शेयर करा

sugarcane woolly aphid management

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकातील लोकरी मावा विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये लोकरी मावा नेमका काय आहे, त्याचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि लोकरी माव्याच्या रासायनिक नियंत्रणासाठी काय उपाययोजना (sugarcane woolly aphid management) आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

किडींची ओळख | Identification of sugarcane wooly aphid –

1. मादीच्या पोटातून नुकतीच बाहेर पडलेली बाल्यावस्थेतील पिल्ले ही पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून, अतिशय चपळ असतात.
2. बाल्यावस्था मध्ये चार वेळा कात टाकली जाते.
3. तिसऱ्या अवस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढऱ्या लोकरी सारखे तंतू दिसून येतात.
4. लोकरी माव्याचे प्रौढ हे काळे असून, पारदर्शक पंखाच्या दोन जोड्या असतात.



जीवनक्रम | Life cycle of sugarcane woolly aphid –

1. किडीच्या पिले आणि प्रौढ अशा दोन अवस्था आहेत.
2. पिले अवस्था आणि प्रौढ अवस्था सर्वांत जास्त नुकसानकारक असते.
3. एक मादी साधारण 15 ते 35 किंवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना जन्म देऊ शकते.

प्रसार | Spread –

1. किडीचा प्रसार वाऱ्यामार्फत बाधित शेतातून तसेच ऊस वाहतुकीद्वारे होतो.
2. किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर लगेच सुरू होतो.
3. उन्हाळ्यात, जास्त सापेक्ष आर्द्रता आणि दीर्घकाळ कोरड्या वातावरणात ही कीड जास्त कार्यक्षम असते.

उसावरील लोकरी मावा ची लक्षणे | Symptoms of sugarcane woolly aphid –

1. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकावरील लोकरी मावा कीड ही एक रसशोषक कीड आहे.
2. प्रादुर्भाव ग्रस्त पानावर तुम्हाला पिवळे ठिपके पडलेले दिसतील.
3. जास्त प्रादुर्भाव नंतर ऊसाचे संपूर्ण पान वाळून जाते.
4. परिणाम ऊसाचे वजन कमी भरते व साखरेचे प्रमाण देखील खूप कमी होते.
5. लोकरी मावा ही कीड तिच्या अंगामधून एक मधासारखा द्रव सोडत असल्यामुळे त्याच्यावर बुरशीची वाढ होऊन संपूर्ण पान नंतर काळे पडलेले दिसून येते.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

ऊसावरील या लोकरी माव्याचे एकात्मिक व्यवस्थापन | Sugarcane woolly aphid management –

1. कीडग्रस्त भागात उसाची पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने लागवड करावी.
2. प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणाचे उपाय करणे सोपे होते.
2. कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेणे निवडून झाल्यानंतर उसाची पाने जाळून टाकावीत.
3. ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करावी.
4. मॅलाथिऑन 3 मि.ली. प्रति लिटर पाणी या द्रावणाणध्ये बेणे 15 मिनिटे बुडवून घ्यावे.
5. रासायनिक खताचा संतुलीत वापर करावा.
6. नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास किडीला प्रोत्साहन मिळते.
7. मावाग्रस्त उसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात नेऊ नयेत.

जैविक उपाय | Organic control –

1. कोनोबाथ्रा ॲफिडीव्हारा 1000 अळया किंवा मायक्रोमस इगोरोटास 2500 अळ्या किंवा क्रायसोपर्ला कार्निया या मित्रकीटकांची 2500 अंडी प्रति हेक्टरी सोडाव्यात.
2. क्रायसोपर्ला कार्निया हा परभक्षक मित्रकीटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो.
3. मित्र किटक शेतात सोडल्यानंतर किटकनाशकाची फवारणी 3 ते 4 आठवडे करू नये.
4. कडूनिंब आधारित किटकनाशक ॲझाडिरॅक्टीन (5 टक्के) 375 मि.ली. प्रति 750 लिटर पाणी या प्रमाणे प्रति हेक्टरी फवारणी करावी.
5. उसात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास व त्याच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर केलेला असल्यास त्यानंतर 15 दिवसांनी परभक्षक कीटक सोडावे.
6. परभक्षक कीटकाच्या अळ्या किडीस नष्ट करतात.
7. प्रादुर्भावग्रस्त उसात फक्त परभक्षक सोडल्यास कीड नियंत्रण त्वरित होते.



रासायनिक उपाय | Chemical control –

1. क्लोरपायरीफॉस (20 टक्के इ.सी.) – यूपीएल कंपनीचे क्लोरोबॅन किंवा कोरोमंडल कंपनीचे त्रिशूल किंवा टाटा कंपनीचे ताफाबॅन किंवा क्रिस्टल कंपनीचे कमन.
👉वापरण्याचे प्रमाण – 0.75 ते 1.5 मि.लि.

2. डायमिथोएट (३० टक्के ईसी) – युपीएल कंपनीचे नुगॉर किंवा स्वाल कंपनीचे तारा 909 किंवा टाटा कंपनीचे टॅफगॉर किंवा एन ए सी एल कंपनीचे क्रॉप डायमंड
👉वापरण्याचे प्रमाण – 1.5 मिलि प्रति लिटर पाण्यात स्टिकर सह मिसळून फवारणी घ्यावी.

टीप –
1. मोठ्या उसात गटूर किंवा पावर पंप वापरुन फवारणी करावी.
2. त्यामुळे कीटकनाशकाचे द्रावण जास्त दाबाने फवारले जाऊन किड त्वरित मरते.
3. द्रावणास चिकटपणा येण्यासाठी उत्तम दर्जाचे चिकट द्रव्य 1 मिली प्रति लिटर द्रावणामध्ये मिसळावी.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा sugarcane woolly aphid management: उसावरील लोकरी मावा नियंत्रण हा लेख आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. लोकरी मावा म्हणजे काय?
उत्तर – हे एक पांढऱ्या रंगाचे कीटक असतात. जे ऊस पिकाच्या पानावर वाढतात व पानांच्या आतील रस शोषून घेतात. परिणामी पान आपल्याला पिवळे पडलेले दिसून येते आणि वाळून जाते. पानाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते व उत्पादनामध्ये कमालीची घट होते.

2. ऊस रोगावर नियंत्रण कसे ठेवाल?
उत्तर – ऊस पिकाच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला ऊस पिकाचे वेळो-वेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे. आणि एखाद्या कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसतात, योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. सोबतच आपल्याला रोपाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी खत व्यवस्थापणावर देखील भर देणे आवश्यक आहे.

3. उसाचे उत्पादन कशामुळे वाढते?
उत्तर – ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे – खत व्यवस्थापन करणे. मातीचे परीक्षण करा आणि त्यानुसार योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या मात्रेमध्ये खतांचे डोस द्या.

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा