब :- वैयक्तिक शेततळे < उपघटक :- अर्धा डगआऊट
7. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज पूर्ण करायचे आहे.
8. अर्ज सेव केल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला 23 ते 24 रुपयाचे शुल्क लागेल.
9. शुल्क भरल्यानंतर शेततळ्यासाठी केलेल्या अर्जाची शुल्क पावती व अर्ज प्रिंट करून घ्यावे.
10. पात्र शेतकऱ्यांना लॉटरी लागल्यानंतर Message पाठविण्यात येतात.
11. संबंधित पुढील कार्यवाही कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण केली जाते.
योजनेशी निगडित महत्वाची संकेतस्थळे –
1. मागेल त्याला शेततळे योजना अधिकृत संकेतस्थळ – https://aaplesarkar.maharashtra.gov.in
2. अर्ज करण्यासाठी लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा – https://egs.mahaonline.gov.in/Login/Login
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा magel tyala shettale: मागेल त्याला शेततळे योजना 2023 हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?
उत्तर – शेतकऱ्यांना शेतात शेततळे बांधण्यासाठी 50 हजाराचे अनुदान दिले जाते.
2. मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर – पाण्याअभावी शेती पिकाचे होणारे नुकसान टाळणे.
3. मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र चा लाभ काय आहे?
उत्तर – शेतकऱ्यांना शेतात शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
4. शेततळे अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
उत्तर – राज्यातील शेतकरी शेततळे अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412