शेयर करा

pink bollworm chemical control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी (pink bollworm) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये बोंड अळी नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि बोंड अळीच्या रासायनिक नियंत्रणासाठी (pink bollworm chemical control) काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. कापूस हे एक नगदी पीक आहे.
2. जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे.
3. भारताच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते.
4. कापसाच्या लागवड महाराष्ट्र राज्य अग्र क्रमांकावर आहे.
5. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडअळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
6. बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी 2002 मध्ये बीटी जनुक असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरू झाला परंतु बोंड अळीचा (pink bollworm) प्रादुर्भाव बीटी कपाशीवर सुद्धा दिसून येत आहे.
7. शेतकरी मित्रांनी वेळेवर उपाययोजना केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव पासून होणारे संभाव्य नुकसान कमी करता येईल.
8. दरम्यान कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांचा बोंड अळीवर नियंत्रण (pink bollworm chemical control) मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
9. कापूस पिकात मुख्य ठिपक्याची बोंड आळी, अमेरिकन (हिरवी) बोंडअळी ,गुलाबी बोंड आळी या तीन बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव असतो.



बोंड अळीचा प्रकार | Types of cotton bollworm –

1. ठिपक्याची बोंड अळी – 30 ते 65 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)
2. अमेरिकन बोंड अळी – 45 ते 85 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)
3. रोटरी गुलाबी बोंड अळी – 75 ते 110 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)

जीवनक्रम व ओळख | life cycle of pink bollworm –

1. अंडी आकाराने चपटी व 1 मि.मी. लांब असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
2. अंडी अवस्था सुमारे 3 ते 5 दिवस राहते व या पक्व झालेल्या अंड्यातून सफेद रंगाची 1 मिमी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते.
3. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते.
4. अळी अवस्था सुमारे 8 ते 21 दिवसांच्या दरम्यान असते.
5. कोषावस्था मध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे 8 ते 10 मि.मी. लांब असते.
6. तसेच कोषावस्था सुमारे 6 ते 20 दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात.
7. पतंगाची लांबी सुमारे 8 ते 9 मि.मी.असते व ते करड्या रंगाचे दिसतात.
8. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात व पाठीमागील पंख पतंगावस्था सुमारे 5 ते 31 दिवस राहते.

प्रादुर्भावाची कारणे | pink bollworm symptoms –

1. देशी जातीच्या तुलनेने अमेरिकन जातींवर जास्त प्रादुर्भाव.
2. दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणाची लागवड केल्याने बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.
3. कपाशीबरोबरच भेंडी,अंबाडी,जास्वंद,ताग इत्यादी पर्यायी खाद्याची उपलब्धता असणे.
4. कापसाच्या विविध संकरित वाणांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा असल्याने त्यांची लागवड केल्याने कोडीच्या वाढीसाठी सतत खाद्य पुरवठा होऊन जीवनक्रमाच्या संख्येत वाढ होणे.
5. हंगामपूर्व तसेच हंगामी कापूस लागवड केल्याने कोडींचा जीवनक्रम वर्षभर चालू राहते..
6. बी. टी. जनुक विरहीत कपाशीच्या ओळी न लावल्यामुळे बी. टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होणे.
7. जादा उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने किडीस खाद्याची उपलब्धता होणे.

नुकसानीचा प्रकार | pink bollworm chemical control –

1. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारीक कणांच्या सहाय्याने छिद्र बंद करते.
2. ज्या मुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
3. या अळीचा प्रादुर्भाव बोंडा मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
4. किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक्व न होता च फुटतात.
5. गुलाबी बोंडअळी सरकीचे नुकसान करते. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होते.

आर्थिक नुकसान पातळी | Economic threshold level –

फेरोमोन सापळ्यामध्ये सरासरी आठ ते दहा नर पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळून येणे अथवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येणे.

यजमान पिके | Host plants –

कापूस, अंबाडी, भेंडी, जास्वंद, ताग या पिकावरील शेंदरी बोंडअळी उपजीविका करते अशी पिके कपाशी पूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.



कपाशी गुलाबी बोंड अळी नियंत्रण | pink bollworm chemical control –

1. प्रति एकर 8 ते 10 कामगंध सापळ्यांचा वापर करावा. त्यात सापडणारी नर पतंग गोळा करून नष्ट करावेत.
2. गरजेनुसार वेळोवेळी कामगंध सापळ्यात ल्युअर बदलून घ्यावे.
3. कापूस साठवण केलेल्या जागी आणि जिनिंग-प्रेसिंग मिलच्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावेत.
4. पुढील वर्षी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करावेत.
5. त्यासाठी कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून द्यावीत.
6. उर्वरित शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणास मदत होते. डिसेंबरनंतर कपाशी पिकाचा खोडवा (फरदड) अनेक शेतकरी ठेवतात.
7. जास्त पाणी दिल्याने कपाशीला पाते, फुले व बोंडे गुलाबी बोंड अळीच्या उपजीविकेसाठी कपाशी बोंडे उपलब्ध होत राहतात.
8. परिणामी किडीची वाढ होत राहते. ही कीड बी. टी.ला प्रतिकारकता निर्माण करते.
9. म्हणून डिसेंबर ते 15 जानेवारीच्या आत पीक काढून टाकावे. किंवा खोडवा घेणे टाळावे.
10. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या शेतात किंवा शेताजवळ त्यांचा ढीग करून ठेऊ नये.
11. अशा पऱ्हाट्यांचा रोटाव्हेटरच्या साह्याने चुरा करून त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल.
12. किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा शेतात गोळा करून जाळून नष्ट करावा.
13. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकाची फेरपालट करावी.
14. पाण्याची उपलब्धता नसल्यास डिसेंबर महिन्यानंतर शेत 5 ते 6 महिने कापूस पीक विरहित ठेवावे.
15. गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
16. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी.

जैविक नियंत्रण | pink bollworm chemical control –

निम तेल 10,000 पी पी एम – 20 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना 50 मिली किंवा बॅसिल्लस थुरिंगींसिस 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

रासायनिक पद्धत | pink bollworm chemical control –

1. कराटे (लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी) 10 मिली
2. सुपर डी (क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन) – 30 मिली
3. प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन) – 30 मिली
4. ईएम 1 (इमामेक्टीन बेंझोएट 5% एस जी) – 10
5. डेसिस 100 (डेल्टामेथ्रिन 100 ईसी) – 10 मिली
6. ट्रेसर (स्पिनोसॅड 45 एस. सी.) 7 मिली.
7. एम्पलिगो (क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 09.30% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 04.60% ZC) – 8 मिली
8. कोराजन (क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5% एस. सी) – 6 मिली

(टीप – या पैकी कोणतेही कीडनाशक आलटून पालटून किडीचा प्रादुर्भाव नुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)

कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी –

रसशोषक किडींचा उद्रेक टाळणे, किडींमध्ये कीटकनाशकांप्रती प्रतिकारक क्षमता वाढीस लागू नये, तसेच फवारणी करणाऱ्या व्यक्तीस विषबाधा होऊ नये, इ. साठी खालील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

1. पीक वाढीच्या सुरुवातीच्या 60 दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
2. पायरेथ्राईड वर्गातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन, फेन व्हलरेट, डेल्टामेथ्रीन, फेनप्रोपाथ्रिन इ.) कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या 120 दिवसांपर्यंत वापर करू नये.
3. एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
4. त्वचेला हानी, इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हाताने हाताळू नयेत. हात मोज्यांचा वापर करावा.
5. श्‍वासाद्वारे शरीरात जाऊन विषबाधा होऊ नये यासाठी फवारणी करताना नाक आणि तोंडाला मास्क लावावा.
6. फवारणी चे तुषार/शिंतोडे डोळ्यांत गेल्यास गंभीर इजा होऊन दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना गॉगल किंवा संरक्षक हूड लावावे.
7. विषबाधेची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करून घ्यावेत.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कापूस या पिकातील बोंड अळी नियंत्रण (pink bollworm chemical control) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. कापूस पिकात कोणत्या बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो?
उत्तर – कापूस पिकात – मुख्य ठिपक्याची बोंडअळी, अमेरिकन (हिरवी) बोंडअळी ,गुलाबी बोंड आळी या तीन बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव असतो.

2. बोंड अळी अळी साठी यजमान पिके कोणती आहेत?
उत्तर – कापूस, अंबाडी, भेंडी, जास्वंद, तागा ही पिके
बोंड अळी साठी यजमान पिके आहेत.

3. कपाशीमध्ये नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यावर काय परिणाम होतो?
उत्तर – नत्रयुक्त खतांचा अतिवापर केल्यामुळे केवळ शाकीय वाढ जास्त होते. जमिनीतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये कमी होऊन पाण्याचा व पोषण द्रव्यांचा ताण वाढतो. परिणामी रोगाची शक्यता वाढते.

4. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरावे?
उत्तर – कराटे, सिजेंटा,लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी 8 मिली किंवा टर्मिनेटर 50,अग्रोसिस,क्लोरोपायरीफॉस 50 ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लेखक –

K Suryakant


शेयर करा
शॉपिंग कार्ट