शेयर करा

castor varieties

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण करडईच्या लागवड करण्यात येणाऱ्या निवडक वाणांची (castor varieties) आपण माहिती पाहणार आहोत.

प्रस्तावना –

कोरडवाहु क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पिक म्हणजे करडई होय. करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे, हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करुन घेते. या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सोर्जन कमी होते व प्रतिकुल परिस्थितीत हे पीक तग धरते. या पिकासाठी कमी मजुर लागत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे हे पीक कोरडवाहु साठी वरदान ठरले आहे. करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकापासून अधिक फायदा मिळवता येतो. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापुर येथे करडई चे विविध वाण (castor varieties) कोरडवाहु क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत.



प्रसारित वाण व वैशिष्टे खालील प्रमाणे | castor varieties –

1. भीमा –

प्रसारण वर्ष 1982
– महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस
– अवर्षण प्रतिकारक ,
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– मर रोगास मध्यम प्रतिकारक
– तेलाचे प्रमाण 29-30 टक्के,
– फुलाचा रंग उमलताना पांढरा,वाळल्यावर फिक्कट
– पांढरा व मध्यभागी लालसर ठिपके
– पिकाचा कालावधी 130-135 दिवस
– उत्पादकता :13 – 15 क्विं./हे.

2. फुले कुसुम –

प्रसारण वर्ष – 2003
– कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक,
– फुलाचा रंग उमलताना पिवळा ,वाळल्यानंतर लाल.
– तेलाचे प्रमाण 30 टक्के
– पिकाचा कालावधी 135 -140 दिवस
– उत्पादकता –
कोरडवाहू : 13-15 क्विं./हे.
बागायती: 20-22 क्विं./हे.

3. एस.एस.एफ. 708 –

प्रसारण वर्ष -2010
– पश्चिम महाराष्ट्र लागवडीसाठी योग्य,कोरडवाहू तसेच बागायती
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– फुलाचा रंग उमलताना पिवळा ,वाळल्यानंतर लाल
– तेलाचे प्रमाण 31 टक्के
– पिकाचा कालावधी 115-120 दिवस
– उत्पादकता :
कोरडवाहू : 13-15 क्विं./हे.
बागायती: 20-22 क्विं./हे.

4. फुले करडई (एस. एस. एफ. 733) –

प्रसारण वर्ष 2011
– कोरडवाहू लागवडीसाठी
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– तेलाचे प्रमाण 29 टक्के,फुलाचा रंग उमलताना
– पांढरा,वाळल्यानंतर फिक्कट पंधरा , झाडांची उंची मध्यम
– पिकाचा कालावधी 120-125 दिवस
– उत्पादकता: कोरडवाहू : 13-15 क्विं./हे.

5. एस. एस. एफ. 748 (फुले चंद्रभागा) –

प्रसारण वर्ष 2012
– कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
– तेलाचे प्रमाण 29 टक्के,
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– फुले उमलताना पिवळी पडल्यावर लाल
– पिकाचा कालावधी 130-140 दिवस
– उत्पादकता:
कोरडवाहू : 13-15 क्विं./हे.
बागायती: 20-22 क्विं./हे.



6. भिवरा ( एस.एस.एफ. 13-71) –

– अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
– पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक्षम
– तेलाचे प्रमाण 29.2 टक्के
– मर व मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 125 -126 दिवस
– उत्पादकता : 20 क्विं./हे

7. फुले निरा ( एस.एस.एफ. 12-40) –

प्रसारण 2020
– अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
– मावा किडीस व मर रोगास मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 120-125 दिवस
– तेलाचे प्रमाण 32.9 टक्के
– उत्पादकता :
कोरडवाहू:13-15 क्विं./हे.
बागायती: 20-22 क्विं./हे.

8. फुले गोल्ड( एस.एस.एफ. 15-65) –

प्रसारण वर्ष 2021
– अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
– सर्वाधिक तेलाचे प्रमाण 34.6 टक्के
– मर रोगास मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 120-125 दिवस
– उत्पादकता:
कोरडवाहू :14-16 क्विं./हे.,
बागायती: 20-22 क्विं./हे.

9. फुले किरण (एस.एस.एफ. 16-02) –

प्रसारण वर्ष 2021
– अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
– तेलाचे प्रमाण 30.5 %
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 125 – 130 दिवस
– उत्पादकता :
कोरडवाहू :20-25 क्विं. /हे,
बागायती: 24-25 क्विं./हे.

10. पी.बी.एन.एस -12 –

अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
– मराठवाडा विभागास योग्य
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 130-135 दिवस
– उत्पादन:12-15 क्विं./हे



11. पी.बी.एन एस. 86 ( पूर्णा ) –

मराठवाडा विभागात कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी प्रसारित
– पिकाचा कालावधी 130-135 दिवस
– उत्पादकता :
कोरडवाहू :14-16 क्विं./हे.
बागायती: 20-25 क्विं./हे.

12. आय एस एफ -764

मराठवाड्यासाठी शिफारस
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 120-125 दिवस
– उत्पादन:12-15 क्विं./हे

13. अकोला पिंक –

विदर्भात लागवडीसाठी प्रसारित
पिकाचा कालावधी १३०-१३५ दिवस
उत्पादन:१२-१५ क्विं./हे

14. डी. एस एच 185 ( संकरित वाण) –

अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– मर रोगास प्रतिकारक
– पिकाचा कालावधी 120-135 दिवस
– उत्पादकता :
कोरडवाहू :12-15 क्विं./हे.
बागायती: 20-25 क्विं./हे.

15. आर व्ही एस ए एफ 18-1 (राज विजय) –

अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य
– मावा किडीस मध्यम प्रतिकारक
– तेलाचे प्रमाण अधिक 39 टक्के
– पिकाचा कालावधी 120-130 दिवस
– उत्पादन:13-16 क्विं./हे



16. बिन काटेरी वाण –

एस.एस.एफ. 658
प्रसारण वर्ष 2008
बिन काटेरी वाण
– अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
– मावा कीड व मर रोगास मध्यम प्रतिकारक
– तेलाचे प्रमाण 28 टक्के,
– फुलांचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यावर विटकरी लाल
– पिकाचा कालावधी 115 -120 दिवस
– उत्पादकता : 12-13 क्विं./हे.

17. नारी – 6 –

प्रसारण वर्ष 2000
– बिन काट्याची ,पाकळ्या गोळा करण्यास योग्य
– पिकाचा कालावधी 130-135 दिवस
– उत्पादन :10-12 क्विं./हे

18. नारी एन एच 1 ( संकरित वाण ) –

प्रसारण वर्ष 2001
बिन काट्याचा वाण
पाकळ्या गोळा करण्यास योग्य
पिकाचा कालावधी 130-135 दिवस
उत्पादन :12 -14 क्विं./हे.

19. जे. एस 97 –

बिन काट्याचा वाण
– पाकळ्या साठी उपयुक्त
– पिकाचा कालावधी 120-135 दिवस
– 12 -14 क्विं./हे

करडई फुल/ पाकळ्यांचा औषधी गुण –

वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणून करडई पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडई फुलाचा इस्ट परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्तवाहिन्यातील गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होऊन टाकतात असलेल्या गुठळ्या विरघळतात. ह्र्दय रोग्यांच्या इलाजात करडई पाकळी युक्त औषधाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तसेच या औषधाची मात्र सलग चार आठवडे घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो. चीनमध्ये 62 प्रकारच्या विविध सांधेदुखी व स्नायुदुखीवर करडई पाकळ्यांचा मद्यार्क पासून निर्माण केलेली औषधे प्रभावीपणे कार्य करतात. मणक्याचे आजार(स्पाँडिलिसिस),मानदुखी,पाठदुखी इत्यादींवर आयुर्वेदिक उपचारात करडई पाकळ्या इतर वनऔषधी सोबत वापरल्यास आराम मिळतो.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा castor varieties: करडई लागवडीसाठी बेस्ट जातींची नावे आणि माहिती हा लेख खूप आवडला असेल.ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल.ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा आणि इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या “Krushi Doctor” पेजला भेट द्या.

लेखक –

K Suryakant


शेयर करा