शेयर करा

maize variety

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मकेच्या लागवड करण्यात येणाऱ्या निवडक वाणांची (maize variety) आपण माहिती पाहणार आहोत.

प्रस्तावना –

मका पिकाच्या सुमारे 50 प्रजाती (maize variety) अस्तित्वात आहेत आणि त्यामध्ये विविध रंग, पोत आणि धान्याचे आकार आणि आकार आहेत. पांढरा, पिवळा आणि लाल हे सर्वात सामान्य मक्याचे प्रकार आहेत. प्रदेशानुसार बहुतेक लोक पांढऱ्या आणि पिवळ्या जातींना प्राधान्य देतात. मकेच्या सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात.विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करावी.



मका सुधारीत आणि संकरित जाती | best maize variety –

1. गंगा 5 (Ganga 5 maize variety) –

– मक्याचा हा वाण पक्व होण्यास सुमारे 90 ते 100 दिवस लागतात.
– या वाणापासून प्रति हेक्टर जमिनीवर सुमारे 50 ते 60 क्विंटल उत्पन्न मिळू शकते.
– या जातीच्या मक्याचे दाणे पिवळ्या रंगाचे असतात.
– ही सर्वात जास्त पिकणारी वाण आहे.

2. प्रकाश – जे.एच. 3189 (Prakash – JH 3189) –

– ही संकरित वाण लवकर पिकणाऱ्या जातींपैकी एक आहे.
– संपूर्ण भारतात याची लागवड केली जाते.
– या जातीचे पीक 80-85 दिवसांत तयार होते.
– या जातीचे प्रति हेक्टर सुमारे 40 ते 45 क्विंटल उत्पन्न मिळते.

3. पार्वती (Parvati maize variety) –

– मकाचे हे वाण विशेष गुणाचे आहे, कारण मकाचे भुट्ट्यांची लांबी जास्त असते.
– तर एका झाडाला दोन भुट्टे लागत असून ते झाडाच्या मध्यभागी राहत असतात.
– या मक्याची दाणे नारंगी-पिवळ्या रंगाचे आणि कडक असतात.
– ही जात 110 ते 115 दिवसात परिपक्व होते आणि एकरी सुमारे 14 क्विंटल उत्पादन मिळते.



4. राजर्षी (Rajarshi) –

– ही मक्याची संकरित जात आहे.
– मक्याची ही जात अधिक उत्पादनासाठी विशेष ओळखले जाते.
– इतर जातींच्या तुलनेत मक्याच्या या संकरित जाती पासून चांगले उत्पादन मिळवता येते.
– यामुळे शेतकरी बांधव या जातीच्या मक्‍याची पेरणी मोठ्या प्रमाणात करत असतात.
– या जातीच्या मक्या पासून 100 ते 110 क्विंटल प्रति हेक्‍टर पर्यंत उत्पादन सहजरीत्या घेता येणे शक्य आहे. – निश्चितच शेतकरी बांधवांसाठी या जातीची पेरणी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

5. मांजरी (Manjari maize variety) –

– मक्याची ही एक सुधारित जात आहे.
– या जातीची देखील शेतकरी बांधव पेरणी करत असतात.
– या जातीपासून हेक्‍टरी 40 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणे शक्‍य आहे.

6. पंचगंगा (Panchganaga) –

– मक्याच्या या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.
– मक्याची ही देखील एक सुधारित जात आहे.
– या सुधारित मक्याच्या जाती पासून 40 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा केला गेला आहे.
– पंचगंगा लवकर पक्व होणारे (80 ते 90 दिवस) व अति लवकर पक्व होणारे संमिश्र वाण (70 ते 80 दिवस) आहे.
– या वाणाचे दाणे हे पांढरे आणि मोठे असतात अंतर विकासासाठी अंतर पिकासाठी हे योग्य असे वाण आहे करपा रोगास साधारण प्रतिकारक आहे.
– एका हेक्टर साठी आठ किलो बियाणांचा वापर करावा.

7. करवीर (Karvir maize variety) –

– मक्याची ही जात हेक्‍टरी 50 ते 55 क्विंटल पर्यंत उत्पादन देत असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे.
– हे एक संमिश्र वाण आहे.
– या जातीची देखील आपल्या राज्यात शेती केली जाते.



8. आफ्रिकन टॉल (African tall) –

– मक्याची ही जात विशेषता चार्‍याच्या उत्पादनासाठी घेतली जाते.
– या जातीच्या मक्यापासून हेक्‍टरी 60 ते 70 टन हिरवा चारा उपलब्ध होतो.
– 40 ते 50 क्विंटल हेक्टरी मक्याचे देखील उत्पादन मिळते.
– दुहेरी हेतूने घेतल्या जाणाऱ्या या जातीपासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

9. शक्ति 1 (Shakti 1) –

– मक्याची हा वाण लवकर पिकणारा असून 90 ते 95 दिवसात परिपक्व होत असतो.
– संपूर्ण भारतात याची लागवड केली जाते.
– या जातीचे सरासरी उत्पादन एकरी 50 क्विंटल आहे.

10. पीडीकेव्ही आरंभ (BHM 18-2 maize variety) –

– हा वाण हेक्टरी 101 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो.
– त्याचे उत्पादन, कडबा उत्पादन अधिक मिळते.
– हा वाण 95 ते 100 दिवसांत परिपक्व होतो.
– कोरडवाहू क्षेत्रात पेरणी करता येते.
– शिवाय करपा रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
– खोड कीड, अमेरिकन लष्करी अळीच्या पानांच्या नुकसानीसाठी मध्यम प्रतिकारक आहे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा “maize variety: जाणून घ्या मका लागवडीसाठी बेस्ट वाणांची नावे” हा लेख खूप आवडला असेल.ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल.ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.आणि मका पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या “Krushi Doctor” पेजला भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. मका किती महिन्यात येते?
उत्तर – मकेसाठी साधारणता 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

2. भारतात कोणत्या महिन्यात मका पिकवला जातो?
उत्तर – मका हे सर्व ऋतूंमध्ये घेतले जाऊ शकते उदा. खरीप (पावसाळा), पावसाळ्यानंतर, रब्बी (हिवाळा) आणि वसंत ऋतू.

3. मक्याच्या वाढीसाठी किती तापमान आवश्यक असते?
उत्तर – मक्याच्या वाढीसाठी 21°C ते 27°C तापमान आवश्यक असते.

4. मका पिकाच्या धान्यासाठी पेरणी करिता किती बियाणे प्रति हेक्टरी वापरावे?
उत्तर – पेरणीसाठी हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें. मी. अंतरावर करावी.

लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा
शॉपिंग कार्ट